Total Pageviews

Sunday, 2 December 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९१

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९१
।। राजमाता जिजाबाई ।।
सांभार :http://www.marathidesha.com
संभाजीराजेंच्या जन्मानंतर जिजाऊंना चार अपत्ये झाली पण ती जगली नाही.त्यांचे सहावे अपत्य म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज.शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० साली (फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१) सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवरायांचा जन्म झाला.गडावर सर्वत्र आनंदी आनंद झाला.गडावरील शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी हे नाव छत्रपतींना ठेवले गेले.
दरम्यानच्या कालात अंतर्गत कलहामुळे तसेच निजामशाहच्या मृत्युमुळे निजामशाही बुडण्याची भीती निर्माण झाली.अशावेळी निजामशाही वाचविण्यासाठी शहाजीराजेंनी निजामशाहची चाकरी पत्करली व बाल निजाम मुर्तझास मांडीवर बसवून निजामशाहीचा कारभार चालविला.अशावेळी मराठा जनता शहाजीराजेंना आपला राजा म्हणून पाहू लागली.याच कालखंडातील निजामाच्या दरबारातील कारस्थानामुळे तसेच निजामशाह व आदिलशाहच्या यांच्या तहामुळे शहाजीराजेंना निजामशाहीचा कारभार सोडून बेंगलोर येथे जावे लागले.
बेंगलोर मध्ये बालशिवबाच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी शहाजीराजेंनी पार पाडली.सन १६३९ ते १६४२ या कालावधीत बालशिवाजी कर्नाटकात असताना शहाजीराजांनी त्यांना राज्यकारभार तसेच युद्धाभ्यासाचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती(संदर्भ:परमानंदकृत शिवभारत).त्यामुळे लहानपणीच बालशिवाजी लाठीकाठी,तलवारबाजी,दांडपट्टा,घोडेस्वारी यात तरबेज झाले.रामायण, महाभारत या ग्रंथाचे जिजाऊंकडून संस्कार झाल्यामुळे,परकीयांविरूद्ध लढण्याचे बाळकडू त्यांना लहानपणापासून मिळाले.जन्मानंतर इ.स १६४२ पर्यत त्यांचे वास्तव्य शिवनेरी, सिंदखेडराजा, खेड शिवापूर, पुणे जहागीर तसेच बेंगलोर आदि ठिकाणी होते. ·
राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांचे शिल्प,किल्ले शिवनेरी

No comments:

Post a Comment