Total Pageviews

Thursday 8 September 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य याचा शोध भाग ३०


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य याचा शोध
भाग ३०

घाटगे मराठा घराणे -भाग २

सखाराम (सर्जेराव) घाटगे :-

१७९६ सालच्या सुमारास या घराण्यांतील ज्या दोघां पुरूषांचीं नांवें इतिहासांत विशेष प्रसिध्दीस आलीं, त्यांतील एक यशवंतराव व दुसरा सखाराम होय. यशवंतरावाची बहीण कोल्हापूरकरास दिली होती.यशवंतराव व सखाराम या दोघांत वतनासंबंधीं कांहीं भांडण होऊन त्यांच्यामध्यें एक चकमक झाली. तींत सखारामाचा पराजय होऊन तो पळून येऊन परशुराम भाऊच्या चाकरीस राहिला. कांहीं दिवसांनीं त्यानें भाऊचीं नौकरी सोडून नाना फडनविसाची धरली. नानानें त्याजकडे १०० स्वारांचें आधिपत्य दिलें होतें. सन १७९६ त नाना पुणें सोडून गेले तेव्हां सखाराम हा शिंद्यांच्या चाकरींत शिरला; येथेंहि त्यांस १०० स्वारांचेंच आधिपत्य देण्यांत आलें. त्यानें आपल्या चातुर्यानें शिद्यांचा कारभारी रायाजी पाटलाची मर्जी संपादिली. सखारामाची मुलगी सुस्वरूप म्हणून प्रसिध्द असल्यामुळें तिच्याशीं विवाह करण्याच्या उद्देशानें स्वत दौलतराव शिंदेहि त्याची खुशामत करी. शिंद्याशीं संबंध जोडण्यास सखारामहि उत्सुक होताच, परंतु जितकें आपण ओढून धरूं तितका आपला फायदा जास्त असें समजूंन आपण ओढून धरूं तितका आपला फायदा जास्त असें समजून तो शिंद्यास मुलगी देण्यास वर कांकू करी. रावबाजी याला उत्तरहिंदुस्थानांत नेण्याकरितां बाळोबा तात्यानें सखारामाचीच योजना केली. तेव्हां ह्यानें बाजीरावास सांगितलें कीं तुम्हाला पेशवाई मिळवून देण्यासाठीं मी शिंद्याचें मन वळवितों आणि शिवाय शिंद्यास आपली मुलगी देतों. मात्र आपण पेशवे झाल्यावर शिंद्यास दोन कोट रूपये द्यावें व मला शिंद्याची दिवाणगिरी व कागलची जहागिरी मिळवून द्यावी. तें रावबाजीनें कबूल केलें.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य याचा शोध भाग २९

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य याचा शोध
भाग २९
घाटगे मराठा घराणे -भाग १
- मराठे सरदारांमध्यें घाटग्यांचें कुटुंब प्रमुख आहे. हे मूळचे खटाव गांवचे राहणारे व मलवडीचे देशमुख. ब्राम्हणी राज्यांत त्यांस माण प्रांताची देशमुखी व सरदेशमुखी मिळाली. कामराजे घाटगे हा त्यांचा मूळ पुरूष. इब्राहिम आदिलशहानें स.१६२६ त नागोजी घाटगे यास सरदेशमुख व झुंजारराव हे किताब दिले. विजापूरच्या राज्यांतून त्यास जहागिरीहि पुष्कळ होत्या. “सर्जेराव”, “प्रतापराव” इत्यादि अनेक किताब या कुटुंबास मिळाले आहेत.
इ.स.१६३३ त दौलताबाद मोंगलांच्या हातीं लागल्या वर विजापुरचें सैन्य स्वदेशीं परत येत असतां त्याच्या मोहो बतखान नामक मोंगल सरदाराशीं ज्या चकमकी झाल्या त्यांपैकीं एकींत नागोजी घाटगे मारला गेला.
अवरंगजेब व मीरजुमला हे आदिलशहाच्या मुलखांत चालून आले तेव्हां सर्जेराव नांवाचा एक घाटगे विजापूरकरांकडून लढत होता (१६५७).
इ.स.१६५९ त विजापूर दरबाराकडून शिवाजी राजाच्या पारिपत्याकरितां पाठविण्यांत आलेल्या अफजुलखानाबरोबर झुंजारराव म्हणून एक घाटगे असून तो शिवरायांच्या हातीं सापडला होता. त्यास शिवरायांनी मोठया सन्मानपूर्वक विजापुरला रवाना केलें. या झुंजाररावाचा बाप शहाजी राजांचा मोठा मित्र होता. स. १६६१ च्या पावसाळयानंतर आदिलशहा कर्नाटकांतील बंडें मोडण्याकरितां त्या प्रांतीं गेला तेव्हां हा झुंजारराव त्याच्या बरोबर होता.
पुढें (१६७५) हा व निंबाळकर यांनीं शिवरायांनी नुकतींच घेतलेलीं पन्हाळा वगैरे ठाणीं विजापूरकरांस परत घेऊन दिली पण शिवरायांनी झुंजाररावाचा पराभव करून तीं ठाणीं पुन्हां काबीज केलीं १६७८ शाहूच्या कारकीर्दीत घाटगे हे कोल्हापूरकर संभाजीकडे गेले. परंतु कोल्हापूरकराशीं त्यांचें नेहमीं भांडण चाले म्हणून ते पेशव्याशीं मिळून मिसळून असत. खडर्याच्या लढाईंत घाटगे हे आपले पथक घेऊन पेशव्यांकडे हजर होते.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २८

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २८
तात्या टोपे
तात्या टोपे
(? १८१४–१८ एप्रिल १८५९). इंग्रजांविरुद्ध मुकाबला करणारा १८५७ च्या उठावातील एक प्रसिद्ध सेनानी. संपूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग भट (येवलेकर). टोपे या त्याच्या उपनावाबद्दल तज्ञांत एकमत नाही. तथापि तत्संबधी दोन भिन्न मते आहेत :
(१) बाजीराव पेशव्याने त्यास मूल्यवान अशी टोपी दिली व ती तो अत्यंत जपत असे.
(२) काही दिवस त्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या तोफखान्यावर काम केले.
त्यावेळेपासून हे नाव रूढ झाले असावे. प्रथम तो पेशव्यांकडे तोफखान्यावर नोकरीस होता. सु. ३० वर्षे त्याने मध्य भारतात अनेक संस्थानिकांकडे तोफखान्यावर काम केले. पुढे तो ब्रह्मवर्त येथे नानासाहेब पेशव्यांकडे नोकरीस होता.
त्याने १८५७ मध्ये सैन्याची जमवाजमव करून नानासाहेब, लक्ष्मीबाई वगैरेंच्या मदतीने इंग्रजांशी अनेक ठिकाणी मुकाबला केला, काही महत्त्वाची स्थळे जिंकली आणि ग्वाल्हेर येथे नानासाहेबांची पेशवे म्हणून द्वाही फिरवली. १८५७ चा उठाव मीरत, दिल्ली, लाहोर, आग्रा, झांशी, ग्वाल्हेर इ. ठिकाणी पसरला.
उठावात तात्याने नानासाहेब पेशव्यांना संपूर्ण सहकार्य देऊन नानासाहेबांबरोबर वाराणसी, अलाहाबाद इ. ठिकाणी दौरे काढले. जून १८५७ मध्ये जनरल हॅवलॉकने कानपूरला वेढा दिला, त्या वेळी तात्याने महत्त्वाची कामगिरी बजावली; परंतु तात्या, रावसाहेब, ज्वालाप्रसाद यांचा १६ जुलै १८५७ रोजी पराभव होताच, तात्या व इतर मंडळी अयोध्येला गेली. त्यांनी कानपूरवर हल्ला करण्यासाठी विठूरला मुक्काम ठोकला; परंतु तेवढ्यात १६ ऑगस्ट १८५७ रोजी हॅवलॉक विठूरवर चालून गेला. तात्या व त्याचे सहकारी शौर्याने लढूनही इंग्रजांचाच जय झाला.
शिंद्यांचे सैन्य आपल्या बाजूला वळवून घेण्यासाठी तात्या व रावसाहेब ग्वाल्हेरला गेले. तेथून पुढे जाऊन त्यांनी काल्पी येथे छावणी केली. १८५७ च्या नोव्हेंबरमध्ये तात्याने कानपूरवर चढाई करून जनरल विनडॅमचा पराभव केला आणि कानपूर शहर ताब्यात घेतले; परंतु थोड्याच दिवसांत सर कोलिन कँबेलने अचानकपणे हल्ला करून तात्याचा पराभव केला. कानपूर जिंकण्याचा तात्याचा प्रयत्न फसला, तरी इंग्रजांना हैराण करण्याची त्याची जिद्द कमी झाली नाही.
याच सुमारास सर ह्यू रोझच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी झांशीला २२ मार्च १८५८ रोजी वेढा दिला. तात्या झांशीच्या लक्ष्मीबाईच्या मदतीस धावून गेला; परंतु ह्यू रोझ पुढे त्याचा निभाव लागला नाही. त्यांना माघार घ्यावी लागली. पुढे ते सर्व ग्वाल्हेरला गेले. तात्या, लक्ष्मीबाई व रावसाहेब यांनी एकत्र होऊन ग्वाल्हेरवर हल्ला केला. ग्वाल्हेर काबीज केले; पण सर ह्यू रोझने ते पचू दिले नाही. या युद्धात लक्ष्मीबाई मरण पावली. तात्याने यापुढे गनिमी काव्याने इंग्रजांना हैराण करण्याचे ठरविले. त्याला पकडण्यासाठी इंग्रजांनी त्याचा एक वर्षभर पाठलाग केला. या पळापळीत २१ जून १८५८ ते ९ ऑक्टोबर १८५८ पर्यंत जावरा, अलीपूर, राजगढ, इसागढ, चंदेरी, मंग्रौली इ. ठिकाणी तात्याने लढाया जिंकल्या.
१० ऑक्टोबर १८५८ रोजी मंग्रौली गावी तात्याचा पराभव झाल्यावर ललितपूर येथे त्याची व रावसाहेबाची गाठ पडली. इंग्रज त्याच्या पाठलागावर असताना त्या दोघांनी महाराष्ट्रात शिरण्याचा प्रयत्न केला. नागपूर, मंदसोर, झिरापूरवरून ते कोटा संस्थानात नाहरगढला गेले.
इंद्रगढला त्यांनी १३ जानेवारी १८५९ रोजी फिरोजशाहाची भेट घेतली. फिरोजशाह व तात्या देवास येथे थांबले. तेथे इंग्रजांनी छापा घातला. फिरोजशाहाने तात्याला सोडल्यामुळे, तात्या दोन स्वयंपाकी ब्राम्हण व एक मोतदार यांच्यासह शिंद्यांचा सरदार मानसिंग याच्या आश्रयास गेला; परंतु मानसिंगाच्या विश्वासघातामुळे जनरल मीडने तात्याला कैद केले. त्याला प्रथम सीप्री येथे नेण्यात आले. त्याची धैर्य व गंभीर वृत्ती शेवटपर्यंत ढळली नाही. सतत पराभव होऊनही तो शेवटपर्यंत डगमगला नाही. १८ एप्रिल १८५९ रोजी तात्याला फाशी देण्यात आले. तात्याबरोबरच १८५७ चा उठावही समाप्त झाला.
संदर्भ : Misra, A. S. Nana Saheb Peshwa and Fight for Freedom, Lucknow, 1961.
देवधर, य. ना.
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य याचा शोध भाग २७

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य याचा शोध
भाग २७
भोसले, चतुरसिंग
भोसले, चतुरसिंग
(? - १५ ऑगस्ट १८१८). उत्तर पेशवाईतील एक तडफदार सेनानी. त्याचे घराणे मूळ शिवाजी राजाच्या वंशातील. मालोजी भोसल्याचा धाकटा भाऊ विठोजी याच्या खापर पणतूचा मुलगा. याचा मोठा भाऊ विठोजी सातारच्या रामराजास १७७७ मध्ये दत्तक गेला. तोच पुढे दुसरा शाहू छत्रपती (कार. १७७७-९८) म्हणून प्रसिद्धीस आला. त्यामुळे चतुरसिंग बालपणापासून राजकीय वातावरणात वाढला. दुसऱ्या बाजीरावच्या वेळी (कार. १७९५-१८१८) सातारच्या गादीची होत असलेली अवहेलना त्यास सहन झाली नाही. त्याच्या मते पेशव्यांकडून सत्ता काढून घेऊन छत्रपतीचे हात बळकट करावेत, असे होते.
पुढे चतुरसिंगाने मराठी राज्याचा खरा स्वामी सातारचा राजा आहे, त्याने आपल्या हाती सर्व सत्ता घ्यावी, असा दावा मांडून तसेच सर्व मराठ्यांनी एकत्र येऊन इंग्रजांशी मुकाबला करावा, म्हणून त्याने मराठी राज्याच्या एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हिंडून हा विचार प्रसृत केला; तथापि नागपूरकर भोसल्यांशिवाय त्याला कोणीच फारसा प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांच्या मदतीने त्याने इंग्रजांशी असई व अशीरगड या ठिकाणी मातब्बर मुकाबला दिला; परंतु इंग्रजांनी त्याचा पाडाव करून त्याला कैद केले (१८०९). या त्याच्या उद्योगास काही इतिहासाकारांनी बंडखोरी असे म्हटले आहे.
तो अत्यंत धाडसी, स्वाभिमानी व पराक्रमी होता. १८०१ मध्ये सर्जेराव घाटग्याने त्यास सरदारकी द्यावी, अशी शिफारस दुसऱ्या बाजीरावाकडे केली होती पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्याला दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे एकूण धोरण नापसंत होते, म्हणून त्याने पुणे सोडले. पुढे यशवंतराव होळकराने जेव्हा पुणे लुटले, तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांची मदत घेतली (१८००). ही गोष्ट त्यास मानहानीकारक वाटली.
मराठी राज्याची विस्कटलेली घडी नीट बसावी व मराठा राजमंडळाचा उत्कर्ष व्हावा, म्हणून त्याने शिंदे, होळकर, नागपूरकर भोसले आदी मातब्बर सरदारांच्या भेटी घेतल्या. त्यांची मदत मिळावी, म्हणून तो चंबळ, अजमीर, दिल्ली वगैरे भागांत फौजफाटा घेऊन गेला; तथापि याच वेळी यशवंतरावास वेडाचे झटके आल्यामुळे त्याचे प्रयत्न निष्फळ झाले. दुसऱ्या शाहूच्या मृत्यूमुळे तर तो हताश झाला. पुढे काही वर्षे तो धार येथे राहिला आणि अखेर इंग्रजांशी मुकाबला करताना त्यांचा कायमचा कैदी बनला. सुमारे तेरा वर्षांचा तुरुंगवास सोसून तो तुरुंगातच मरण पावला.
संदर्भ सरदेसाई, गो. स. मराठी रियासत, उत्तर विभाग तीन, मुंबई, १९४७.
कुलकर्णी, गो. त्र्यं.

Tuesday 6 September 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २६

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २६
मुधोळकर घराण्याचा इतिहास

कालच वाचनात छत्रपति शिवजी महाराज यांच्या वंशावळीचा अभ्यास करत होतो तेव्हा भोसले व घोरपडे वंश कसे निर्माण झाले आणि मग बहमनी राज्य नंतर मालिक अंबर नंतर बाबाजी भोसले (भोसले शब्दाचा अर्थ) अल्लाउदीन हे दोन होते एक मुहम्मद तुघलक नंतर दिलीच्या तखतावर अल्लाउद्दीन खलजी अला तो आणि जाफर खान या सरदारने दक्षिणेस येऊन स्वता अल्लाउद्दीन हे नाव धारण करुन बहमनी राज्य स्थापन केले.यात दोन अलाउद्दीन झाले एक दिल्लीच्या तख्तावरचा आणि दूसरा जाफर खान.आता या जाफर खानाला सजनसिंह आणि त्याचा पुत्र दिलीपसिंह यांनी मदत केली.राज्य स्थापने नंतर यांना सरदारकी आणि खर्चास दौलताबादेतील दहा गावांची जहागिरि दिली .स.१३५२मधे सजनसिंह मरण पावला त्याचा पाचवा वंशज उग्रसेन म्हणून होता.त्यास दोन पुत्र कर्णसिंह व शुभकृष्ण होय.
कर्णसिंह व त्याचा पुत्र भीमसिंह हे बहमनी वजीर महमूद गावान याच्याबरोबर स.१४६९”खेळणा किल्ला” जिंकन्यास गेले असता कर्णसिंहने घोरपड़ लाऊन किल्ला हस्तगत केला.त्यामुळे महमद शहा बहमनी संपुष्ट होऊन.कर्णसिंह या युद्धात मारला गेला त्यामुळे त्याचा पुत्र भीमसिंह यास”राजा घोरपडे बहादुर”हा किताब व मुधोळ जवलील ८४गावाची जाहागिर नेमुन दिली.तेव्हापासून भीमसिंहाचे वंशज घोरपडे आडनाव प्राप्त होऊन त्याचे वास्तव मुधोलास झाले.ते अद्यापि चालु आहे.करणसिंहचा भाऊ शुभकृष्ण हा दौलतबाद कडील वेरूळ वतनांचा मालक होऊन त्यांचे वंशज भोसले उपनाव प्राप्त झाले.या भोसले आडनावाची उत्पत्ति निश्चित लागत नाही.शुभकृष्णचा तीसरा वंशज बाबाजी भोसले होय.या वरुन लक्षात येईल की मुधोलकर घोरपडे व सातरकर भोसले ही दोन्ही घराणी एकाच सिसोदे येथील राणा वंशाच्या दोन शाखा असून घोरपडे वडील व् भोसले कनिष्ट घोरपड्यांनी मुसलमानाच्या तावेदारित कृतार्थता मानली आणि भोसल्यानी मुसलमानाचा पाडाव करुन स्वतंत्र राज्य स्थापिले या कारणास्थव या दोन शाखांत भाई बंदकीचे कलह बहुदा कायमचेच राहिले.
शुभकृष्णचा वंशज बाबाजी भोसले यांचा जन्म इ.स.१५३० मध्ये झाल्याचा समजतात.बाबजीने जमीन वैगरे दान दिली याचे कागद पत्र आहेत.बाबाजी यांना दोन मुले मालोजी भोसले आणि विठोजी भोसले त्यांच्या पासूनचा इतिहास व्यववथित सापड़तो.
(भोसे नामक गांव किवा भोसाजी नामक व्यक्ति या पासून भोसले शब्द निघाला असे सांगतात ते विशेष संयुक्तित दिसत नाही.तसेच भोसल,भूशवल इत्यादी प्रकारचे संस्करण कविने केलेले नीरनिराळ्या ग्रंथात आढ़लते.कोणी भोसले शब्द “होयसल”नावाचा अपभ्रंश मानतात)(मुधोलकर घराण्याचा इतिहास :-द.वि.आपटे कृत)
संदर्भ:-मराठी रियासत

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २५




हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २५

विठोजी भोसले

मालोजीच्या जहागिरीची जबाबदारीही त्याच्यावरच होती. त्याने शाहजीचे लग्नसिंदखेडच्या लखुजी जाधवरावांसारख्या मोठ्या सरदाराबरोबर लावून दिले.त्यानंतर शरीफजीचे लग्नही विश्वासरावांची कन्या दुर्गाबाई बरोबर करून दिले.
विठोजीला त्याची पत्नी आऊबाई, हिच्याकडून आठ मुले होती. त्यांची नावेसंभाजी, खेळोजी, मालोजी, मंबाजी, नागोजी, परसोजी व कक्काजी अशी होती. शाहजीव शरीफजीच्या लग्नानंतर काही वर्षांनी विठोजी मृत्यू पावला. नेमका दिनांकउपलब्ध नसला तरी २४ मे १६२१ ते २३ फेब्रुवारी १६२३ च्या मधे कधीतरी ही घटनाघडली असे दिसते.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ४६४

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २४


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २४

!! राजेलखुजीराव जाधवराव !! -: आऊसाहेबांचे वडील :-

सिंद्खेडकर राजेजाधवराव यांचे घराणे हे मुळ देवगिरीच्या यादव वंशाचीच 1 शाखा आहे.देवगिरीचे सार्वभौम राज्य नष्ट झाल्यानंतर शंकरदेव ह्यांचे पुत्रगोविंददेव जाधव नंतर लखुजीराव यांनी जाधव घराण्याला उर्जितावस्था मिळूनदिली. त्यांचे नाव लक्ष्मन्देव/लक्ष्मनसिंह असे होते,परंतु ते लखुजीजाधवराव याच नावाने प्रसिद्ध आहेत.
!! राजेलखुजीराव कुलव्रुत्तांत !!
जन्म:- यांचा जन्माची नोंद इतिहासाला माहिती नाही,परंतु मृत्यू समयी (25 july 1629) त्यांचे वय 80 वर्ष होते, त्यांचा जन्म सन १५५० साली झाला हेग्राह्य समजणे उचित होईल.
*मृत्यू(death):-२५ जुलै १६२९,निझामाने देवगिरी किल्ल्या वर निशस्त्रराजेलखुजीराव,त्यांचे २ पुत्र- राजेअच्लोजी, राजेराघोजी आणि १ नातूराजेयशवंतराव(son of rajedattaji) यांची हत्या केली.
*राजे लखुजीराव जाधवराव ह्यांचा वडिलांचे नाव : राजेविठोजीराव ,
*लखुजीराजे जाधव ह्यांचा आईचे नाव: ठाकराईराणी ,
*भावाचे नाव : राजे भूतजी ,
*राजे लखुजीराव जाधव ह्यांचा पत्नीचे नाव: महाल्साबाई/गिरिजाबाई, यमुनाबाई, भागीरथीबाई ,
* राजे लखुजीराव जाधव ह्यांचा अपत्यांची नावे:-
1) राजेदत्ताजीराव 2) राजेअचलोजीराव 3) राजेबहादुर्जी 4) राजेराघोजी
5) स्वराज्याप्रेरिका राजमाता जिजाऊ मासाहेब
राजेलखुजीराव यांचे ४ पुत्र यांच्या वंशजाची गावे :-
1) राजेदत्ताजी-¤ जवळखेडा ,¤ उमरद(देशमुख) तालुका-सिंदखेडराजा ,करवंड ता चिखली,भुईँज(सातारा),
2)राजेअचलोजी-¤मेहुनाराजा ¤ आडगावराजा तालुका-सिंदखेडराजा ¤माळेगाव (near baramati) ¤मांडवे (जि सातारा) ¤ वाघोली-वाडी (पुणे)
3) राजेबहादुरजी :- ¤ देऊळगावराजा ¤ सिँदखेडराजा ¤ माहेगाव(देशमुख)(कोपरगाव)
4) राजेराघोजी :- माहिती उपलब्ध नाही !! ¤¤ राजेभुतजी / जगदेवराव (brother of rajelakhuji) यांचे वंशज = ¤ किनगावराजा, ¤ दिल्ली

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २३


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २३

!! राजेलखुजीराव जाधवराव !!

सिंद्खेडकर राजेजाधवराव यांचे घराणे हे मुळ देवगिरीच्या यादव वंशाचीच १शाखा आहे.देवगिरीचे सार्वभौम राज्य नष्ट झाल्यानंतर शंकरदेव ह्यांचे पुत्रगोविंददेव जाधव नंतर लखुजीराव यांनी जाधव घराण्याला उर्जितावस्था मिळूनदिली. त्यांचे नाव लक्ष्मन्देव/लक्ष्मनसिंह असे होते,परंतु ते लखुजीजाधवराव याच नावाने प्रसिद्ध आहेत.
!! राजेलखुजीराव कुलव्रुत्तांत !!
जन्म:- यांचा जन्माची नोंद इतिहासाला माहिती नाही,परंतु मृत्यू समयी (25 july 1629) त्यांचे वय 80 वर्ष होते, त्यांचा जन्म सन १५५० साली झाला हेग्राह्य समजणे उचित होईल.
राजेलखुजीराव व त्यांचे दोन पुञ व एक नातुयांचा खुन निजामाने विश्वासघाताने बोलावुन देवगिरीवर भर दरबारात 25 जुलै 1629 रोजी केला.हमीद खान वजिराच्या सल्ल्यावरुन निजामशहाने राजेलखुजीरावयाना कैद करण्याचे ठरविले व त्याने राजेलखुजीराव याना भेटीस येण्याविषयीबोलावणे पाठविले.निजामाच्या मायावीपणाने राजेलखुजीराव त्यांच्या घरच्यामंडळीसह दौलताबादेस गेले व शहराबाहेर तळ ठोकुन राहिले आणी त्यांचे बंधुराजेभुतजी /जगदेवराव कोतुळुकच्या तळ्यावर उतरले.ठरलेल्या दिवसी म्हणजे 25 जुलै 1629 रोजी राजेलखुजीराव स्वत: व त्यांचे दोन पुञ राजेअचलोजी वराजेराघोजीराव आणी एक नातु राजेयशवंतराव (SON OF RAJEDATTAJIRAO) आणी काहीआप्तस्वकियाबरोबर किल्ल्यावर गेले.राजदरबाराच्या बाहेर राजेलखुजीराव यानाअसे समजावण्यात आले कि,"हुजुर स्वारीस तुमचे भय वाटते.तुम्ही पहार्यावरहत्यारे ठेऊन आत गेल्याखेरीज हुजुर तुमची भेट घेणार नाहीत." राजेलखुजीरावयांच्या मनात काहिच संशय किँवा पाप नसल्यामुळे त्यानी आपली तलवार सोडुनठेवली व इतरानी देखिल तसेच केले.सर्वजण निःशस्ञ आत गेल्यावर निजामाची भेटझाली.निजाम क्षणभर बोलुन दरबारातुन निघुन गेला.तोच त्या दिवाणखान्यातमारेकरी घुसले व राजेलखुजीराव याना कैद करु लागले.80 वर्ष वय असणारेराजेलखुजीराव मराठा क्षञिय बाण्याने कैदेपेक्षा म्रुत्यु बरा असे मानुन तेआत्मसंरक्षणास सज्ज झाले.मारेकरी सशस्ञ होते.त्यानी क्रुरपणे तलवारीचालवल्या.राजेलखुजीराव व त्यांच्यासोबत असणारे आप्तवर्ग यांच्या कमरेस फक्तकट्यारी होत्या.त्या कट्यारीच्याच जोरावर त्यानी मारेकर्यावर हल्ला चढवुनमारता मारता गतप्राण झाले.यात राजेलखुजीराव व त्यांचे दोन पुञ राजेअचलोजी वराजेराघोजी आणी एक नातु राजेयशवंतराव व दुसरे आप्तीष्ट विश्वासघातानेमारले गेले.ही बातमी त्यांचे बंधु राजेजगदेवराव ,त्यांचे 3रे पुञराजेबहादुरजी आणी त्यांचे नातु याना कळताच ते तात्काळ स्वार होऊनसिँदखेडराजास निघुन गेले.
लष्करात राजेलखुजीराव यांच्या पत्नी म्हाळसाईराणीसाहेब एकट्याच होत्या.ही भयंकर बातमी समजली तरी धीर सोडुन आक्रोश करीतन बसता त्यानी लोकोत्तर धैर्य दाखवुन शञुच्या देखत राजेलखुजीराव व त्यांचे 2पुञ व एक नातु यांचे प्रेते राजेजगदेवराव यांच्या मदतीने घेऊनसिँदखेडराजास लष्करासह परत आल्या.ऐँशी वर्षाचे व्रुद्धवीर राजेलखुजीरावजाधवराव लढता लढता धारातिर्थी पतन पावले परंतु यवनाच्या हाती जिवंतपणेसापडले नाहीत.सिँदखेडराजा येथे विधिवत अंत्यसंस्कार केला.त्यांचे बंधुराजेभुतजी /जगदेवराव यानी इ स 1630 मध्ये त्यांची समाधी बांधकाम सुरु केले वराजेजगदेवराव यांच्या पश्चात म्हणजे इ स 1640 मध्ये या समाधीचे बांधकामपुर्ण झाले . आज 25 जुलै राजेलखुजीराव व त्यांचे 2 पुञ राजेअचलोजी वराजेराघोजीराव आणी एक नातु राजेयशवंतराव यांचा 384 वा स्म्रुतीदिनत्यानिमित्त मानाचा ञिवार मुजरा व विनम्र अभिवादन.
संदर्भ :-
1)वर्हाडाचा इतिहास-या मा काळे पेज 323
2) GRANT D.H.M.P. page 79,
3) पातशहा नामा..

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २२


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २२
मालोजी भोसलेचा मृत्यू
शाहजीच्या जन्मानंतर थोड्या वर्षांनीच मालोजीचा मृत्यू झाला. उपलब्धसाधनांमधे ह्या घटनेचा नेमका दिवस सापडत नाही. शाहजीच्या जन्मानंतर पाचवर्षांनी मालोजी वारला असे शिवभारतात म्हंटले आहे. शाहजीचा जन्म सन १५९९ चाधरला तर ह्या घटनेला सन १६०४ च्या आसपास बसवावे लागते. पण इतरसाधनांप्रमाणे मालोजी २३ मे १६१० पर्यंत जिवंत होता. त्यामुळे उपलब्धसाधनांआधारे मालोजीचा मृत्यू इंदापूरजवळच्या एका लढाईत ११ नोव्हेंबर १६११पूर्वी झाला असे म्हणता येईल.
मालोजीची पत्नी उमाबाई सती गेली नाही.बहुदा दोन लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी तिने हा निर्णय घेतला असावा.ह्या दुखद घटनेनंतर मालोजीचा भाऊ विठोजी, याने शाहजी व शरीफजीचा सांभाळकेला. त्याने निजामशाहकडून मालोजीची जाहगीर त्यांच्या नावे मिळवून दिली.दोन्ही मुले लहान असल्याने विठोजीला जाहगिरीची देखरेख करण्याकरीता नेमण्यातआले.

परमानंद कवींनी मालोजींचे फार प्रभावीपणे वर्णन केले आहे. (शिवभारतात)
देवगिरीकर यादवांचा १४ व्या शतकाच्या सुरुवातीसच अल्लाउद्दीन खिलजीनेविशेषत: त्याचा लाडका सरदार मलिका काफूर यास पाठवून पाडाव केला होता.त्यानंतर जवळजवळ तीनशे वर्षांचे आत मालोजींनी सुपे परगणा जिंकला होता.भीमेच्या आसपासचा अत्यंत विस्तीर्ण प्रदेश पादाक्रांत करून जिंकून जहागिरीप्रस्थापित केली होती आणि काही वर्ष सत्ता राबवली. दुर्दैवाने इंदापूरयेथील लढाईत त्यांचा मृत्यू झाला. आज ज्यांची समाधी जेमतेम दोन तीन गुंठाजमिनीवर दुर्लक्षित, उपेक्षित, असुरक्षित स्थितीत आहे.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २१

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २१

मालोजी राजे भोसले आणि लखुजी राजे जाधव यांचे नाते संबंध
लखुजी राजे जाधव राव यांना मुलगी झाली ती एक तेजस्वी कन्या होती . यातेजस्वी बालिकेच्या बर्ष्याचा बर उडवून देण्याचा निश्यच झाला . सगळ्या पै -पाहुण्यांना आमंत्रणे जाऊ लागली . यात मालोजी राजे भोसले यांना हि आमंत्रणदिले गेले . लखुजी राजे व मालोजी राजे यांचे याच काळात नातेसंबंधप्रस्थापित झाले. लखुजी राजे जाधव यांची एक पत्नी वनगोजी निंबाळकर यांचीबहिण होती , तिचे नाव होते म्हाळसाराणी . तसेच लखुजी राजे जाधवांच्यामध्यस्थीमुळेच वनगोजी निबाळकरानी आपली कन्या दीपाबाई मालोजी राजे भोसलेयांना देऊन नाते संबंध जोडले होते . म्हणजे लखुजी राजे जाधव यांची पत्नीम्हाळसा राणी वनग्प्जी निबाळकरांची बहिण तर मालोजी राजे भोसले यांची पत्नीदीपाबाई हि वनगोजी निबाळकरांची मुलगी होती . या दोघींचे आत्या भाचीचे नातेहोते . म्हणून विशेष दूत पाठवून लाखुजीराजे जाधवांनी मालोजी राजे भोसलेयांना आमत्रण दिले होते .
या बारश्याला मालोजी राजे यांच्या पत्नीउमाबाई आपल्या चार - पाच वर्षाच्या शहाजीला घेऊन आल्या होत्या , शहाजीबाळाचा गोरा रंग सर्वाना दंग करून टाकणारा होता तजेलदार चेहरा , तरतरीत नाक , आणि डोळ्यातील विलक्षण तेज हे राजबिंड रुपड या बारश्याच्या कार्यक्रमातसर्वांचा कौतुकाचा विषय बनला होता . मालोजी राजे यांच्या प्रमाणेच हा बालशहाजी पुढे महापराक्रमी निघेल , याची त्यांना आशा लखुजी राजे जाधव यांनावाटली आणि ते व मालोजी राजे पूर्वजांच्या पराक्रमी इतिहासात रमून गेलेमालोजी राजे हे लखुजी राजे यांच्या तोलामोलाचे नातेवाईक आणि सरदार होते
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

Monday 5 September 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २०


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २०

राजे लखुजी आणि त्यांचे पूर्वज

राजे विठोजिच्या मृतुनंतर सन १५७० मध्ये राजे लखुजी हे वडिलोपार्जितजहागीर दारीवर आले . लखुजी राजांचा जन्म १५५० च्या सुमारास झाला असण्याचीशक्यता वर्तवली आहे . आणि त्यांचा मृतू १६२९ मध्ये झाला .
राजे लखुजीयांच्या काळ अर्थात १५७० ते १६२९ हा होता . ५९ वर्षाच्या या काळ खंडातलाखुजीनी सिंधखेद येथे आपल्या घराण्याची स्वतंत्र शाखा आणि राज्य स्थापनकेले . या नगरीला त्यांनी " सिधखेडराजा" नाव दिले . सिद्धखेडराजा हे नगर , हे जीजू यांचे जन्मगाव ! हल्ली ते राजमाता लोकमाता जिजाऊ यांचेपुण्यक्षेत्र आणि तीर्थक्षेत्र बनले आहे .
राजे लखुजी जाधव रावांचेघराणे चंद्र्कुलातील सुविख्यात घराणे . महाराष्ट्रातील मराठा क्षत्रियकुळातील एक मातब्बर घराणे . अनेक शूरवीर पुव्र्जांच्या पराक्रमाने यादव -जाधव घराण्याचा इतिहास गाजलेला आहे . यांचा मोठे पण स्पष्ट करतानाम्हलारराव होळकर लखुजी राजाना म्हणतात, " तुम्ही मराटे यांची कासी आहात . "भारतात हिंदुना जे काशीचे महत्व आहे तेच या भाव विश्वात "सिधखेडराजा " यानगरीला आहे . राजे लखुजी जाधवराव यांना या जाधव घराण्याचे इतिहास प्रसिद्धसुर्वीर पुरुष मानले जाते .

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९

राजे लखुजी आणि त्यांचे पूर्वज

क्षत्रियांचे प्रमुख दोन वंश होते . एक म्हणजे सूर्यवंशी दुसरे म्हणजे चंद्रवंशी ,
सूर्य वंशात श्री राम यांनी आणि चंद्रवंशात श्री कृष्ण यांनी युग निर्माणाचे एतिहासिक कार्य केले.
चंद्र वंशात "यदु " नावाचा ययाती - देवयानीचा महापराक्रमी पुत्र, या " यदु " राज्याच्या नावावरूनच या पिढीचे पुढे "यादव " हे नाव पडले , म्हणजेचयादव वंशाची सुरुवात झाली .
राजे लखुजी जाधव यांच्या घराण्याचासंबंध थेट श्री कृष्ण यादवांशी जोडला जातो , तसेच देवगिरीच्या यादव वंशाशीहि यांचा सबंध त्याच पद्धतीने लावला जातो .
देवगिरीचे रामदेव रावयादव याचा अल्लौउदिन खिलजीने पराभव केला होता तरी त्यांना "राय रायन " हामानाचा किताब देऊन सन्मानाने वागविले . राम देवाच्या स्वभिनानी पुत्रानेशंकर् देवाने स्वातंत्र्यासाठी बंड केले पण त्यात तो अपयशी ठरला आणि शंकरदेवाच्या वधा बरोबारच देवगिरीचे राज्य हि बुडाले , पुढे शंकर देवाचे पुत्रगोविंद राव यांनी हि स्वातंत्र्यासाठी बंड केल्याचे इतिहासत आढळून आले आहेपण तो हि पराभव झाल्याने गुजरात मध्ये पळून गेला . आणि याच गोविंदराव पासून "यादव " घराण्याचे नाव "जाधव " घराणे म्हणण्याचा प्रघात पडला .
देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंधखेडकर राजे लखुजी जाधव रावांचे घराणे हिएक उपशाखा आहे . राजे लखुजी व भूतजी राजे हे दिघे महापराक्रमी भाऊ भाऊ होतेत्यांचे वडील विठोजी राजे उर्फ विठ्ठलदेव असल्याचे सिधखेडराजा येथील लखुजीराजांच्या समाधी स्थळावर शिलालेखात स्पष्ट नोंदविलेले आहे

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८



हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८

वेरुळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले आणि घृष्णेश्वराचे मंदिर:-

सुमारे चारशे वर्षापूर्वीची गोष्ट .वेरुळच्या
लेण्याजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते.त्यांच्या
भिंतीना भेगा पडल्या होत्या.मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून
गेला होता.एवढे महान दैवत ! पण कोण अवकळा आली होती.त्या
मंदिरावर.त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे.येणारे जाणारे ही
हळहळत,उसासे सोडत,पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो?
त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे.
शिवाच्या पिंडीवर बेलफुल वाहत असे.हात जोडून आपल्या मनातले
श्रीशिवाला सांगत असे.एक दिवस त्याने गडीमानसे आणली.मंदिराच्या
पडक्या भिंती नीट केल्या.मंदिराची सारी व्यवस्था लावली.घृष्णेश्वराचा
जीर्णोद्धार केला.मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले.घृष्णेश्वराचे गेलेले
वैभव परतले .हे कोणी केले ? कोण होते हे शिवभक्त ? ते होते
मोलोजी भोसले

वेरुळचे भोसले : वेरुळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर
शिवभक्त होते. विठोजीराजे त्यांचा धाकटा भाऊ.वेरुळच्या बाबाजीराजे
भोसल्यांची ही मुले.वेरूळ गावची पाटीलकी बाबाजीराजे भोसाल्यांकडे
होती.
मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते,तसेच ते शूर होते.
त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते.तो काळ फार धामधुमीचा
होता.निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाहाने स्वारी केली होती.त्या
वेळी दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती.तेथे मालिक अंबर
नावाचा त्याचा वजीर होता.तो मोठा कर्तबगार व हुशार होता.त्याने
दौलताबादजवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली.त्याने
निजामशाहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केला.निजामशाहाने
मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्यांची जहागिरी दिली.
भोसल्यांच्या घरी वैभव आले.उमाबाई ही मालोजीराजांची पत्नी .ती
फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती.या उभयतांना दोन मुलगे होते.
एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी .शहाजी पाच वर्षाचा
असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले.विठोजीराजांनी
आपल्या पुण्यांचा आणि जाहीगीरीचा सांभाळ केला.पुढे त्यांनी
शहजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली.जाधवांची
लेक जिजाई मोठी सुलक्षणी होती.जिजाईसाठी विठोजीराजांनी घातलेली
मागणी लखुजीरावांनी स्वीकारली.लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर
व पराक्रमी सरदार होते.ते मोठे फौजफाटा बाळगून होते.निजामशाहाच्या
दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती.त्यांनी शहाजीराजे आणि जिजाई यांचा
विवाह मोठ्या थाटात साजरा केला.जिजाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली.
शहाजीराजे :-निजामशाहीने मालोजीराजांची जहागिरी शहाजीराजांना
दिली.शहाजीराजे पराक्रमी होते.निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान
होता.उत्तरेच्या मुघल बादशाहाने निजामशाही जिंकायचा बेत केला.
विजापूरचा आदिलशाहाही त्याला मिळाला,तेव्हा निजामशाही
वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले.दोन्ही
फौजांचा त्यांनी पराभव केला.अहमदनगरजवळ भातवडी येथे प्रसिद्ध
लढाई झाली.या लढाईत शरीफजी मारले गेले,पण शहाजीराजांनी मोठा
पराक्रम गाजवला.त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक
झाला.दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली.इतकी की खुद्द मलिक
अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून उभयतांत वितुष्ट
निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या
आदिलशाहीला जाऊन मिळाले. आदिलाशाने त्यांना ‘सरलष्कर’ हा
किताब देऊन त्यांचा सन्मान केला.पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी
झाल्या.वजीर मलिक अंबर मृत्यू पावला.त्याचा पुत्र फत्तेखान हा मोठा
कारस्थानी होता.तो आता निजामशाहीचा वजीर झाला.त्याच्या
काळात निजामशाहीला उतरती कळा लागली.मुघलांच्या स्वारीचा धोका
निर्माण झाला.त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहाच्या आईने
शहजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले,तेव्हा शहाजीराजे
आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७

"रायप्पा महार"

रायप्पा महार हे छत्रपती संभाजी महाराजांचे अगदी खास सेवक होते अगदी जसे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी"मदारी मेहतर"
छत्रपती संभाजी महाराजांना अटक करून तुळापुरहून बर्हानपूरला नेण्यात आले तेव्हा रायप्पाना सहन झाले नाही ते महाराणी येसूबाईना म्हणाले
मी काही झाले तरी माझ्या राजापाशी जाणार
त्यानंतर त्यांनी थेट बऱ्हाणपूर गाठले आणि मुघली सैनिकांच्या वेशात त्यांच्या मधी मिसळून छत्रपती संभाजी महाराजांना भेटण्याची संधी शोधू लागले
त्यानंतर बऱ्हाणपूरला जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची धिंड काढण्यात आली तेव्हा रायाप्पाना ते सहन झाले नाही, त्यांच्या अंगात वीरश्री संचारली,तळपायाच ी आग मस्तकात गेली , आपल्या धान्याचा हा अपमान ........
आणि त्यांनी थेट छत्रपती संभाजी महाराजांजवळ धाव घेऊन तलवार उपसली आणि आजू बाजूचे गनीम कापून काढण्यास सुरवात केली त्यांच्या वर हि वार झाले पण जीव सोडे पर्यंत त्यांनी १५-२० जन यमसदनी धाडले होते
जेव्हा तुळापुरात छत्रपती संभाजी महाराजांना अग्नी देण्यासाठी त्या रात्री जमिनीची आवश्यकता होती तेव्हा औरंग्याच्या दहशतही खाली कोणी धजावत नव्हते , तेव्हा याच रायप्पा महाराच्या भावाने स्वताची जमीन वापरण्यास सांगितली.- संभाजी राजे(The Great Maratha)'s

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १६


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १६

मराठे सरदार भोसल्याचे कर्तबगार घराणे
धामधुमिचाकाळ :-
संतांनी लोकांच्या मनांत भक्तीभाव निर्माण
केला.तर शूर मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली.
तो काळच मोठा धामधुमीचा होता.विजापूरचा आदिलशहा आणि
अहमदनगरचा निजामशाहा ह्या सुलातांनामध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया
होत.लढाईसाठी त्यांना फौज लागे.ह्या कामी ते मराठा सरदाराचा
उपयोग करून घेत.
शूर मराठे सरदार : मराठे काटक व शूर होते.तसेच ते धाडसी
होते,स्वामिनिष्ठ होते.लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना
मोठा अभिमान वाटे. हातात भाला,कमरेला तलवार असे हे धाडशी
मराठा जवान घड्यावर मांड घालून सरादारांच्या फौजेत दाखल होत.
मराठे सरदार फौजबंद असत.कोणताही फौजबंद मराठा सरदार
सुलतानाकडे गेला,की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला
सरदारकी देई.कधीकधी जहागिरीही देई.जहागिरी मिळालेले सरदार
स्वत:ला आपल्या जहागिरीचे राजे समजत.
विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे
मराठे सरदार होते.त्यांत सिंदखेडचे जाधव,फलटणचे निंबाळकर,
मुधोळचे घोरपडे,जावळीचे मोरे,वेरुळचे भोसले हे प्रमुख होते.
सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज.जिजाई सिंदखेडच्या लखुजी जाधवांची मुलगी होती.
शौर्याची परंपरा :-हे सारे सरदार शूर वीर होते,पण आपापसात
त्यांचे हाडवैर असे.स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी
त्यांना नव्हती.त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत.
असे,पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी
पराक्रमाची गोडी लावली.त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले.मराठे
सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले.महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी
वेरूळ चे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले.