हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९०
।। राजमाता जिजाबाई ।।
सांभार :http://www.marathidesha.com
त्याकाळात जिजाऊंच्या व शहाजीराजेंच्या मनात मराठी स्वराज्य स्थापनेचा
विचार येत होता.जिजाऊंचे सर्वच बंधू पराक्रमी होते,त्यामुळे बादशाहला
त्यांच्यावर नेहमी संशय होता.त्यातुनच विजापुरच्या दरबारामध्ये खंडागळेचा
हत्ती उधळण्याचे बनावट कारस्थान घडविले गेले.हत्तीस काबूत आणण्यासाठी दोन
पथके नेमली गेली.एकाचे नेतृत्व जिजाऊंचे वडिलबंधू दत्ताजी करत होते तर
दुसऱ्याचे नेतृत्व जिजाऊंचे चुलत दीर संभाजीराजे करत होते.या घटनेत
जिजाऊंचे चुलत दीर संभाजीराजे यांच्या हातून जिजाऊंचे वडिलबंधू दत्ताजी
मारले गेले.त्यामुळे रागाने जिजाऊंच्या वडिलांनी लखूजींनी संभाजीराजेंना
ठार केले.शहाजीराजे भोसले लखूजीरावावर चालून गेले.या घटनेत शहाजीराजेंच्या
दंडावर तलवारीचा घाव बसला.
या दुदैवी घटनेनंतर जिजाऊंनी आपल्या माहेरच्या लोकाशी संबंध तोडून टाकले.परकीयासाठी असे अनेक मराठा सरदार स्वत:चे रक्त सांडत होते.याच कालावधीत इ.स.१६२१ साली जिजाऊंना पहिला पुत्र झाला,त्याचे नाव त्यांनी आपल्या दिराच्या नावावरून संभाजीराजे असे ठेवले.
जिजाऊंच्या व शहाजीराजेंनी मनात स्वतंत्र मराठी राज्य स्थापण्याचे ठरविले होते.लखुजीराजे व शहाजीराजे एकत्र येऊन स्वतंत्र मराठी राज्य स्थापन करतील या भीतिने निजामशाहने देवगिरीच्या किल्ल्यात इ.स.२५ जुलै १६२९ रोजी लखुजीराजे यांची हत्या घडवून आणली.या घटनेनंतर शहाजीराजेंनी निजामशाहची वतनदारी सोडून आदिलशाहची वतनदारी स्वीकारली.
राजमाता जिजाऊंचे शिल्प,सिंदखेडराजा(बुलढाणा)

No comments:
Post a Comment