Total Pageviews

Monday, 10 April 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २८०


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २८०
।।सिंहाचा छावा छत्रपती संभाजीराजे।।
सांभार :http://www.marathidesha.com
भाग १३
संभाजीराजे महान राष्ट्रवीर
संभाजीराजेंनी स्वराज्यासाठी,स्वराष्ट्रासाठी बलिदान केले.संभाजीराजा महान राष्ट्रवीर होते.अशा या राष्ट्रवीराचे महान कार्य पेशवेकालीन बखरींनी आणि आजच्या युगातील काही इतिहासकारांनी चुकीचे रंगविले आहे.याउपर संभाजीराजेंनी धर्मासाठी प्राण सोडिला, संभाजीराजें धर्मवीर होते असा चुकीचा इतिहास लिहिला गेला.
चुकीचा इतिहास खरा मानून आपण या महान राष्ट्रवीराचे महत्त्व आपण कमी करत आहोत.याठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्याची सर्वांना गरज आहे.छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी हे हिंदू राजे होते पण त्यांचा लढा इस्लामी जनतेशी नसून जुलमी इस्लामी राजसत्तेशी होता.सर्व धर्मियात पुज्यनिय असलेल्या छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी या महान राष्ट्रपुरूषांना आज आपण एकाच धर्माच्या बंधनात अडकविले आहे.हे करून आपण त्यांच्या विचारांशी प्रतारणा करत आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
वढू बुद्रूक येथील संभाजीराजेंची समाधी

 

No comments:

Post a Comment