स्वराज्याचे पांडव
भाग ५
धनाजी जाधव
धनाजी जाधव हे सुद्धा पराक्रम आणि शौर्य ह्यांच्या बाबतीत संताजींच्या तोडीसतोड होते. संताजींच्या तुलनेत त्यांचा स्वभाव थोडा शांत, संयमी होता आणि जिभेत थोडा अधिक गोडवा होता. संताजींबरोबर त्यांची युती ही मोगल सैन्यासाठी महाराष्ट्र आणि दक्षिणेत दोन्ही आघाड्यांवर जणू कर्दनकाळच ठरली. धनाजींचा पराक्रम आणि त्यांनी मोगलांवर बसवलेल्या दहशतीचा एक किस्सा खाफी खान सांगतो - जेव्हा जेव्हा मोगली घोडे पाणी पिण्यास नकार द्यायचे तेव्हा त्यांचे मालक त्यांना "तुम्हाला पाण्यात धनाजीचे प्रतिबिंब दिसलं का काय?" असा सवाल करायचे. राजाराम महाराज आणि संताजीचे संबंध जेव्हा दुरुस्त होण्यापलीकडे बिघडले तेव्हा धनाजींना राजाराम महाराजांनी सरनोबत नियुक्त केले. धनाजींनी स्वराज्याची अथक सेवा राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वात तशीच अखंडित चालू ठेवली
धनाजींच्या नेतृत्वाखाली हळू हळू मराठा सैन्याने गमावलेला प्रदेश व किल्ले परत हस्तगत केले. १७०८ ला धनाजींच्या मृत्यू च्या समयी युद्धाचं पारडं स्वराज्याकडे निर्णायकरित्या झुकले होते. कठीण समयी आपल्या तलवारीचा पराक्रम आणि नेतृत्त्व कौशल्य ह्याच्या जोरावर गनिमांचा पाडाव करून धनाजींनी स्वराज्य अबाधित राखण्यात महत्वाचा वाटा उचलला
No comments:
Post a Comment