Total Pageviews

Sunday, 9 April 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २७०

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २७०
।।सिंहाचा छावा छत्रपती संभाजीराजे।।
सांभार :http://www.marathidesha.com
भाग
छत्रपती शिवरायांनी संभाजीराजें अवघे नऊ वर्षाचे असताना त्यांना आग्रा भेटीसाठी सोबत नेले.आग्रा भेटीवेळी संभाजी राजेंना मोघलांची पंचहजारी मनसबदारी मिळाली होती.त्यामुळे जेव्हा औरंगजेबने कपटाने छत्रपती शिवरायांना कैदेत टाकले त्यावेळी संभाजीराजेंचा,छत्रपतींना खुप उपयोग झाला.
सन १६७४ साली राज्याभिषेकानंतर १२ दिवसात जिजाऊंचे निधन झाले.त्यामुळे संभाजी राजे पोरके झाले..संभाजीराजे अत्यंत देखणे व शूर होते,त्यांना भ्रष्टाचार खपत नसे.शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील अण्णाजी दत्तोंच्यासारख्या काही लोकांचा भ्रष्टाचार संभाजीराजेंनी उघडकीस आणल्यामुळे ते संभाजी राजेंविरूध्द गेले.शिवरायांनंतर जर संभाजी राजे गादीवर बसले तर आपले काही खरे नाही असे अष्टप्रधानातील भ्रष्ट लोकांना वाटू लागले.त्यामुळे त्यांनी शिवरायांनंतर छोट्या राजारामाला गादीवर बसविण्याचे मनोरथ आखले.
छत्रपती शिवरायांनी जेव्हा दक्षिण भारतातील मोहिम आखली,तेव्हा त्यांनी संभाजी राजेंना सोबत नेण्याचा विचार केलेला होता,जेणेकरून संभाजी राजेंना मोहिमेचा अनुभव येईल.पण छत्रपतीसोबत गेल्यावर संभाजी राजेंचे कर्तुत्व शिवरायांच्या नजरेत भरेल व राजे म्हणून ते संभाजीराजेंची निवड करतील असे वाटल्यामुळे, अष्टप्रधान मंडळीनी महाराजांना,संभाजीराजेंना सोबत नेण्यास विरोध दर्शविला.महाराज या सर्वापुढे हतबल झाले व त्यांनी संभाजी राजेंना शृंगारपूरचे सुभेदार म्हणून पाठविले.

No comments:

Post a Comment