Total Pageviews

Saturday, 14 March 2020

स्वराज्याचे पांडव भाग ३ संताजी घोरपडे

स्वराज्याचे पांडव

 भाग ३

 संताजी घोरपडे

Znalezione obrazy dla zapytania: संताजी घोरपडे

 

संताजी घोरपडे ह्यांच्याबद्दल लिहायला लागलो तर कित्येक वर्ष अपुरी पडतील. संताजी एक रणझुंजार सेनापती आणि युद्धाच्या डावपेचात तरबेज असे योद्धा होते. संपूर्ण मोगल छावणीवर त्यांनी दहशत बसवली होती. मोगल इतिहासकार खाफी खानच्या मते संताजीं विरुद्ध लढाईचे फक्त ३ परिणाम असू शकतात - मरण पत्करणे, खंडणी देऊन वाट मागणे किंवा युद्धकैदी होणे. संगमेश्वरला संभाजी महाराजांना वाचवण्याच्या प्रयत्नात वडील म्हाळोजी बाबा घोरपडेंना वीरमरण आल्यावर संताजींना सरनोबत नेमण्यात आलं. ह्या पट्टीच्या तालवारबाजाच्या शौर्याला कोणतीच सीमा माहिती नव्हती. गनिमीकाव्यात तरबेज असे संताजी ह्या दृष्टीने शिवाजी महाराजांचे खरेखुरे शिष्य होते. त्यांच्या गनीमीकाव्यांनी आणि त्यातून होणाऱ्या नुकसानीमुळे मोगल सैन्य संताजींना जाम घाबरून होतं. कुठून येऊन संताजी नावाची वीज आपल्यावर कोसळेल ह्याचा त्यांना भरोसाच राहिला नव्हता. अशाच एका प्रसिद्ध प्रसंगात संताजी ह्यांनी आपले बंधू बहिर्जी आणि विठोजी चव्हाण ह्यांच्यासोबत, लाखो मोगल सैन्यांनी घेरलेल्या औरंगजेबाच्या तंबूवर थेट छापा घातला. केवळ दैव बलवत्तर म्हणून औरंगजेब त्यादिवशी संताजींच्या हाती सापडला नाही.

संताजींच्या नावाचा उदय खऱ्या अर्थानी १६८९ च्या रायगडाच्या वेढ्या नंतर झाला. महाराष्ट्रात सह्याद्री पासून थेट जिंजी पर्यंत धनाजी जाधवांच्या साथीने त्यांनी मोगल सैन्यात हाहाकार माजवला होता. साधारण १९९० पासून १९९५ पर्यंत जुल्फिकार खान, अलिमर्दा खान, कासीमखान किरमाणी आणि खानाजाद खान सारख्या मातब्बर मोगल सरदारांना संतांजींनी आपल्या तलवारीचे पाणी पाजवून पराभूत केले. १६९६ मध्ये जर फितुरीमुळे संताजींचा दुर्दैवी मृत्यू ओढवला नसता तर त्यांच्या पराक्रमाने आणखीन काय इतिहास घडवला असता ह्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.लवकरच संताजींवर आधारित लेखांची मालिका आपणापर्यंत पोचवण्याचा मनोदय आहे

No comments:

Post a Comment