Total Pageviews

Monday, 10 April 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २९२

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २९२

शंभू महाराज्यांच्या मृत्यूचा बदला पूर्ण झाला
⋅ Prashant Shigwan
भाग ४

१० लढाऊ हत्ती ,३०० उत्तम पैदाशीचे घोडे,खजिना , कापड , वाहतूक करणारे शेकडो बैल , उंट अशी मालमत्ता मराठ्यांच्या हाती पडली. खानेआलाम वर संताजीचा वीर पुत्र राणोजी तुटून पडला. बाबाजी भोसल्यांचे भालेस्वार त्याच्या मदतीला होते. तलवारी आणि भाल्याच्या असंख्य जखमांनी खानेआलाम खाली कोसळला. मराठ्यांनी त्याला घेरातच निजामाने हंबरडा फोडला. पोराला वाचावाण्यासती तो घेराव करत मराठ्यांच्यात शिरला. मराठ्यांना मागे रेटून त्याने आपल्या पोराला पालखीत घातला पण आता त्याचा किमोष डोक्यावरून खाली पडला होता. आता पाळी निजामाची होती शंभू राज्यांच्या मृत्यूचा बदला घ्यायला मराठे एकवटले निजामावर सपा सप वार होऊ लागले मराठे त्याला जिवंत पकडण्याची कोशिश करू लागले पण निजामाच्या इतर दोन मुलांनी खानेआलाम आणि निजामाला जीवाची बाजी लावून बाहेर काढले. निजाम सुटला पण कायमचा जायबंदी होऊन आयुष्यात परत त्याने कधी तलवार पकडली नाही. रात्री त्याला स्वप्नात हि संताजी दिसत असे. मराठ्यांचा राजा पकडून देण्याची सजा त्याला मिळाली होती पण इकडे आपण निजामाला मारू शकलो नाही याची खंत संताजीला चाटून गेली.

आपल्या मृत सहकार्यांचे अग्नी संस्कार करून आणि जखमी सैनिकांना औषध पाणी करून संताजी विशाल गडाच्या वाटेला लागले

No comments:

Post a Comment