Total Pageviews

Monday, 10 April 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २८८

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २८८
राजश्री संतोजीराजे शहाजीराजे भोसले
भाग ३
* . शिवाजी महाराजांनी व्यंकोजीराजांना पाठवलेल्या पत्रात जसा चिरंजीव संतोजीराजे असा उल्लेख केला आहे तिथे इतरांना फक्त भिवजीराजे आणि प्रतापजीराजे असे संबोधीले आहे. आंद्रे फायरच्या पत्रात संतोजीराजे यांना शिवाजीमहाराजांचा धाकटा भाऊ म्हटले आहे,
शिवाजीमहाराज आणि व्यंकोजीमहाराजांचा जन्म ६ महिने ते १ वर्ष अंतरकालावधीतला आहे. संतोजीराजांचा उल्लेख असलेला एकही कागद अजून तरी उजेडात आलेला नाही की जो थो.शंभुजीराजे हयात असतानाचा आहे. याचा अर्थ संताजीराजे हे उमाजीराजे, सुरतसिंहराजे किंवा शिवपुत्र शंभुजीराजांच्या वयाचे असावेत. यामुळेच कदाचित शहाजीराजांनी संतोजीराजांना तो पर्यंत राज्यनिर्मीतीत गोवले नसावे पण थोर सेनानी होण्यास मात्र निमित्त झाले.
* . जो पर्यंत आजचे मराठी युवक हजारो/लाखोंच्या संघटीत वा असंघटीत संख्येने या धुळ खात पडलेल्या कागदपत्रात काय दडलेले आहे याचा शोध लावत नाहीत तो पर्यंत महाराष्ट्राचा जज्वलंत इतिहास अंधारातंच राहिल किंबहून it will die a slow -> gradual -> fast death to destruction.
.
तंजावरचे मराठे राजे / तंजावरचे राजघराणे या ग्रंथात शहाजी महाराजांनी शिवाजी महाराज आणि व्यंकोजी महाराजांना बंगळूरास असताना एकत्र अभ्यास करवील्याचा उल्लेख आहे. बंगळूरास राज्य व्यंकोजीराजांनी करावे आणि महाराष्ट्रात शिवाजीराजांनी राज्य करावे अशी शहाजीमहाराजांची योजना होती असे नमूद केले आहे. राज्य करण्याबाबात थो.शंभुजीराजांबाबत यात लिहीलेले नसल्याने लेखकाचे लिखाण पक्षपाती वाटते. शिवाजी महाराजांनी व्यंकोजी महाराजांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे ‘ की तुमची आमची भेट जन्मापासून नाही. भेटीचा हेतु धरून देशीहून आलो. तरी भेटीस येणे.’ यावरून वरील ग्रंथ विश्वसणीय वाटत नाही.
शिवदिग्वीजयात शिवाजी महाराजांच्या मुखी हंबीरराव (बहिरजी) मोहिते यास चिरंजीव म्हटले आहे. मोडी वाचनात हंबीररावचे बहीरराव अशी चूक झाल्याचे काहींचे म्हणणे आहे. परंतु शिवदिग्वीजयात बहीरराव लिहीले नसून चिरंजीव बहीरजी राजे असे लिहीले आहे. हंसाजी आणि बहीरजी अशी एकाच व्यक्तीची नावे सापडतात. हा अभ्यासाचा विषय आहे. हंबीररावास व्यंकोजीराजांचा मसला सोडवण्यास शिवाजीमहाराजांनी मागे ठेवले कारण व्यंकोजीराजांच्या मातोश्री ह्या महाराणी तुकाबाई, आणि ह्या हंबीररावची आत्या. हंबीरराव हे व्यंकोजीराजांचे मामेभाऊ. महाराणी सोयराबाई ह्या व्यंकोजीराजांची सख्खी मामेबहिण आणि वहिणी.

No comments:

Post a Comment