संभाजीराजेंची क्रुर हत्या
संभाजीराजे आणि कवि कलश यांची धिंड काढून त्यांना औरंगजेबसमोर हजर करण्यात आले.या घटनेबद्दल मोघलांचा इतिहासकार खाफीखान लिहितो,"संभाजी व कवीकलश यांची धिंड जेव्हा परतली तेव्हा औरंगजेबने आपला दरबार भरवला आणि या कैद्याना दरबारात आणले.त्यांना पाहताच औरंगजेब तख्तावरून खाली उतरला.ईश्वराच्या या उपकाराप्रीत्यर्थ दोन रूकात पढल्या. औरंगजेब गुडघे टेकून ईश्वराची प्रार्थना करीत होता.हे पाहिल्यानंतर कवी कलश संभाजीराजेंकडे पाहून म्हणाला,
'राजन हो तुम सॉंच खरे,खूब लढे तुम जंग।
देखत तव चंडप्रताप जही,तखत त्यजत औरंग।'
हे संभाजीराजा तू सच्चा वीर आहेस,तूच जबरदस्त योध्दा आहेस.तुझा हा प्रचंड पराक्रम बघून स्वत:औरंगजेबाने आपले राजसिंहासन त्यागून तुझ्यापुढे तो नतमस्तक झाला आहे."
संभाजीराजेंच्या मृत्युबद्दल आलमगीर विजय'या फारशी ग्रंथात(हा ग्रंथ औरंगजेबाचा मुख्य न्यायाधिश शेख उल इस्लाम याचा कारकून असलेल्या ईश्वरदास नागर याने लिहिला आहे)पुढीलप्रमाणे लिहिले आहे."बादशाहच्या आज्ञेने,इखलासखान आणि बहादूरखान हे संभाजीराजे,कवि कलश व इतर साथीदारांना घेऊन बादशाहच्या छावणीजवळ आले.बादशाहच्या आज्ञेवरून या सर्वांची उंटावरून धिंड काढण्यात आली.त्यानंतर त्यांना छावणीत आणण्यात आले.इखलासखान आणि हमीदुद्दीन खान यांनी संभाजीराजेंना बादशाहला ताजीम देण्यासाठी सांगितले पण संभाजीराजेंनी त्यांचे ऐकले नाही.संभाजीराजे,कवि कलश व इतर साथीदारांच्या पायात बेड्या ठोकण्याचा बादशाहने आदेश दिला.
बादशाहने रहुल्लाखाना करवी,मराठेशाहीतील खजिनाबद्दल तसेच बादशाहच्या सरदारापैकी ज्यांचे संभाजीराजेशी संबंध होते याची माहिती काढण्याचा खूप प्रयत्न केला पण संभाजीराजेंनी काही ऐकले नाही.अखेरच्या कालखंडात संभाजीराजें,कवी कलश व त्यांच्या सहकार्यांचे खूप हाल करण्यात आले.सर्वांनी अन्नाचा त्याग केला होता.शेवटी चिडून जाऊन बादशाहच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील मौजे तुळापूर येथे सर्वांची अत्यंत क्रुर अशी हत्या करण्यात आली.हत्येनंतर संभाजीराजेंच्या शरीराचे अवशेष गोळा करून वढु बुद्रूक येथील रयतेने त्यांची समाधी बांधली.
इंद्रायणी आणि भीमा नदीचा संगम,मौजे तुळापुर
छायाचित्रात दिसणार्या कमानीजवळ संभाजीराजेंची क्रुर हत्या करण्यात आली
No comments:
Post a Comment