Total Pageviews

Monday, 10 April 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २८७

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २८७
राजश्री संतोजीराजे शहाजीराजे भोसले
भाग २
राजश्री संतोजीराजे भोसले
दक्षीणदिग्वीजयाच्यावेळी राजश्री संतोजीराजे भोसले शिवाजी महाराजांना सामील झाले. व्यंकोजीराजांना पाठविलेल्या पत्रात चिरंजीव संतोजीराजे असा केला आहे.
जेस्विटच्या वृत्तांतात संतोजीराजे एक शुर सेनापती होता असा उल्लेख आहे. व्यंकोजीराजांसोबत मदुरेचे सैन्यसुद्धा संतोजीराजे, रघुनाथपंत हणमंते आणि हंबीरराव मोहिते यांच्याशी युद्ध करण्यास जिंजीत आले. व्यंकोजीराजांच्या सैन्याचा पराभाव होताच संतोजीराजांसोबत मदुरानयकानेही तंजावरला वेढा दिला. संतोजीराजांचा पहिला बेत होता की मदुरानायकाकडून भरमसाट पैसा घेऊन तंजावरचा किल्ला आणि राज्य मदुरानायकाच्या स्वाधीन करावे. परंतु रघुनाथपंतांच्या सल्ल्याने आणि शिवाजी महाराजांच्या पत्राने व्यंकोजीराजांच्या राज्याचा नाश करू नये अशी सूचना मिळाल्यावर संतोजीराजांनी मदुरानायकासोबतचा शब्द मोडला आणि जिंजीला परत निघून गेले.
इंग्रजांच्या सेंट जॉर्जवखारीतून सुरतला पाठवलेल्या पत्रात संतोजीराजांच्या हाताखाली ६००० घोडदळ & ६००० पायदळ होते. तर व्यंकोजीराजांचे ४००० घोडदळ आणि १०००० पायदळ होते. यात व्यंकोजीराजांच्या घोडदळाने कमाल केल्याचा उल्लेख आहे. पण त्यांचे मुसलमानी पायदळ सैरावैरा पळत सुटले.
श्री. गजानन मेहेंदळेंच्या श्रीराजा शिवछत्रपती या ग्रंथात राजश्री संतोजीराजे यांच्या मातोश्री महाराणी नरसाबाईंची तुरळक माहिती आहे. सभासद बखरीत नरसाबाईंचा उल्लेख एक उपस्त्री म्हणून केला आहे. नरसाबाईंनी २२ जानेवारी १६८८ ला बाळंभट उपाध्ये याला लिहून दिलेले एक दानपत्र आहे. त्रिणामल म्हणजे तिरुवन्नमलै प्रांतातील तोरपाड उर्फ नरसांबापूर नावाचे गाव नरसाबाईंनी दान दिले आहे. यात नरसाबाईंनी स्वत:चा उल्लेख “माहाराज राजेश्री शहाजीराजे भोसले यांची स्त्री, राजेश्री संतोजीराजियांची माता, राजेश्री नरसाबाई” असा केला आहे. जिंजी प्रांतातील वीरनम येथुन आंद्रे फायर याने पॉल ऑलिव्हा याला इ.स.१६७८ मध्ये पाठविलेल्या एका पत्रात ‘संताजी हा शिवाजीच्या भावांपैकी एक भाऊ’ असल्याचे म्हटले आहे.
* . नरसाबाई या उपस्त्री नसून राजमाता जिजाबाई आणि महाराणी तुकाबाईसारखीच विवाहीत स्त्री असण्याची दाट शक्यता आहे. [u]त्यांचे वरील दानपत्र !!! उपस्त्रीला दानपत्र देण्याचा अधिकार होता ??? त्यात त्यांनी स्वत:चा शहाजी महाराजांची स्त्री असा स्वत:चा उल्लेख केला आहे.

No comments:

Post a Comment