Total Pageviews

Sunday 2 December 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २००

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २००
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग
सांभार :www.marathidesha.com

अफझलखानाच्या वधानंतर शिवरायांनी खानाच्या शवाचे इस्लामी पद्धतीने अंत्यसंस्कार करुन त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.तर अफझलखानाच्या वधानंतर खानाचा मुलगा व इतर सरदारांना पळून जाण्यास मदत करणार्‍या खंडोजी खोपडेला महाराजांनी डावा पाय आणि उजवा हात तोडण्याची प्रतापगडावर शिक्षा दिली.
पन्हाळगडची लढाई
इ.स.२ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते.मुसळधार पावसात सुध्दा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता.या कठीण प्रसंगी महाराजांनी सिध्दीस तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिध्दी गाफील राहिला.शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिध्दी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला.शिवा काशीद चे खरे रूप कळल्यावर सिध्दीने त्यांस ठार केले,तोवर छत्रपती विशाळगडाच्या वाटेवर होते.
छत्रपती शिवरायांनी पन्हाळ्यावरून,विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्या- नंतर,सिद्दीने,सिद्दी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला.मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले,अशावेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितले.घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली,शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू,फ़ुलाजी,संभाजी जाधव,बांदल यांनी मोठा पराक्रम गाजविला.
महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला.इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा आवाज ऎकल्यानंतरच समाधानाने आपला जीव सोडला.या युध्दात मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले तर मसूदचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले.बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाली.
पावनखिंडीतील विजयी स्मारक

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९९

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९९
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग
सांभार :www.marathidesha.com

अफझलखानांस घाबरून मसूरचे जगदाळे, उत्रोळीचे खोपडे आदि खानाला मिळाले तर कान्होजी जेधे (संदर्भ:जेधे शकावली)सारखे मावळातील बहूसंख्य इमानी वतनदार महाराजांना सामील झाले.आपल्या जीवाचे बरेवाईट होईल हे जाणून जिजाऊंच्या ताब्यात राज्यकारभार देऊन आपल्या सहकार्‍यांना भावी काळासाठी त्यांनी सूचना दिल्या.
खानाला आपण फार घाबरतो आणि आपल्याकडून खूप अपराध झाल्यामुळे आपण खानास भेटावयास जाण्याऐवजी खानानेच आपल्या भेटीस प्रतापगडाच्या पायथ्याशी यावे, असा आग्रह शिवरायांनी केला.शिवरायांच्या नम्रतेच्या निरोपामुळे व स्वत:च्या सामर्थ्याची घमेंडीमुळे अफझलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी यावयास तयार झाला.
भेटीच्या वेळी दोन्हीकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि यावेळी सर्वांनी निशस्त्र राहण्याचे ठरले.१० नोव्हेंबर १६५९ या दिवशी छत्रपती शिवराय भेटीसाठी खानाला सामोरे गेले असता धिप्पाड खानाने अलिंगन देण्याचा बहाणा करून शिवरायांचे मस्तक काखेत दाबून दुसर्‍या हाताने कट्यारीचा वार शिवरायांच्या शरीरावर केला.शिवरायांनी अंगरख्याच्या आत घातलेल्या चिलखतावर हा वार बसला.खानाचा दगा लक्षात येताच शिवरायांनी उजव्या हातातील वाघनख्यांनी वार करून खानाचे पोट फाडून आतडी बाहेर काढली.
खान'दगा दगा'असे ओरडत आतडी सावरीत बाहेर आला असता,खानाचा अंगरक्षक सय्यद बंडाने शिवरायांवर केलेला वार शिवरायांचा अंगरक्षक जिवा महालाने वरच्यावर अडवून सय्यद बंडाला ठार केले.पालखीत बसून पळून जाणार्‍या खानाचे मुंडके संभाजी कावजी याने उडविले.महाराज गडावर जाताच तोफेचा आवाज करण्यात आला आणि खानाच्या बेसावध सैन्यावर दाट जंगलात लपून बसलेल्या मावळयांनी तुटून पडून त्यांची दाणादाण उडविली.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९८


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९८
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग
सांभार :www.marathidesha.com

चंद्रराव मोरेचा बंदोबस्त
जावळीचा चंद्रराव मोरे हा आदिलशहाचा चाकर होता,त्याच्या त्रासाने जावळी खोर्‍यातील जनता त्रस्त झाली होती.मोरे याचा पाडाव करून शिवाजी महाराजांनी जावळी काबिज केली,शके १५७७ पौष वद्य चतुर्दशी मंगळवार १५ जाने १६५६ (संदर्भ:जेधे शकावली).यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला.महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला.कैदेतील मोरे आदिलशाहीशी गुप्तरुपाने पत्रव्यवहार करताना सापडल्यामुळे महाराजांनी त्याला ठार केले.रायरीवरील विजयाने महाबळेश्वर ते रायगडापर्यंतच्या कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.
प्रतापगडची लढाई
आदिलशाहच्या ताब्यातील चाळीस किल्ले इ.स.१६५९ पर्यंत छत्रपतींनी जिंकले होते,या कालावधीत त्यांनी मुघलांशी नरमाईचे धोरण ठेवले.शिवरायांना नेस्तनाबूत करण्यासाठी अफझलखान या सरदारास आदिलशहाने पाठविले. शिवरायांना कैद करून विजापूरात घेऊन येण्याची प्रतिज्ञा करून अफाट सैन्यासह खान स्वराज्यावर चालून आला.स्वराज्यात येताना खान तुळजापूर,पंढरपूर आणि वाटेतील इतर गावातील देवस्थानाची तोडफोड करत, वाईला तळ ठोकून राहिला.
खानाच्या प्रचंड अशा सैन्याशी समोरासमोर लढण्याची ताकद त्यावेळी शिवरायांकडे नव्हती.याच अफझलखानाने शहाजीराजांना कैद करून अपमानास्पदरितीने बेड्या ठोकून विजापुरात नेले होते तर कनकगिरीच्या वेढ्यात शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांचा खानामुळे मृत्यू झाला होता.
याच प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपतीं शिवरायांनी खानाचा वध केला होता

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९७

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९७
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग
सांभार :www.marathidesha.com

बेंगलोरहून परत आल्यानंतर शिवरायांनी बारा मावळ(राजमाची व चाकण येथून दक्षिणेस रायरेश्वराचा डोंगर,अंबेडखिंड,खंबाटकीचा घाट येथपर्यंत पुण्याजवळचा मुलूख) खोऱ्यात राहणार्‍या आपल्या सवंगड्याना सोबत घेऊन स्वत:ची फौज तयार केली.वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी इ.स.२७ एप्रिल १६४५ साली त्यांनी भोरजवळच्या,रायरेश्वराच्या पठारावर स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली.
छत्रपती शिवरायांनी सुरवातीच्या कालखंडामध्ये तोरणा,सिंहगड,चाकण आदी किल्ले आदिलशहाकडून जिंकून आपल्या वर्चस्वाखाली आणले.आदिलशहाने शिवाजीराजांना आळा घालण्यासाठी फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवरायांवर हल्ला करण्यास पाठविले शिवाय विश्वासघाताने शहाजीराजांना कैद केले.
पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला.यावेळी आपल्या मुसद्दीने मुघल बादशाह शाहजहान यास दख्खनच्या सुभेदार,शहजादा मुरादबक्ष याच्यामार्फत पत्र पाठवून शहाजीराजां सहित मुघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली.शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजांची सुटका झाली याबदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला.
स्वराज्य वाढण्यास हातभार लागावा म्हणून वेगवेगळ्या मराठी सरदारांशी नाते जोडण्यासाठी जिजाऊंनी,शिवरायांची एकूण आठ लग्ने केली.त्यापैकी सईबाई निंबाळकर घराण्यातील,सोयराबाई मोहिते घराण्यातील,पुतळाबाई पालकर घराण्यातील,गुणवंताबाई इंगळे घराण्यातील,सगुणाबाई शिर्के घराण्यातील, काशीबाई जाधव घराण्यातील,लक्ष्मीबाई विचारे घराण्यातील तर सकवारबाई गायकवाड घराण्यातील होत्या.
सईबाईना संभाजीराजे हा पुत्र तर सखूबाई,रानूबाई,अंबिकाबाई या मुली होत्या. सोयराबाईंना राजाराम हा पुत्र तर दीपाबाई ही मुलगी होती.सगुनाबाईना राजकुंवर ही मुलगी होती. तर सकवारबाईना कमलाबाई ही मुलगी होती.
छत्रपती शिवरायांनी याच शिवलिंगावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९६


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९६
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग
सांभार :www.marathidesha.com

तीनशे वर्ष महाराष्ट्र इस्लामी राज्यसत्तेच्या ताब्यात खितपत पडला होता,या लोकांनी महाराष्ट्रावर आपली राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक गुलामगिरी लादून रयतेचा प्रचंड छळ चालविला होता.या कालखंडातील दिल्लीचे मोगल राजे,स्वत:ला हिंदूस्थानाचा अधिपति मानत.मोघलांच्या सत्तेला हिंदूस्थानात सर्वप्रथम छत्रपती शिवरायांनी आव्हान दिले आणि आपले स्वतंत्र व सार्वभौम राज्य स्थापिले.हिंदूस्थानातील जे राजे पारतंत्र्यात जगत होते त्यांना छत्रपतींनी स्वतंत्र होण्याचा संदेश दिला.त्यामुळेच छत्रपतीं शिवरायांना युगकर्ते ,शककर्ते असेही म्हटले जाते.
छत्रपती शिवरायांचा जन्म इ.स.१९ फेब्रुवारी १६३०(फाल्गुन वद्य तृतीया,शके १५५१) रोजी पुण्यापासून जवळच असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला(संदर्भ:जेधे शकावली).सन १६३९ ते १६४२ या कालावधीत बालशिवाजी कर्नाटकात असताना शहाजीराजांनी त्यांना राज्यकारभार तसेच युद्धाभ्यासाचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती(संदर्भ:परमानंदकृत शिवभारत).त्यामुळे लहानपणीच बालशिवाजी लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी यात तरबेज झाले.रामायण, महाभारत या ग्रंथाचे जिजाऊंकडून संस्कार झाल्यामुळे,परकीयांविरूद्ध लढण्याचे बाळकडू त्यांना लहानपणापासून मिळाले.जन्मानंतर इ.स १६४२ पर्यत त्यांचे वास्तव्य शिवनेरी, सिंदखेडराजा, खेड शिवापूर, पुणे जहागीर तसेच बेंगलोर आदि ठिकाणी होते
छत्रपती शिवरायांचा जन्म किल्ले शिवनेरीवर याच ठिकाणी झाला

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९५

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९५
।। राजमाता जिजाबाई ।।
सांभार :http://www.marathidesha.com
महाराज शककर्ते छत्रपती झाले.जिजाऊ व शहाजीराजे यांच्या संकल्पनेतील स्वराज्य प्रत्यक्षात आले.राज्याभिषेकानंतर थोड्याच दिवसात इ.स.१७ जून १६७४ रोजी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी जिजाऊंचे निधन झाले.जिजाऊ थोर माता होत्या तसेच त्या सर्व श्रेष्ठ राजनितीतज्ञ,सर्वश्रेष्ठ योध्दा ,सर्वश्रेष्ठ भाषातज्ञ अशा सर्व कलानिपूण व्यक्ती होत्या.
थोर समाजसेवक महात्मा फुलेंनी आपल्या पोवाड्यातून जिजाऊंची थोरवी गायली आहे.
कन्या वीर जाधवांची जिने भारत लावले पुत्रा नीट ऎकविले ॥
या क्षेत्राचे धनी कोण कोणी बुडविले सांगत मुळी कसे झाले॥
क्षेत्रवासी म्हणौन नांव क्षत्रिय धरले क्षेत्री सुखी राहिले॥
अन्य देशिचे दंगेखोर हिमालयी आले होते लपून राहिले॥
पाठी शत्रू भौती झाडी किती उपाशी मेले गोमासा भाजून घाले॥
सर्वदेशी चाल त्यांचे पुंड माजले उरल्या क्षत्रिया पिडीले॥
शुद्रा म्हणती तुम्हा ह्रदयी बाण रोवले आज बोधाया फावले॥
गाणे गात ऎका बाळा तुझ्या आजोळी शिकले बोलो नाही मन धरले ॥
शिवराज्याभिषेकावेळी गागाभट्टानी जिजाऊ विषयी पुढीलप्रमाणे उद्गार काढले,
कादंबिनी जगजीवनदान हेतु:॥
सौदामिनीत्व सकलही विनाशेजाय ॥
आलंबिनी भवति राजगिरे दिदानी॥
जीजा भिदायजयती शहाबकुटूंबिनीसा ॥
राजमाता जिजाऊंची समाधी,पाचाड(रायगड)

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९४

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९४
।। राजमाता जिजाबाई ।।
सांभार :http://www.marathidesha.com
इ.स. १६६६ साली छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहाच्या अटीनुसार औरंगजेबला भेटण्यासाठी दिल्लीला गेले.तेथे औरंगजेबने छत्रपतींचा अपमान करून आग्र्याला नजरकैदेत ठेवले.अशा बिकट प्रसंगी खचून न जाता जिजाऊंनी महाराष्ट्रात स्वराज्याचा राज्यकारभार नीट केला.
आग्र्याहून सुटल्यानंतर शिवबांनी मोघलांच्या ताब्यातील किल्ले परत घेण्याचा सपाटा चालविला.शिवरायांचा दरारा संपुर्ण भारतात निर्माण झाला होता.पण त्यांची स्वतंत्र राजा म्हणून ओळख नव्हती.त्यामुळे जिजाऊंनी शिवरायांचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला.
इ.स. ६ जून इ.स.१६७४(शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ,शुद्ध त्रयोदशी,आनंदनाम संवत्सर) रोजी राज्याभिषेकाचा सोहळा रायगडावर संपन्न झाला.तर २४ सप्टेंबर १६७४,ललिता पंचमी अश्विन शु.५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने शिवरायांनी स्वत:ला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. सभासदाच्या बखरीत या सोहळ्याचे खूप सुंदर वर्णन आहे.सभासदाच्या लेखानुसार या सोहळ्यात एक करोड बेचाळीस लक्ष होन एवढा खर्च झाला.राज्याभिषेक समारोहाबद्दल सभासद म्हणतो,येणे प्रमाणे राजे सिंहासनारूढ जाले.'या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा मर्‍हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला.ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.'
श्री शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगडावर झाला.त्याचे पडसाद सातासमुद्रापार युरोपपर्यंत निनादले.हा राज्याभिषेक रोखायचे धाडस आलमगीर औरंगजेबालाही झाले नाही.राज्याभिषेक सोहळा सुरु असताना,स्वराज्याच्या सीमेकडे डोळा वर करुन पहायचे धाडसही चार पातशाह्यांना झाले नाही.इतका प्रचंड दरारा आणि दहशत शिवरायांची,त्यांच्या मराठी सेनेची होती. राज्याभिषेकावेळी शिवरायांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.राज्यव्यवहार कोश बनविला,नवी दंडनिती,नवे कानुजाबते तयार केले.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९३


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९३
।। राजमाता जिजाबाई ।।
सांभार :http://www.marathidesha.com
छत्रपती संभाजीराजेंचा जन्म इ.स. १४ मे, १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजीराजांच्या 'मातोश्री सईबाईंचे' निधन, संभाजीराजांच्या लहान वयात झाल्यामुळे त्यांच्या पालनपोषनाची जबाबदारी जिजाऊंनी पार पाडली.पुढे संभाजीराजा इतिहासातील एक थोर,बुध्दिमानी,अजिंक्य पराक्रमी राजा म्हणून उदयास आला.
तिकडे दक्षिणेत आपल्या जनतेची काळजी शहाजीराजे अगदी पुत्रासारखी घेत होते.आपल्या प्रजेची जंगलातील नरभक्षक वाघाच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून अशा वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी शहाजीराजे बेंगलोर नजिकच्या होदेगिरीच्या जंगलात गेले होते.वाघाचा पाठलाग करताना घोड्यावरून पडून त्यांचा दुदैवी मृत्यु झाला.ही दुदैवी घटना इ.स.२३ जानेवारी १६६४ रोजी घडली.
अशा दु:खद प्रसंगी पतीविरहाचे दु:ख बाजूला ठेवून जिजाऊंनी स्वराज्याच्या बांधणीवर लक्ष केंद्रित केले.या निर्णयामागे शिवरायांना घडविण्याची,स्वराज्यप्राप्तीची,गुलामगिरीतून लोकांना सोडविण्याची प्रबळ प्रेरणा होती.स्वराज्य वाढण्यास हातभार लागावा म्हणून वेगवेगळ्या मराठी सरदारांशी नाते जोडण्यासाठी जिजाऊंनी,शिवरायांची एकूण आठ लग्ने केली.त्यापैकी सईबाई निंबाळकर घराण्यातील,सोयराबाई मोहिते घराण्यातील,पुतळाबाई पालकर घराण्यातील,गुणवंताबाई इंगळे घराण्यातील,सगुणाबाई शिर्के घराण्यातील, काशीबाई जाधव घराण्यातील,लक्ष्मीबाई विचारे घराण्यातील तर सकवारबाई गायकवाड घराण्यातील होत्या.
पाचाड(रायगड) येथील जिजाऊंचा वाडा

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९२


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९२
।। राजमाता जिजाबाई ।।
सांभार :http://www.marathidesha.com
शहाजीराजांनी राजमुद्रा,विश्वासू नोकर सोबत देऊन,स्वतंत्र मराठी राज्य स्थापनेचा निर्धार करून बालशिवाजींना व जिजाऊंना पुण्याला इ.स. १६४२ मध्ये आपल्या जहागीरीमध्ये पाठविले.थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजेंसोबत कर्नाटकात राहिले. पुण्यास आल्यानंतर जिजाऊंनी प्रथम लोकांना त्रास देणाऱ्या सावकारांचा,गुंड लोकांचा बंदोबस्त केला.हिंसक जंगली स्वापदांपासून लोकांना मुक्त केले.लोकांमध्ये हळूहळु सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.पिण्याच्या पाण्यासाठी आंबवडी,पनवडीचा धरणे बांधली.शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करून दिले.शेतसारा कमी केला.जिजाऊंची राहणी अत्यंत साधी होती..
कातकरी,कोळी,भिल्ल,कुणबी,मुसलमान,हरिजन अशा विविध जातीधर्मातील मुलांसोबत शिवरांय युध्दाचे खेळ खेळत असत.जहागिरीची वस्त्रे बाजूला ठेवून शिवराय आपल्या संवंगड्यासोबत जेवत असत.त्यामुळे बारा मावळाच्या तरूणांना शिवराय आपल्यातीलच एक वाटू लागले.मावळातील पासलकर, जेधे, मालूसरे, निंबाळकर, मोहिते, महाडिक, शिर्के, कंक, शिळीमकर,महाले,जाधव,जगताप आदि अनेक लोकांना एकत्र आणून बाल शिवबांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला.याकामी त्यांना जिजाऊंचे मागदर्शन मिळाले.
शहाजीराजे दक्षिणेत मराठा राज्य वाढवत होते,तर महाराष्ट्रात जिजाऊंच्या मार्गदर्शनात शिवबा आपले राज्य वाढवत होते.बेंगलोरहून परत आल्यानंतर शिवरायांनी बारा मावळ(राजमाची व चाकण येथून दक्षिणेस रायरेश्वराचा डोंगर,अंबेडखिंड,खंबाटकीचा घाट येथपर्यंत पुण्याजवळचा मुलूख) खोर्‍यात राहणार्‍या आपल्या सवंगड्याना सोबत घेऊन स्वत:ची फौज तयार केली.वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी इ.स.२७ एप्रिल १६४५ साली त्यांनी भोरजवळच्या,रायरेश्वराच्या पठारावर स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली.
राजमाता जिजाऊंचे शिल्प,जन्मस्थानातील आतील बाजू

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९१

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९१
।। राजमाता जिजाबाई ।।
सांभार :http://www.marathidesha.com
संभाजीराजेंच्या जन्मानंतर जिजाऊंना चार अपत्ये झाली पण ती जगली नाही.त्यांचे सहावे अपत्य म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज.शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० साली (फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१) सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवरायांचा जन्म झाला.गडावर सर्वत्र आनंदी आनंद झाला.गडावरील शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी हे नाव छत्रपतींना ठेवले गेले.
दरम्यानच्या कालात अंतर्गत कलहामुळे तसेच निजामशाहच्या मृत्युमुळे निजामशाही बुडण्याची भीती निर्माण झाली.अशावेळी निजामशाही वाचविण्यासाठी शहाजीराजेंनी निजामशाहची चाकरी पत्करली व बाल निजाम मुर्तझास मांडीवर बसवून निजामशाहीचा कारभार चालविला.अशावेळी मराठा जनता शहाजीराजेंना आपला राजा म्हणून पाहू लागली.याच कालखंडातील निजामाच्या दरबारातील कारस्थानामुळे तसेच निजामशाह व आदिलशाहच्या यांच्या तहामुळे शहाजीराजेंना निजामशाहीचा कारभार सोडून बेंगलोर येथे जावे लागले.
बेंगलोर मध्ये बालशिवबाच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी शहाजीराजेंनी पार पाडली.सन १६३९ ते १६४२ या कालावधीत बालशिवाजी कर्नाटकात असताना शहाजीराजांनी त्यांना राज्यकारभार तसेच युद्धाभ्यासाचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती(संदर्भ:परमानंदकृत शिवभारत).त्यामुळे लहानपणीच बालशिवाजी लाठीकाठी,तलवारबाजी,दांडपट्टा,घोडेस्वारी यात तरबेज झाले.रामायण, महाभारत या ग्रंथाचे जिजाऊंकडून संस्कार झाल्यामुळे,परकीयांविरूद्ध लढण्याचे बाळकडू त्यांना लहानपणापासून मिळाले.जन्मानंतर इ.स १६४२ पर्यत त्यांचे वास्तव्य शिवनेरी, सिंदखेडराजा, खेड शिवापूर, पुणे जहागीर तसेच बेंगलोर आदि ठिकाणी होते. ·
राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांचे शिल्प,किल्ले शिवनेरी

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९०


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९०
।। राजमाता जिजाबाई ।।
सांभार :http://www.marathidesha.com
त्याकाळात जिजाऊंच्या व शहाजीराजेंच्या मनात मराठी स्वराज्य स्थापनेचा विचार येत होता.जिजाऊंचे सर्वच बंधू पराक्रमी होते,त्यामुळे बादशाहला त्यांच्यावर नेहमी संशय होता.त्यातुनच विजापुरच्या दरबारामध्ये खंडागळेचा हत्ती उधळण्याचे बनावट कारस्थान घडविले गेले.हत्तीस काबूत आणण्यासाठी दोन पथके नेमली गेली.एकाचे नेतृत्व जिजाऊंचे वडिलबंधू दत्ताजी करत होते तर दुसऱ्याचे नेतृत्व जिजाऊंचे चुलत दीर संभाजीराजे करत होते.या घटनेत जिजाऊंचे चुलत दीर संभाजीराजे यांच्या हातून जिजाऊंचे वडिलबंधू दत्ताजी मारले गेले.त्यामुळे रागाने जिजाऊंच्या वडिलांनी लखूजींनी संभाजीराजेंना ठार केले.शहाजीराजे भोसले लखूजीरावावर चालून गेले.या घटनेत शहाजीराजेंच्या दंडावर तलवारीचा घाव बसला.
या दुदैवी घटनेनंतर जिजाऊंनी आपल्या माहेरच्या लोकाशी संबंध तोडून टाकले.परकीयासाठी असे अनेक मराठा सरदार स्वत:चे रक्त सांडत होते.याच कालावधीत इ.स.१६२१ साली जिजाऊंना पहिला पुत्र झाला,त्याचे नाव त्यांनी आपल्या दिराच्या नावावरून संभाजीराजे असे ठेवले.
जिजाऊंच्या व शहाजीराजेंनी मनात स्वतंत्र मराठी राज्य स्थापण्याचे ठरविले होते.लखुजीराजे व शहाजीराजे एकत्र येऊन स्वतंत्र मराठी राज्य स्थापन करतील या भीतिने निजामशाहने देवगिरीच्या किल्ल्यात इ.स.२५ जुलै १६२९ रोजी लखुजीराजे यांची हत्या घडवून आणली.या घटनेनंतर शहाजीराजेंनी निजामशाहची वतनदारी सोडून आदिलशाहची वतनदारी स्वीकारली.
राजमाता जिजाऊंचे शिल्प,सिंदखेडराजा(बुलढाणा)

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८९

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८९
।। राजमाता जिजाबाई ।।
सांभार :http://www.marathidesha.com
जशी चंपकेशी खुले फूल जाई ।
भली शोभली ज्यास जाया जिजाई ॥
जिचे कीर्तिचा चंबू जंबू द्विपाला ।
करी साऊली माऊली मुलाला ॥
(कवीश्रेष्ठ: जयराम पिंडे,शहाजीराजेंच्या दरबारातील रत्न)
अर्थ :एखादा मोठा बगीचा फुललेल्या जाईंच्या फुलाच्या ताटव्याने खुलून जातो त्याचप्रमाणे जिजाऊंच्या रूपाने शहाजी राजांचे जीवन सुशोभित झाले होते.पण शहाजीराजेंची पत्नी हीच जिजाऊंची ओळख नव्हती.जिजाऊंच्या कार्याचा,कर्तुत्वाचा गौरव सर्वदूर देशामध्ये व दिशामध्ये पसरला होता.अशा जिजाऊंनी साऊली होऊन आपल्या सुपूत्राला सर्वच प्रकारची सोबत,शिक्षण दिले.आई होऊन शिवबावर सावलीसुध्दा धरली.
राजमाता जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी (पौष पौर्णिमा शके १५१९) रोजी सिंदखेडराजा (बुलडाणा) येथे झाला.म्हाळसाराणी हे त्यांच्या आईचे नाव तर लखुजीराव जाधव हे त्यांच्या वडिलांचे नाव होते.दत्ताजी,अचलोजी,राघोजी व बहादुरजी हे त्यांचे वडिलबंधू होते.लखुजीराव वेरूळच्या यादव घराण्याचे वंशज होते.
जिजाऊंना अनेक भाषांचे ज्ञान अवगत होते.लखुजीराव जाधव निजामशाहचे वतनदार होते.आपल्या पराक्रमाऩे त्यांनी निजामशाहच्या दरबारात मानाचे स्थान पटकावले होते.इ.स.१६१० साली वेरूळ येथे निजामशाहच्या पुढाकाराने जिजाऊंचा विवाह शहाजीराजेंशी झाला.तो काळ मोठा धामधुमीचा होता.भोसले,जाधव,निंबाळकर,महाडिक,सुर्वे,शिर्के असे अनेक मराठा सरदार वतनापायी अदिलशाह,कुतूबशाह,निजामशाह,मोघल यांच्याकडे चाकरी करीत होते.·
राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान,सिंदखेडराजा(बुलढाणा)

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८८

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८८
सरलष्करं सेनापती "मह्लोजी घोरपडे
भाग
मह्लोजी बाबांचं अफाट!...अफाट!...अफाट! शौर्य पाहून त्याचवेळी मुकर्रब खानानं चालं खेळली. कमानमारं ला बोलावलं, हा मह्लोजी असा आवरणारं नाही आणि तिसऱ्या बाजूकडं लढत्या मालोजीवर नेम धरंला, तीरं सुटला...उजव्या दंडात घुसला हातातली तलवारं निखळंली...दुसरा तीरं कंठात...दुसरी तलवारं निखळंली...! निशस्त्र झाला मह्लोजी आणि गुळाच्या ढेपेला मुंग्या ढसाव्या असं यौवनी सैन्यं मह्लोजीला ढसलं.
अरे! शरीरावरं जागा शिल्लखं राहिली नाही जिथं वारं झाला नाही. रक्ताळंला मह्लोजी मातीत पडला. अखेरंचा श्वास फुलंला...डोळे लवले...ओठं हलले. त्या श्वासानं माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला मह्लोजी सांगता झाला..."सांगा माझ्या राजाला, हा मह्लोजी गेला..मातीत मेला, पण! मातीत नाही मेला..."मातीसाठी मेला"......अरे! मातीत मारणारे कैक असतात, पण! "मातीसाठी मारणारे फक्तं मराठे असतात" हे सांगत गेला.
आणि मह्लोजी नावाचा बुरुंज ढासळला