Total Pageviews

60,693

Monday, 5 September 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १६


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १६

मराठे सरदार भोसल्याचे कर्तबगार घराणे
धामधुमिचाकाळ :-
संतांनी लोकांच्या मनांत भक्तीभाव निर्माण
केला.तर शूर मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली.
तो काळच मोठा धामधुमीचा होता.विजापूरचा आदिलशहा आणि
अहमदनगरचा निजामशाहा ह्या सुलातांनामध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया
होत.लढाईसाठी त्यांना फौज लागे.ह्या कामी ते मराठा सरदाराचा
उपयोग करून घेत.
शूर मराठे सरदार : मराठे काटक व शूर होते.तसेच ते धाडसी
होते,स्वामिनिष्ठ होते.लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना
मोठा अभिमान वाटे. हातात भाला,कमरेला तलवार असे हे धाडशी
मराठा जवान घड्यावर मांड घालून सरादारांच्या फौजेत दाखल होत.
मराठे सरदार फौजबंद असत.कोणताही फौजबंद मराठा सरदार
सुलतानाकडे गेला,की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला
सरदारकी देई.कधीकधी जहागिरीही देई.जहागिरी मिळालेले सरदार
स्वत:ला आपल्या जहागिरीचे राजे समजत.
विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे
मराठे सरदार होते.त्यांत सिंदखेडचे जाधव,फलटणचे निंबाळकर,
मुधोळचे घोरपडे,जावळीचे मोरे,वेरुळचे भोसले हे प्रमुख होते.
सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज.जिजाई सिंदखेडच्या लखुजी जाधवांची मुलगी होती.
शौर्याची परंपरा :-हे सारे सरदार शूर वीर होते,पण आपापसात
त्यांचे हाडवैर असे.स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी
त्यांना नव्हती.त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत.
असे,पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी
पराक्रमाची गोडी लावली.त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले.मराठे
सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले.महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी
वेरूळ चे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले.

1 comment:

  1. घाटगे घराणे बहमनी कालीन मनसबदार घराणे सरदार वजीर सुभेदार संस्थानिक घराणे प्रमुख आहे

    ReplyDelete