राजश्री संतोजीराजे शहाजीराजे भोसले
भाग १
इ.स.१६५४ पर्यंत थोरले शंभुजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती व्यंकोजीराजे यांच्या बहुत्येक सर्वच हालचालींमागे शहाजी महाराजांचे नियोजन, प्रोत्साहन, गुप्त पाठिंबा आणि विश्वासू लोंकाची यांच्याकडे पाठवणूक आणि नेमणूका केल्याचे लक्षात येते. त्यानंतरच्या काळात शिवाजी महाराजांच्या हालचाली सर्वथा स्वनिर्णयाच्या असून शहाजीराजांना मात्र सर्व बितंबीत खबरा पोहोविल्याचे लक्षात येते. रायगडावरील शिवकालीन मराठी कागदपत्रांचा १००% नाश झाला जेंव्हा जुल्फीकार खानाने सबंध दप्तर जाळून टाकले. इतर ठिकाणी जी मराठी कागदपत्र आहेत त्यांचे अजूनही १०% सुद्धा वाचन झाले नाही. कानडी, तामीळ, मल्याळी, गुजराती, राजस्थानी, पंजाबी, फार्सी साधनांचे वाचन चालू आहे. पण त्यांचे प्राधान्य मराठी राजसत्तांपेक्षा त्यांच्या संस्थानीकांना अधीक आहे. यामुळे अल्पशा गोष्टीच अजून उजेडात आल्या आहेत. थोरल्या शंभुजीराजांनंतर व्यंकोजीराजे हे शहाजी महाराजांचे दक्षीणेतले आशा स्थान नक्कीच असणार. थोरल्या शंभुजी राजांना आणि शिवाजी महाराजांना जसे शहाजी महाराजांनी शिक्के बनवून दिली तसे व्यंकोजीराजांनाही दिली असणार. थो.शंभुजीराजे आणि व्यंकोजीराजे यांना सुल्तानाचे ताबेदार केले परंतु शिवाजी महाराजांना अलिप्त ठेवले. या मागचे शहाजी महाराजांचे तंत्र अद्यापी उकलले नाही. व्यंकोजीराजे छत्रपती होणे ही सुद्धा शहाजी महाराजांची फार जुनी योजना असावी. दरबारच्या आदेशावरून व्यंकोजीराजांनी १२ जाने.१६७६ ला चोक्कनाथ नायकाकडून तंजावर जिंकले आणि लगेच ५ मार्च १६७६ ला विधिपूर्वक राज्यारोहण केले. पण त्यांनी विजापूरचे स्वामित्व झुगारले नाही आणि त्यांचे जहागीरदार म्हणूनच राहिले. १६५४ मध्ये थोरले शंभुजीराजांचा मृत्यु झाल्यावर शहाजीराजे बंगळूरात स्वस्थ बसून राहिले असा काही जणांचा समज आहे. शहाजी महाराजांनी १६६२ मध्ये बेदनूरवर केलेली स्वारी आणि १६६३ मध्ये बसावपट्टणवर केलेली स्वारी सर्वश्रुत आहे.
No comments:
Post a Comment