हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९७
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग २
सांभार :www.marathidesha.com
भाग १९७
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग २
सांभार :www.marathidesha.com
बेंगलोरहून परत आल्यानंतर शिवरायांनी बारा मावळ(राजमाची व चाकण येथून
दक्षिणेस रायरेश्वराचा डोंगर,अंबेडखिंड,खंबाटकीचा घाट येथपर्यंत
पुण्याजवळचा मुलूख) खोऱ्यात राहणार्या आपल्या सवंगड्याना सोबत घेऊन
स्वत:ची फौज तयार केली.वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी इ.स.२७ एप्रिल १६४५
साली त्यांनी भोरजवळच्या,रायरेश्वराच्या पठारावर स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली.
छत्रपती शिवरायांनी सुरवातीच्या कालखंडामध्ये तोरणा,सिंहगड,चाकण आदी किल्ले आदिलशहाकडून जिंकून आपल्या वर्चस्वाखाली आणले.आदिलशहाने शिवाजीराजांना आळा घालण्यासाठी फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवरायांवर हल्ला करण्यास पाठविले शिवाय विश्वासघाताने शहाजीराजांना कैद केले.
पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला.यावेळी आपल्या मुसद्दीने मुघल बादशाह शाहजहान यास दख्खनच्या सुभेदार,शहजादा मुरादबक्ष याच्यामार्फत पत्र पाठवून शहाजीराजां सहित मुघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली.शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजांची सुटका झाली याबदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला.
स्वराज्य वाढण्यास हातभार लागावा म्हणून वेगवेगळ्या मराठी सरदारांशी नाते जोडण्यासाठी जिजाऊंनी,शिवरायांची एकूण आठ लग्ने केली.त्यापैकी सईबाई निंबाळकर घराण्यातील,सोयराबाई मोहिते घराण्यातील,पुतळाबाई पालकर घराण्यातील,गुणवंताबाई इंगळे घराण्यातील,सगुणाबाई शिर्के घराण्यातील, काशीबाई जाधव घराण्यातील,लक्ष्मीबाई विचारे घराण्यातील तर सकवारबाई गायकवाड घराण्यातील होत्या.
सईबाईना संभाजीराजे हा पुत्र तर सखूबाई,रानूबाई,अंबिकाबाई या मुली होत्या. सोयराबाईंना राजाराम हा पुत्र तर दीपाबाई ही मुलगी होती.सगुनाबाईना राजकुंवर ही मुलगी होती. तर सकवारबाईना कमलाबाई ही मुलगी होती.
छत्रपती शिवरायांनी याच शिवलिंगावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती

No comments:
Post a Comment