सुभेदार पिलाजी जाधवराव
तुळापूर येथून निघून 20 मिनटात वाघोलीला असलेले वाघेश्वर मंदिर . पुणे-नगर मार्गावर पुण्यापासून 20 कि.मी. अंतरावर वाघोली हे गाव आहे. येथे पुरातन वाघेश्वर मंदिर, हनुमान मंदिर,भैरवनाथ मंदिरे प्रसिद्ध आहेत. हे मंदिर हेमाडपंती स्थापत्य शैलीतील आहे. तसेच पेशवाईतील शूर कर्तबगार सरदार पिलाजीराव जाधवरावांची समाधी आहे.
पिलाजीरावांनी तलावाच्या शेजारील वाघेश्वर मंदिराजवळ बागेसाठी पेशव्यांकडे जागेची मागणी केली होती. गावातील लोकांना पाण्याची अडचण दूर होण्यासाठी तलाव बांधला. ही मागणी बाजीराव पेशव्यांनी 1722 मध्ये मान्य करून पिलाजी आणि संभाजी जाधव रावास जमिन दिली. पिलाजीरावांनी दिवेघाटात तलाव बांधला. तो मस्तानी तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. दिवेघाटात वर पोहचल्यावर खाली नजर टाकल्यास मोठा पाण्याचा कोरडा तलाव दिसतो हाच तो मस्तानी तलाव. मध्यंतरी पेपरात तलाव साफ करण्याच्या बातम्या झळकल्या होत्या. 1729 च्या पूर्वी या तलावाची बांधणी पिलाजीरावांनी केली. पुढे बाजीरावांकडे हा तलाव आला.
सरदार पिलाजीराव जाधवांची समाधी
मंदिराशेजारी पाषाणातील सुबक बांधकाम असलेली पिलाजीरावांची समाधी आहेत. या समाधीजवळच जाधवराव घराण्यातील अनेक पुरु षांच्या समाध्या दिसतात.
No comments:
Post a Comment