Total Pageviews

Thursday 27 July 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३१०

 



हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३१०

अटकेवर झेंडे फडकले तेव्हा...
डॉ. सदानंद मोरे
भाग ५

उत्तरेत गेले; तेव्हा त्यांचे कोणी पायघड्या घालून स्वागत केले, असे समजायचे कारण नाही. दिल्लीच्या राजकारणात त्यांचा प्रवेश नको असणाऱ्यांचाही प्रबळ गट होताच; पण त्याला पुरून उरून मराठ्यांनी आपले सामर्थ्य आपल्या तलवारीच्या जोरावर सिद्ध केले. परिणामतः मराठे हेच रोहिले व अबदाली यांच्यापासून आपला बचाव करू शकतील, अशी खात्री पटल्यामुळेच मराठ्यांना पातशाही सनदा मिळाल्या व त्यामुळे त्यांना मुलतान, पंजाब, सिंध, राजपुताना, रोहिलखंड यांच्यासह मोगल साम्राज्याच्या सर्व सुभ्यांवरील चौथाईचा हक्क प्राप्त झाला. सार्वभौम सत्तेला करारानुसार महसूल देण्यास नेहमीच टाळाटाळ करण्यास सोकावलेल्या स्थानिक सत्ताधिशांना मराठे न आवडण्याचे कारण हेच होय. बळाचा उपयोग करून वसुली करण्याचे सामर्थ्य मराठ्यांमध्ये होते, हे वेगळे सांगायला नकोच; मात्र मराठ्यांचे सामर्थ्य कितीही असले, तरी दिल्ली आणि उत्तरेतील मराठ्यांच्या फौजा इतक्या प्रबळ नव्हत्या, की दक्षिणेतून कुमक न मागवता त्यांना अबदालीसारख्याचा प्रतिकार करता यावा. पहिल्यांदा हेच घडले. अंताजी माणकेश्वरासारखा दिल्ली प्रदेशातील मराठा सरदार अबदालीपुढे काय करणार? अबदालीने दिल्ली व आसपासचा प्रदेश लुटला. बादशहा व त्याच्या कुुटंबियांची विटंबना केली. हिंदूधर्मियांची सरसकट कत्तल केली. पंजाब-लाहोर प्रांत आपल्या घशात घातले. 1755च्या सुरवातीची ही घटना आहे. अंताजीने नानासाहेब पेशव्यांस लिहिले ः ""पातशहा रात्रंदिवस म्हणे, की हे पातशहात बाळाजी रायाची आहे, त्याचे सरदारांस सत्वर बोलावून हे काम सिद्धीस नेणे.''

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३०९

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३०९
अटकेवर झेंडे फडकले तेव्हा...
डॉ. सदानंद मोरे
भाग
निजामाचा कायमचा निकाल पेशव्यांना लावता आला नाही, हे खरे आहे; पण त्याला एका मर्यादेत रोखून धरण्यात त्यांना यश आले, हेही तितकेच खरे आहे. उत्तरेत मात्र मराठ्यांच्या अभावी उत्पन्न झालेल्या निर्नायकीचा फायदा चुकीच्या शक्तींनी घेऊन हिंदुस्थानचा राजकीय नकाशाच बदलून टाकला असता. बंगालची दिवाणी घेताना इंग्रजांनी दिल्लीचे रक्षण करण्याचे कबूल केले असूनही अबदालीच्या आक्रमणाच्या वेळी ते स्वस्थ व पर्यायाने सुरक्षित राहिले. उलट मराठ्यांनी लाहोर-मुलतानच्या भानगडीत पडून व पानिपतवर धाव घेऊन नुकसान करून घेतले, असा हिशेब मांडणारे शेजवलकर, जेव्हा मराठे जेथपर्यंतच पोहचले नाहीत, तेथपर्यंत पाकिस्तानच्या सीमारेषा भिडल्या आहेत, असे सांगतात; तेव्हा त्यांच्यातील विसंगती आपली आपोआपच दृश्यमान होते.
या व्यवहाराकडे पाहण्याची मराठ्यांची वृत्ती व्यापारी फायद्यातोट्याची नसून, देश व धर्म यांच्या राहण्याची होती. त्यांच्या या कृतीला आततायी मूर्खपणा न मानता आत्मबलिदानच मानायला हवे. या बलिदानातूनच भारताचे भवितव्य घडले हे विसरता कामा नये.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३०८

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३०८
अटकेवर झेंडे फडकले तेव्हा...
डॉ. सदानंद मोरे
भाग
इतिहासकार यदुनाथ सरकार यांनी पूर्वी एकदा काही कागदांचे चुकीचे वाचन केल्यामुळे गैरसमज होऊन मराठ्यांचे सैन्य चिनाब नदी ओलांडून पुढे गेलेच नव्हते, असे विधान केले होते. त्यावर विसंबून रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी जून 1943मध्ये पुण्यात भरलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या एका संमेलनाचे उद्‌घाटन करताना यदुनाथांची री ओढली. तेव्हा इतिहाससंशोधक ग. ह. तथा तात्यासाहेब खरे यांनी "केसरी' व "सह्याद्री'मध्ये लेख लिहून त्याचा प्रतिवाद केला व मराठ्यांच्या पराक्रमाचे यथार्थ दर्शन घडविले. खऱ्यांनी अस्सल कागदपत्रांच्या आधारे दाखवून दिले, की मराठ्यांच्या काही तुकड्या अटकेजवळ सिंधूचे पात्र ओलांडून गेल्या व त्यांनी पेशावर येथे काही काळ मुक्कामही केला. 5 सप्टेंबर 1758 च्या एका पत्रातील उल्लेखानुसार ""पूर्वीच्या मुलुकाखेरीज लाहोरचा सुभा अटकपावेतो दो करोडाचा मुलूक या साली महाराजाचा जाला. आता पश्चमेस मुलतान-काबूल व पूर्वेस बंगाल-अयोध्या प्रयाग राहिली.'' यावरून मराठ्यांची राजकीय कार्यक्रमपत्रिका स्पष्ट होते.
यांच्या या राज्यविस्ताराची मीमांसा काही प्रमाणात याअगोदरही आपण केलेली आहे. शाहू महाराजांच्या काळात पहिला बाजीराव आणि श्रीपतराव प्रतिनिधी यांच्यात भर दरबारात झालेल्या वादाचा उल्लेखही झालेला आहे. प्रतिनिधींच्या मते मराठ्यांनी आधी दक्षिण दिशा सुरक्षित करावी व मगच उत्तरेच्या राजकारणात हात घालावा, तर उलट बाजीराव दक्षिणेचा मामला घरचा व म्हणून सोपा आहे; सबब उत्तरेच्या राजकारणास प्राधान्य द्यावे, या मताचा होता. शाहू महाराजांनी बाजीरावास अनुकूल कौल दिला व त्यानुसार मराठे उत्तराभिमुख झाले. पेशव्यांच्या या उत्तरायणावर राजारामशास्त्री भागवत व शेजवलकर यांनी तीव्र आक्षेप घेऊन प्रतिनिधींची बाजू उचलून धरल्याचे जाणकारांना ठाऊक आहेच. या धोरणामुळे निजाम बळावला हे त्यांचे निरीक्षण यथार्थच आहे; परंतु, मराठे जर उत्तरेत गेले नसते, तर संपूर्ण उत्तर हिंदुस्थान नादिरशहा किंवा अबदाली अशा धर्मवेड्या प्रवृत्तींच्या हाती गेला असता, हे ते विसरतात.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३०७

 




हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३०७
अटकेवर झेंडे फडकले तेव्हा...
डॉ. सदानंद मोरे
भाग
या प्रदेशाचे वर्णन करताना शेजवलकर काहीसे भावुक झाले ः ""सिंधू नदी या भागात अटकेपासून दक्षिणेकडे व नैऋत्येकडे शुद्ध खडकातून बहू युगांच्या वाहण्याने मार्ग खोदून एकाकी काळाबादपर्यंत बिनवाळवंटी पाणातून शंभर मैल वाहत जाते. अटकेच्या दक्षिणेकडील हा भाग नदी ओलांडण्यास अत्यंत दुष्कर असा आहे. पश्चिम बाजूस उंच डोंगरांच्या ओळी असून अटकेहून पलीकडे पाहिले, म्हणजे त्यांच्या दूरवर काळ्याकभिन्न दिसणाऱ्या रांगा मनात भय उत्पन्न करतात. मी गेलो त्या दिवशी आकाश बहुतेक ढगांनी व्याप्त होते. वर विचित्र आकाराचे दाट ढग, पलीकडे राक्षसाकृती डोंगर, नदीकाठचा काळा खडक, किल्ल्याच्या तशाच भिंती, मागेही तसाच डोंगर, असे हे एकंदर दृश्य मन चरकेल असेच होते; पण याच वाटेने प्राचीन काळापासून अनेक जेते भारतवर्षात आले होते. त्यांना भय वाटलेले दिसत नाही किंवा खोल खळखळाटी नदीच्या प्रवासाने अटकही झाली नाही आणि याच दुर्लघ्य मार्गाने काही धाडसी मराठे-आपले ऐतिहासिक पूर्वज, दोनशे वर्षांपूर्वी दक्षिणेतून पंधराशे मैल घोडदौड करून, न भीता, पलीकडे वाघाच्या गुहेत त्याच्या मिशा उपटण्यास व दात मोजण्यास शिरले होते. अशी गोष्ट त्यापूर्वी अनेक शतके कोणी स्वतंत्र हिंदू जमातीने करून दाखविली नव्हती. त्यांच्या घोड्यांनी तुडविलेल्या नदीच्या खडकावर मी त्याचे चित्र आठवीत आता उभा होतो.''
अटकेपार झेंडे लावणे, ही मराठ्यांच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना आहे. मराठ्यांच्या पराक्रमावर व कर्तबगारीवर शिक्कामोर्तब करणाऱ्या या घटनेला दुसऱ्याही एका दृष्टीने महत्त्व आहे. धर्मशास्त्राने निर्बंध घालून निर्माण केलेल्या काही चमत्कारिक रूढींपैकी "अटक' ओलांडायची नाही, ही एक होती. मराठ्यांनी अधिकृतपणे ती झुगारून लावली. विशेष म्हणजे मराठ्यांच्या या मोहिमेचे नेतृत्व रघुनाथ बाजीराव उर्फ राघोबादादा नावाचा ब्राह्मण सेनानी करीत होता. हिंदूंमध्ये ब्राह्मण जात ही अधिक रूढीप्रिय असल्याचा समजही या कृतीमुळे मोडीत निघाला. मराठ्यांची घोडी यावेळी केवळ गंगेतच नाही, तर सिंधूत न्हाऊन निघाली.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३०६


 हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३०६

अटकेवर झेंडे फडकले तेव्हा...
डॉ. सदानंद मोरे
भाग १

अटकेपार झेंडे लावणे, ही मराठ्यांच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना आहे. या घटनेला दुसऱ्याही दृष्टीने महत्त्व आहे. धर्मशास्त्राने निर्माण केलेल्या काही चमत्कारिक रूढींपैकी "अटक' ओलांडायची नाही, ही एक रुढी होती. मराठ्यांनी अधिकृतपणे ती झुगारून लावली.

इ.स. 1761 यावर्षी पानिपतच्या युद्धाची द्विशताब्दी होती. त्यानिमित्ताने प्रसिद्ध इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांनी पानिपतच्या युद्धावर स्वतंत्र शोधग्रंथ लिहिण्याचा संकल्प सोडला. आता असा ग्रंथ लिहिणे म्हणजे प्रत्यक्ष पानिपतच्या युद्धभूमीवर जाऊन तिचे निरीक्षण करणे क्रमप्राप्तच होते. ते त्यांनी केलेच; परंतु त्याच्याही आधी वीस वर्षे, शेजवलकर मराठ्यांच्या इतिहासातील अटक नावाच्या ठिकाणी असलेला किल्ला पाहण्यासाठी गेले होते. येथील अहमदशहा अबदालीच्या तळावर हल्ला करून त्याला पिटाळून लावल्यामुळे पानिपत जणू अपरिहार्य झाले होते.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३०५

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३०५
अटकेचा किल्ला (पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमा)
२० एप्रिल १७५८ मधे तुकोजी होळकर व साबाजी शिँदे यांनी जिँकला आणि अटकेपार मराठी भगवा फडकला.
इ.स.१७५२ मधे महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अत्यंत अभिमानास्पद अशी घटना घडली. राघोबादादा पेशव्यांनी आताच्या पाकिस्तानात असलेल्या अटकेपर्यँत धडक मारुन मराठी साम्राज्याचा भगवा झेंडा तिथे रोवला. ही घटना तिथे मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक आहे. या पराक्रमावरच अटकेपार झेंडे रोवणे नावाची म्हणही अस्तित्वात आली.
१७५२ मधे अफगाणिस्तानच्या अहमदशाहा अब्दा
लीने तत्कालीन हिँदुस्तानातील लाहोर आणि मुलतान या मोगलांच्या प्रांतावर स्वारी करुन ते काबीज केले. ही बातमी पुण्यात आल्यावर मराठ्यांना करारानुसार बादशहाच्या रक्षणासाठी जाणे आवश्यक होते. त्याप्रमाणे रघुनाथराव पेशव्यांच्या पुढाकाराखाली उत्तरेची मोहीम काढण्यात आली. रघुनाथराव दिल्लीला गेले तेव्हा खुद्द बादशहानेच मराठ्यांविरुद्ध कारस्थान चालविलेले पाहुन रघुनाथरावांनी त्यास कैद केले आणि बहादुरशाहाचा एक नातु अजीजउद्दीन यास तख्तावर बसवुन व रोहीलखंडात बंदोबस्त ठेवुन ते दक्षिणेत परतले.
मराठ्यांची ही हीँम्मत पाहुन दिल्लीतले सगळे राजपुत, अफगाण, मुसमान दरबारी संतापले. पण राघोबादादा दिल्लीत असेपर्यंत ते काही करु शकले नाहीत. मराठ्यांची पाठ फिरल्यानंतर या दरबारी धेडांनी गुप्तपणे निरोप धाडुन अब्दालीला पुन्हा एकदा हिँदुस्थानात स्वारी करण्याचे निमंत्रण दिले. त्या वेळेपर्यंत अब्दालीने जिँकलेले लाहोर व मुलतान परत दिल्लीच्या बादशहाच्या हातात गेलेले होते. अब्दालीने १७५६ मधे पुन्हा स्वारी करुन ते जिँकले. दिल्लीत येऊन नवीन बादशहाला कैद केले आणि त्याच्याकडुन खंडणी वसुल केली. रघुनाथरावाने सोडविलेली मथुरा, वृंदावन हि हिँदुंची पवित्र क्षेत्रे लुटली. आधीच्या बादशहाला पुन्हा गादीवर बसवुन तो परत गेला.
हे कळताच मराठे संतापले. आता बादशहा आणि अब्दाली दोघांचे कंबरडे मोडायचे या हेतुनेच जंगी तयारी करुन रघुनाथराव पुण्याहुन निघाले. आधीच्या स्वारीचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. यावेळी दिल्ली शहरात आणि तिथल्या कारभारात गूतुन न राहता त्यांनी पंजाबात वायव्येच्या दिशेने मुसंडी मारली. पंजाबाच्या एकेक नद्या पार करीत सरहिंद येथे अब्दालीच्या समदखान या सरदाराचा ८ मार्च १७५८ ला पराभव केला. त्याहीपुढचा भीमपराक्रम म्हणजे लाहोर, मुलतान हे प्रांत काबीज करुन थेट सिंधु नदी गाठली. तिच्या तीरावरील अटक या गावी दि.१० ऑगस्ट १७५८ रोजी आपली छावणी टाकली. त्या आधीच म्हणजे २० एप्रिल १७५८ रोजी अटकेचा किल्ला तुकोजी होळकर व साबाजी शिँदे यांनी जिंकला हे मराठ्यांचे आणि कुठल्याही हिँदु आणि दक्षिण राजवटीचे उत्तर हिंदुस्थान सरहद्दी बाहेरील पहीले यश मानले जाते.
तिकडे ईराणच्या शहानेही अब्दालीचा पराभव केला आणि राघोबादादाकडे पत्रे पाठवुन मराठ्यांशी मैत्री राखण्याबद्दलची मनीषा व्यक्त केली. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठी साम्राज्याच्या शौर्याचा हा कळसबिंदु मानता येईल. इराणच्या राजाने महाराष्ट्रातल्या मराठींशी दोस्तान्याचा पैगाम पाठविणे याचा अर्थ मराठ्यांच्या पराक्रमाला, शौर्याला मिळालेली पावती आहे. मराठ्यांचा दरारा किती होता हेही या घटनेवरुन दिसुन येते. भिमथडीच्या तट्टांनी प्रथमच सिंधु नदीचे पाणी प्यायले. बखरकारांनी मराठ्यांचा हा भीमपराक्रम मोठ्य सुरसतेने वर्णन केला आहे. मानाजी पायगुडे लाहोरवर चालुन गेले परंतु तयदरशहा व जहानखान यांनी पळ काढल्याने अनायसे लाहोर मराठ्यांच्या ताब्यात आले यावरुन मराठी पराक्रमाची कल्पना येते.
पुढे त्यांनी अफगाणांचा पाठलाग करीत चिनाब गाठली. रावी, बियास एकेक नद्या ओलांडल्या. दक्षिणी फौज दिल्ली पलीकडे आली नव्हती ती चिनाब सिँधुपर्यंत पोचली. इराणच्या पातशहाची पत्रे रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर दोघांनाही आली की,
"कंदाहरी येऊन यांचे पारिपत्य करा आणि अटकेची हद्द करावी".
रघुनाथरावाने ही वार्ता पुण्यास कळविताना म्हटले की," काबुल कंदाहर अटकेपारचे सुभे हिँदुस्तानचे अकबरापासुन आलगिरापावेतो होते ते आम्ही विलायतेत का द्यावे. आम्ही कंदाहारपावेतो अंमल बसवून तुर्त त्यास गोडीचा जाब पाठवणार आहोत".
मराठी फौजा मूलतान अटकेपर्यंतचा पंचनंदचा मुलूख करून मुलूख करुन माघारी निघाल्या. पेँढारी व लष्कर कुबेर झाले. रघुनाथराव मल्हारराव यांनी मोठे यश संपादले.
(संदर्भः महाराष्ट्राच्या कालमुद्राः लेखक म. वि. सोवनी)

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३०४

 




हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३०४
मराठ्यांच्या सर्वात शक्तिशाली राजधानीची स्थापना - सातारा
इसवी सन 1719 ते 1749 याकाळात हिंदुस्थानचे राजकीय आणि आणि लष्करी केंद्र , तसेच मराठा साम्राज्याची राजधानी होते सातारा.सातारा हि मराठा साम्राज्याची सर्वात शक्तिशाली राजधानी ठरण्याचे कारण म्हणजे, १७०८ ते १७४९ च्या काळात या राजधानीवर कधीही हल्ला झाला नाही.त्याशिवाय कोणत्याही आपत्तीत ५०,००० सैन्य लगेच सातार्यात जमा होऊ शकेल अशी व्यवस्था हि त्याकाळी अस्तित्वात होती.
'रायगड' मराठ्यांची एकेकाळची राजधानी परंतु १६८९ मध्ये ती मोगलांनी जिंकली, १७४९ नंतर राजधानी पुण्याला हलली पण राजधानी असताना अनेकदा पुणे शहर शत्रूच्या ताब्यात गेले, लुटले गेले अथवा हल्ल्याला बळी पडले.
१७०८ साली थोरले शाहू मराठ्यांचे चौथे छत्रपती झाले, दरम्यानच्या काळात मराठ्यांनी बचावात्मक धोरण सोडून आक्रमक पवित्रा स्वीकारला होता.दिल्लीवर नजर असलेल्या शाहू छत्रपतींनी किल्ल्यावरून पायउतार होऊन जमिनीवर राजधानी निर्मिण्याचे योजले. सातारा शहर आहे त्या ठिकाणी पूर्वी कसलेही मौजे गाव अथवा कोणताही कसबा नव्हता. मराठा छत्रपतीने नव्याने निर्माण केलेले हे पहिलेच शहर. वाडी,गाव,कसबा असा विकास होत शहर न होता थेट शहर म्हणून निर्मिती झालेलेही सातारा पहिलेच होय.म्हणजेच सातारा जन्मापासूनच शहर होते.
शाहू महाराजांनी शहराच्या निर्मितीच्या वेळी अनेक व्यापारी आणि रहिवासी पेठा वसवल्या.'सदाशिव पेठ' हि प्रमुख व्यापारी पेठ होती. सोमवार,मंगळवार,बुधवार,गुरुवार,शुक्रवार ,शनिवार,रविवार,माची पेठाही वसवल्या गेल्या. शाहूंनी आपले जुने सहकारी ज्योत्याजी केसरकर यांच्या नावाने केसरकर पेठही वसवली होती.शहरात पाणीपुरवठा व्हावा या दृष्टीने आधुनिक पद्धतीचे लहान आणि मोठे कालवे (aqueduct) शहरातून बांधण्यात आले.शाहूंची दूरदृष्टी बघा हि यंत्रणा सातार्यात १७१५ सालीच अस्तित्वात आली तर पुणे आणि कोल्हापूर येथे पाणीपुरवठा यंत्रणा येण्यास १७५९ आणि १७९२ साल उलगडावे लागले.
पेठांबरोबरच काही पुरे जसे कि राजसपुरा,व्यंकटेश पुरा,चिमणपुरा ,कानपुरा,रघुनाथपुरा हे पुरेही अस्तित्वात आले.१७२१ नंतर मल्हार पेठ,यादो गोपाळ पेठ,दुर्गा पेठ यांनीही सातार्याच्या विकासात भर घातली, आणि सातारा राजधानीच्या शहराप्रमाणे शोभून दिसू लागले. विशेष म्हणजे त्याकाळी शहराचा दर्जा फक्त सातार्यालाच होता.
विशेष गोष्ट अशी कि राजधानी असल्यामुळे सातार्याचा विकास त्याकाळात पुणे,कोल्हापूर यापेक्षा वेगाने झाला.फडणीस,दफ्तरदार ,कारकून यासोबतच 'कोतवाल' (पोलीस आयुक्त) आणि कमाविसदार (शहर आयुक्त) या दोन विशेष नेमणुकाही सातार्याच्या प्रशासकीय यंत्रणेत करण्यात आल्या.
सातारा शहर फक्त मराठ्यांची राजधानीच नाही तर देशाची राजकीय राजधानी बनले,मराठ्यांच्या शक्तीचे केंद्र बनले आणि याबरोबरच शाहू छत्रपतींच्या यशाचा कीर्तिस्तंभ सुद्धा बनले.
म्हणूनच कदाचित सातारकरांनी आणि प्रजेनी शाहूंना मानवंदना म्हणून सातार्याला 'शाहूनगरी' असे हि नाव दिले.
चित्र - १. शाहू छत्रपती आणि नानासाहेब पेशवे २. सातारा शहराची प्रशासकीय व्यवस्था ३.शहररचनेचा एक नमुना ४. मराठा वास्तुकला
- मालोजीराव जगदाळे

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३०३

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३०३

सरदार भापकरांचा इतिहास-

बेळगावा जवळ असलेल्या चांद-शिंद नावाच्या छोट्याश्या कड्या कपारीतल्या गावामध्ये
राहणारी कडक व चपळ असलेले ९६ कुळी मराठा अशी लोक म्हणजे चव्हाण सरदार घराणे.
हि मंडळी म्हणजे अति विश्वासू व प्रामाणिक म्हणून राजाचे खास संरक्षक.
थोडक्यात म्हणजे राजाच्या असलेल्या चार संरक्षक कड्यापैकी सर्वात आतली प्रथम
संरक्षक व अभेद्य भिंत म्हणजे चव्हाण लोकांना काम असायचे.
वेळ आल्यावर स्वताच्या जीवावर उदार होऊन राजाचे रक्षण करणारी हि विश्वासू मंडळी.
सर्वात प्रथम शिवाजी महाराजांनी या लोकांना स्वताच्या संरक्षणासाठी नेमले.
त्या वेळेस रात्र-दिवस भाले हातात पकडून महाराजांचे रक्षण करायचे.
म्हणून त्यांचे नाव भालापकड असे पडले.
मग हळू हळू हे नाव भापकर असे पुढे रूढ झाले.
त्या वेळेस महाराजांनी त्यांना चौदा गावचे सुभे दिले व
कायमचे पुणे व आसपासच्या भागात स्थलांतरित केले.
पुढे राजाच्या विश्वासू रक्षकाची हि परंपरा अखंडित चालू राहिली.
पेशव्यांच्या काळात यांना पेशव्यांनी लोणी भापकर व आसपासची दहा गावे बक्षीस
म्हणून दिले.
पानिपतच्या युद्धात भापकरांचा बराचसा नाश झाला. कारण सगळ्याच पेशव्यांचे
रक्षण व लढण्यात वाकबगार असणारी मंडळी पानिपत मध्ये अविश्वसनी मारली गेली.
दोघे चौघे कसे तरी जीव वाचवून माघारी आले पण तोपर्यंत काही पुण्यातील लोकांनी यांची
गावे बळकावली होती व घरादाराची लुटालूट झाली होती.
त्यामुळे एका गावात राहणाऱ्या भापकर घराण्याला गाव सोडायची वेळ आली.
पुढे जाऊन जिकडे जिकडे थोडी फार शेती भाती राहिली होती तिकडे तिकडे हे
सारे लोक स्थलांतरित झाले. सोनाजी भापकर लोणी मध्येच राहिले. तिथल्या
काही मंडळीनी त्यांचे खूप हाल केले. पण ते शेवटपर्यंत गावातच राहिले.
काही भापकर आपल्या आजोळी म्हणजे जाधवांकडे साताऱ्यात गेले.
काही भापकर मामाकडे म्हणजे शिंदे कडे पुण्यात आले.
काही भापकर जाधवांचे आजोळ नगर मध्ये गेले.
काही आत्या कडे म्हणजे जुन्नर,नाशिक भागात गेले.
पण खरा वारसा आपला भापकरांचा म्हणजे विश्वासू, लढवय्ये, प्रामाणिक व दयाळू हा आहे.
परोपकार करणे म्हणजे भापकरांचा हात कुणीही धरत नाही.
भापकरांच्या घरातली मुलगी जरी असली तरी ती ज्या घरात जाते त्या घरात वातावरण
आनंदी व सुखमय करून टाकते.
गणेश भापकर.
९८९०००८८५९.


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३०२

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३०२

थोरल्या शाहू महाराजांनी आपल्या बुद्धी कौशल्याने बाजीराव व चिमाजी आप्पा या धोरणी बंधुंच्या सहकार्याने मध्य प्रदेशातील चंबळ प्रदेशा पर्यंतच्या प्रदेशावर धाड टाकून आपला साम्राज्य विस्ताराचा संकल्प सोडला .
हे सर्व करित असताना लगाम आपल्या हाती ठेवून महाराष्ट्राच्या सीमेचे विस्तारण पेशव्यांच्या माध्यमातून करुन घेतले . शाहु महाराजांचा पेशव्यांवर वचक होता . प्रसंगी पेशव्यांना नेतृत्व हीन करूनही त्यांची महाराजां वरील श्रद्धा कमी झाली नाही . हे सारे वैभव व आपल्या विरश्रीला मिळालेले उत्तेजन शाहु महाराजांमुळेच मिळाले आहे अशी त्यांची भावना होती . या श्रद्धे पोटीच महाराजांचे जोडे नानासाहेब पेशवे आपल्या देव घरात ठेवून त्यांची पुजा करत असत.
एक उदात्त , व सर्वांवर उदार अंत: करणाने प्रेम करणारा हा राजा होता .
__/\__ थोरले शाहु महाराज

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३०१


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३०१
शिवशाहीचा गुप्तहेर (बहिर्जी नाईक)
बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं नाव. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा साक्षीदार म्हणजेच नाईक होते.
दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला हिरा आहेत हे राज्यांनी ओळखेले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले. महाराज नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले.
बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फ़ुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं. ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त अदिलशहा व बादशहा कडुन ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य दिसुन येतं. महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तिन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकिची माहिती देणा‍‍र्यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणुकाही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वार्याचे आवाज असे. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं. त्याठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असं म्हटलं जात कि महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे-थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची. ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहिर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटणेचा ते खुप बारकाईने विचार करी. शत्रुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रुला चुकिची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रुच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहीती ते ठेवत.
शिवाजी राजे व शंभु राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काहि दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पुर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले. हा एकच प्रसंग परंतु महारांजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणुन त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफ़जलखानाचा वध, पन्हाळ्यावरुन सुटका, शाईस्ताखाणाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लुट असो प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पुर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रुची इत्यंभुत माहिती महाराजांना दिली होती.बर्याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करुन पाऊल टाके. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट मंडळाची निर्मीती केली होती त्यात गुप्तहेर खातं तयार करण्यात आलं होतं. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते.
अश्या ह्या बहिर्जी नाईकांपासुन व त्यांच्या हुशारी पासुन आपण शिकण्यासारखं बरच काहि आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे लाखमोलाचे योगदान विसरु नका.
जय महाराष्ट्र