Total Pageviews

Monday 26 November 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८७

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८७
सरलष्करं सेनापती "मह्लोजी घोरपडे
भाग
बघता बघता मुकर्रब खान हाजीरं झाला संगमेश्वरंला आणि मराठ्यांचा पाचशे माणूसमेळं पहिला आणि कडाडला..."यल्गारं...!!!"
......"हर हर महादेव"ची आरोळी घुमली आणि बघता बघता तलवारी खणानू लागल्या. झाडा-पानांवरची पाखरं...फड..फड..फड करत उडाली. अरे! काळोखं थरारला, रात्रं थरारली आणि बघता बघता आक्रोश किंकाळ्यांनी परीसरं दुमदुमून गेला.
शौर्याची लाट!..लाट!..लाट! अवघं तुफान..तुफान झालं. अरे! एक-एक मावळा झुंजत होता शर्तीनं लढतं होता...बस्सं!!! मोघलांचा काताकुट करत होता.
शिवाजीराजे सांगायचे "माझा एक मावळा शंभराला भारी आहे". इथं एक मावळा पाचाशेला भारी पडतं होता. मोघलांना..बस्सं!!! कापत होता...सपासप्प्प्प!!!...मुकर्रब बघत होता पण! मराठ्यांच्या शौर्यापुढं काही..काही चालत नाही. आपल्या राजासाठी, स्वराज्यासाठी इथंला एक-एक गडकोटासारखा झुंजत होता. अरे! स्वतः साठ वर्षाचा "मालोजी" दोन्ही हातात समशेरं घेऊन लढतोय अफाट!..अफाट! ताकदीनं...येईल त्याला सरळं कापतोय. रक्ताच्या चिळकांड्या,,,मांसाचे लद्दे......अरे! खचं प्रेतांचा...! आणि मुकर्रबनं ते शौर्य बघितलं आणि कडाडला..."इस बूढें को पहलें लगाम डालों" तसं सगळं यौवनी सैन्यं महलोजी बाबांच्या भोवती गोळा झालं. अभिमन्यू चक्रव्यूव्हात अडकवा तसा मह्लोजी अडकला, दोन्ही हातात समशेरी. याच समयी मोघलांचे एकाचंवेळी वारं झाले, हातातल्या दोन्ही तलवारींनी ते पेलंले. मह्लोजी खाली बसला, साठं वर्षाचं रगदारं शरीरं...रक्तं उफाळल...वीज लखंलखंली सप्प्प्प्प्प..!!! रक्ताच्या चिळकांड्या उडवीत पहिली फरी गारं झाली,,,दुसरी फरी,,,तिसरी फरी...अरे! तो जोश वेगळा, तो आवेश वेगळा...ते शौर्य बघितलं आणि मग! मुकर्रबला कळलं ""वाघ"" कसा असतो.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८६

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८६
सरलष्करं सेनापती "मह्लोजी घोरपडे
भाग
संभाजी राजांना कानोकान खबरं न्हवती, आपण औरंगजेबाच्या गहऱ्या चालीत फसत निघालोय. औरंगजेबाची चाल यशस्वी झाली होती. संभाजींना रायगडाबाहेरं काढण्यात यश आलं होतं. आता संभाजी गेले होते पन्हाळ्यावरं, पन्हाळ्यावरं होते सरलष्करं सेनापती "मह्लोजी घोरपडा" वयं वर्ष ६०, शरीरं थकलं असेलं पण! मनगटातली रग आणि छातीतली धग विझली न्हवती. आल्या आल्या संभाजी राजांनी विचारलं..."मालोजी काका मुकर्रब खानाची कोण हालचाल?" आणि कडाडला मालोजी गावराण बोलीत...
"राजं..! त्यो काय इतूयं,
आम्ही हाय न्हवं,
रेटतू की त्याला...!"
आणि संभाजी म्हणाले..."मालोजी तुमच्या खांद्यावरं तरं सुरक्षित आहे स्वराज्यं"...पण! त्याचं वेळी हेर धावत आला, संभाजींना सांगता झाला..."राजं ! .. राजं ! रायगडला यातीगात खानाचा घेरा पडलाय" आणि काळजाचा ठोका चुकला "रायगड" म्हणजे "राजधानी", महाराणी तिथं आहेत, बाळंराजे तिथं आहेत आणि "स्वराज्यं सिंहासन" तिथं आहे...कुणी डावेनं डाव मांडला? आणि संभाजी राजे निघाले. मह्लोजींना सांगितलं..."लागली गरजं तरं हाकं मारू, लगोलग येउन मिळा आम्हांस!" आणि संभाजी अवघ्या "शंभर" भालायतांसोबत निघाले रायगडाकडं.
पण! तत्पुर्वीचा औरंगजेबाचा खलिता मुकर्रब खानाकडं आलाय..."तो संभाजी रायरीचा जहागीरंदार शिर्केंशी भांडण केलंय म्हणून तिकडं आलाय, आता नामी संधी आहे". आणि ती बातमी घेऊनच मुकर्रब खानानं रायगडला जाणाऱ्या सगळ्या वाटा आधीच जेरबंद करून ठेवल्या. संभाजी राजांनी वाटा शोधल्या पण! वाटा सगळ्याच गिरफ़्तारं, जेरबंद मुकर्रबच्या तावडीत. एक वाट होती शिल्लकं, गर्दबिकटं, वहिवाट असलेली, निबिड, काट्या-कुट्याची, किर्र झाडांची, भयाण कडेकपाऱ्यांची, दऱ्या-खोऱ्यांची बिकट..संभाजी राजांनी तिचं वाट निवडली..."" संगमेश्वराची ""

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८५

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८५
शहाजीराजेंचा जीवनक्रम
सांभार : मराठीदेशा .कॉम
भाग

साल तारीख महिना ठळक घटना
१५७० मालोजीराजांचा जन्म
१५९४ शहाजीराजेंचा जन्म
१६०० मालोजीराजेंनी शिंगणापूर येथे तलाव बांधला
१६०३ मालोजीराजेंना निजामशहाकडून जहागिरी
१६०६ मालोजीराजेंचा इंदापूर(पुणे) येथे मृत्यु
१६१० शहाजीराजे व जिजाऊंचा विवाह
१६१६ रोशनगावच्या लढाईत निजामाचा सेनानी मलिकंबर पराभूत
१६१९ जिजाऊंच्या पोटी संभाजीराजेंचा जन्म
(छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू)
१६२४ भातवढीच्या लढाईत मलिकंबर विजयी
१६२५ शहाजीराजे आदिलशाहीत
१६२६ शहाजीराजेंचा तुकाबाईंशी विवाह(छत्रपती एंकोजीराजेंच्या मातोश्री)
१६२६ मे १४ निजामाचा सेनानी मलिकंबर याचा मृत्यु
१६२८ फेब्रुवारी ४ शहाजहान मोघल बादशाह झाला
१६३० फेब्रुवारी १९ छत्रपती शिवरायांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म
१६२८ शहाजीराजे निजामशाहीत परतले
१६२९ जुलै २५ लखुजी जाधवरावांची निजामशाहकडून हत्या
१६३० नोव्हेंबर शहाजीराजे मोघलांकडे
१६३३ मार्च निजामशाहच्या वारसाला गादीवर बसवून
शहाजीराजेंचा कारभार·
१६३६ ऑक्टोबर शहाजीराजेंचा पराभव,शहाजीराजे आदिलशाहीत
१६३८ शहाजीराजेंचे बेंगलोर येथे वास्तव्य
१६४८ जुलै २५ शहाजीराजेंना आदिलशाहकडून जिंजी येथे कैद
१६४९ मे १६ शहाजीराजेंची सुटका
१६५१ गोवळकोंड्याच्या सैन्याचा शहाजीराजेंकडून पराभव
१६६४ ानेवारी २३ शहाजीराजेंचा होदेगिरीच्या जंगलात मृत्यु

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८४


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८४
सांभार : मराठीदेशा .कॉम
भाग
स्वतंत्र मराठा साम्राज्याचा संकल्प पुर्ण
शहाजीराजेंच्या निजामशाह,मोघल व अदिलशाह यांच्याकडे चाकरी केली पण ते आपला स्वाभिमान कधीच विसरले नाहीत.स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी आपले पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराष्ट्रात धाडिले,सोबत विश्वासू लोक पाठविले.बंगळूरमध्ये असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लष्करी तसेच मुलकी शिक्षण दिले.पुढे स्वराज्य स्थापनेचे त्यांचा संकल्प त्यांचे थोरले पुत्र छत्रपती शिवाजी राजेंनी पुर्ण केला व त्यांनी एक विशाल मराठी राज्य निर्माण केले.तर धाकटे पुत्र व्यंकोजीराजे यांनी तामीळनाडूतील तंजावर येथे दुसरे स्वतंत्र मराठी राज्य निर्माण केले.
होदेगिरीच्या जंगलातील छत्रपती शहाजीराजे भोसले यांची समाधी

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८३

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८३
।।स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले।।
सांभार : मराठीदेशा .कॉम
भाग

बंगळूरमध्ये असताना स्वराज्याच्या संकल्पनेला पुर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी आपले धाकटे चिरंजीव छत्रपती शिवाजी महाराजांना पुणे परगण्यात स्वतंत्र कारभार करण्यासाठी पाठविले.राजेंसोबत त्यांनी कान्होजी जेधे,रांझेकर,हणमंते आदि विश्वासू मावळ्यांना पाठविले.छत्रपती शिवरायांना त्यांनी राज्यकारभारासाठीची आवश्यक असणारी राजमुद्राही दिली.
अदिलशाहीत दगा व सुटका
पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र राजकारभार चालू केल्यानंतर अदिलशाहचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने दगा करून बाजी घोरपडे, मंबाजी बोसले,बाळाजी हैबतराव,बाजी पवार आदिच्या साहाय्याने शहाजीराजेंना जिंजीजवळ कैद केले व साखळदंडानी बांधून विजापुरच्या दरबारात हजर केले.तो दिवस होता इ.स.२५ जुलै १६४८.छत्रपती शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळताच त्यांनी मुत्सदीपणाने मोघल बादशाह शहाजहानला पत्र पाठवून आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीश्वराची चाकरी करू इच्छितात असे सांगितले व बदल्यात शहाजीराजेंची सुटका करण्यासाठी विजापुरच्या अदिलशाहवर दबाव आणावा असे सांगितले.हा मुत्सद्दीपणा यशस्वी ठरला व शहाजीराजांची दि.१६ मे,इ.स.१६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.
शहाजीराजेंचा दुदैवी मृत्यु
इ.स.१६६१-इ.स.१६६२ च्या कालावधीत शहाजीराजे महाराष्ट्रात आले.महाराष्ट्रात आल्यावर आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले.पण पुढे ते आपल्या जहागिरीमध्ये परतले.माघ शुध्द ५,इ.स.२३ जानेवारी १६६४ मध्ये बंगळूर जवळील होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा पाय वृक्षवेलीमध्ये अडकला व ते घोड्यासहीत खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८२

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८२
।।स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले।।
सांभार : मराठीदेशा .कॉम
भाग

निजामशाहीचा स्वतंत्र कारभार
दिल्लीश्वर शहाजहान व महंमद अदिलशाह यांच्या संयुक्त फौजांनी निजामशाही संपवण्यासाठी आक्रमण केले.अहमदनगरजवळील भातवढीच्या रणांगणात शहाजीराजेंनी वजीर मलीक अंबरच्या मदतीने मोघल व अदिलशाहच्या फौजेचा पराभव केला हा ऐतिहासिक युध्द इ.स १६२४ मध्ये झाले.पण या लढाईत शहाजीराजेंचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले.
शहाजीराजेंनी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला.अहमदनगर जिल्ह्यातील,संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर त्यांनी निजामशाहच्या मुलाच्या नावाने छत्र धारण केले होते.त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता.पण पुढे वजीर मलिक अंबरच्या निजामशहाच्या दरबारातील वागणूकीमुळे त्यांनी अदिलशाहची चाकरी पत्करली.
शहाजीराजेंना अदिलशाहने सरलष्कर हा किताब दिला तसेच त्यांना बंगळूरची जहागिरीही दिली.अदिलशाहच्या चाकरीत असताना शहाजीराजेंनी पुणे परगणा निजामशाहकडून जिंकून घेतला.बंगळूरमध्ये त्यांनी तुकाबाईशी दुसरा विवाह केला.तुकाबाईपासून त्यांना व्यंकोजी(एकोजी)हा पुत्र जाहला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८१

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८१
।।स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले।।
सांभार : मराठीदेशा .कॉम
भाग

सासरे लखुजी जाधव यांच्याशी बेबनाव
मालोजीराजेंच्या दुदैवी मृत्यूनंतर शहाजीराजेंनी आपल्या पराक्रमाने निजामशाहच्या दरबारात मानाचे स्थान पटकावले.पुढे लखुजी जाधव व शहाजी राजे यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला,कारण होते पिसाळलेल्या हत्तीस काबूत करण्याचे.निजामशाहच्या दरबारातील एक हत्ती पिसाळला होता,हत्तीस पकडण्यास दोन पथके तयार केली गेली.पहिले पथक जाधवांचे होते,त्याचे नेतॄत्व लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाईचा भाऊ दत्ताजीराव जाधव करत होता.तर दुसरे पथक भोसले यांचे होते.त्याचे नेतृत्व शहाजीराजे भोसले यांचे बंधू संभाजीराजे भोसले करत होते.यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले.हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसल्यास ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासऱ्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.
छत्रपती शहाजीराजे भोसले

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८०

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८०
।।स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले।।
सांभार : मराठीदेशा .कॉम
भाग

वेरूळच्या मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांनी पुत्र व्हावा म्हणून अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस केला होता.त्यामुळे पुत्र झाल्यावर शहाजी व शरीफजी अशी आपल्या पुत्रांची नावे त्यांनी ठेवली.शहाजीराजेंचा जन्म इ.स.१८ मार्च,१५९४ रोजी झाला.
शहाजीराजेंचे पिता मालोजीराजे भोसले निजामशाहच्या चाकरीत होते. निजामशाहच्या दरबारात सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव हे सुध्दा चाकरीत होते.जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.पुढे निजामशाहच्या पुढाकाराने शहाजीराजेंचा विवाह,लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी जिजाबाई यांच्याशी इ.स.१६०३ मध्ये झाला.शहाजीराजें व जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये झाली.त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते.त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजीराजेंचा सांभाळ जिजाबाईंनी केला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७९

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७९
तुळाजी आंग्रे-:
इतिहासातील अद्वितीय पराक्रमी योद्धा …
भाग २ ..
सुवर्णदुर्गाशिवाय मराठ्यांनीं तुळाजीचे आणखी सहा किल्ले इंग्रंजाच्या मदतीनें काबीज केले. नंतर पावसाळा सुरु झाल्यामुळें मोहीम थांबली. पावसाळा संपल्यावर मोहिमेस पुन्हां सुरुवात झाली. आंग्रे दरसाल पेशव्यास कांहीं खंडणी पाठवीत असत. ती तुळाजीनें बंद केल्यामुळें ती मागण्याकरितां पेशव्यांचे वकील मध्यंतरीं तुळाजीकडे गेले असतां त्यानें त्यांचीं नाकें कापून परत पाठविलें होतें, त्यामुळे पेशवे जास्त चिडले. पेशव्यांची फौज खंडोजी माणकराच्या हाताखालीं आंगर्‍याच्या मुलुखांत शिरून त्याचा प्रदेश काबीज करीत चालली. तिनें विजयदुर्ग किल्ल्याशिवाय बाकीचा सर्व प्रदेश काबीज केला. (जाने. १७५६). तेव्हां तुळाजी आंग्रे पंताकडे येऊन तहाच्या खटपटीस लागला. त्यावेळीं (फेब्रु. १७५६) इंग्रजी आरमार विजयदुर्गपुढें येऊन दाखल झालें, त्यावेळीं तुळाजीचें व पेशव्यांचें तहाचें बोलणें चाललें असल्याचें इंग्रज अधिकारी वाटसनला कळलें. परंतु तुळाजीशीं तह करावयाचा नाहीं, असा निश्चय करुन एकदम किल्ला स्वाधीन करण्याविषयीं वाटसननें त्यास निरोप पाठविला व वेळेवर जबाब न आल्यामुळें आणि पेशवेहि जरा कां कूं करीत आहेत असें पाहून ता. १२ रोजीं इंग्रजांनीं किल्ल्यावर तोफांचा मारा सुरु केला. चार वाजतां इंग्रजांचे गोळे आंगर्‍यांच्या जहाजांवर पडून त्यांचीं सर्व लढाऊ जहाजें जळून खास झालीं. ता. १३ रोजीं सकाळीं इंग्रजांचे कांहीं लोक जमीनीवर उतरले. पेशव्यांची फौजहि उतरणार होती. तीस उतरूं देऊं नये म्हणून इंग्रजांनीं पुन्हां किल्ल्यावर मारा सुरु केला. कॅप्टन फोर्ड आपले लोक बरोबर घेऊन संध्याकाळीं किल्ल्यांत शिरला; आणि त्यानें वर इंग्रजांचें निशाण लाविलें. तहाची वाटाघाट चालू असतां इंग्रजांनीं किल्ल्यास वेढा दिला म्हणून तो उठविण्याबद्दल रामाजीपंतानें पुष्कळ प्रयत्‍न केले. इंग्रजांस किल्ल्यांत दहा लक्षांचा ऐवज मिळाला. तो त्यांनीं सर्व ''तुम्ही तुळाजीशीं संधान ठेवून करार मोडला अशी'' उलट सबब सांगून एकट्यानींच दडपला. वास्तविक इंग्रज हें मदतीस आले होते व मराठे सांगतील त्याप्रमाणें त्यांनीं वागण्याचें काम होते. असें असतांना किल्ला घेण्यासठीं व मराठे आरमारांत दुफळी जाणून इंग्रजांनीं किल्ला घशांत उतरविला. यानंतर एक महिन्यांत तुळाजीचा सर्व प्रांत व २७ किल्ले दोस्तांनीं घेतले. शेवटीं तुळाजी हा पेशव्यांचा खंडोजी माणकर यांच्या स्वाधीन झाला. त्यास मरेपर्यंत कैदेंत ठेविलें. तुळाजीनें कैदेंत असतांनाच फंदफितुरी करुन पेशव्यांस बराच उपद्रव दिला. नानासाहेबांच्या मृत्युसमयीं तुळाजी दंगा करणार होता. तुळाजीस वंदन, सोलापुर, राजमाची, विसापुर, नगर , चाकण, दौलताबाद वगैरे ठिकाणच्या किल्ल्यांत कैदेंत ठेविलें होतें. अखेर तो वंदन येथें कैदेंतच मेला. कैदेंत त्याच्या पायांत बेडी असे. मात्र त्याचे पत्र व बायका बरोबर असत. पुत्रांनींसुद्धां बंडें वगैरें केलीं. त्या सर्वांच्या पोटगीचा बंदोबस्त पेशव्यांनीं ठेविला होता. तुळाजीचे दोन मुलगे बारा चौदा वर्षानीं कैदेंतून पळून मुंबईस इंग्रजांच्या आश्रयास गेले असें म्हणतात. एका इंग्रज व्यापार्‍यानें तुळाजीचें वर्णन पुढीलप्रमाणें केलें आहे. ''तुळाजी निमगोरा, उंच, भव्य देखणा व अत्यंत रुबाबदार होता. त्याला पाहिल्याबरोबर मूर्तिमंत शौर्याची कल्पना मनांत येई. त्याची कृतीहि रुपास साजेशीच होती. कोणतेंहि जहाज त्याच्या तावडींत सांपडलें म्हणजे तें सहसां सुटून जात नसे. इंग्रज व्यापारी त्याच्या त्रासास इतके कंटाळलें कीं, ''देवा कसेंहि करुन यास आमच्या तावडींत आणून दे,'' अशी परमेश्वराची ते करुणा भाकूं लागले. तुळाजीची शक्ति व तयारी परिपूर्ण होती. त्याची बंदरें भरभराठींत असून रयत सुखी होती. तीस हजार फौज त्याजपाशीं जय्यत होती. तोफखान्यावर अनेक कुशल यूरोपीय लोक लष्करी व आरमारी कामें झटून करीत होते. त्याच्या आरमारांत साठांवर जहाजें असून शिवाय हत्ती, दारुगोळा व शस्त्रास्त्रें असंख्य होतीं. (राजवाडे खंड १,२,३,६; शाहुमहाराज चरित्र; धाकटे रामराजेचरित्र; ब्रह्मेंद्रचरित्रः पत्रें यादी; इ.सं. आंगरें हकीगत; कैंफियती; नानासाहेबांची रोजनिशी; फॉरेस्ट-मराठा सिरीज; एडवर्ड ईव्ह-व्हायेज ऑफ इंडिया; डफ.)
http://itihasbynikhilaghade.blogspot.com

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७८

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७८
तुळाजी आंग्रे-:
इतिहासातील अद्वितीय पराक्रमी योद्धा …
भाग १
. लेखक श. श्री. पुराणिक लिहितात की, "तुळाजीची कोठेही समाधी नाही पण, सारा विजयदुर्ग हीच तुळाजीची समाधी आहे." तुळाजी आंग्रे- तुळाजी हा कान्होजी आंग्रयाचा रक्षापुत्र (राजवाडे खं. ६ ले. ४५३). त्याच्या आईचें नांव गहिनाबाई. स. १७३४ त हा आपला सावत्र बंधु संभाजी याजबरोबर हबशापासून अंजनवेल काबीज करण्यास गेला. संभाजी दौलतीवर असतां हा त्याचा कारभारी होता. मन १७४० त हिराकोटाजवळ संभाजीच्या व पेशव्यांच्या लोकांत जी झटपट झाली तींत हा जखमी होऊन पेशव्यांचा हातीं सांपडला. पुढें (१७४१ डिसेंबर) संभाजी मरण पावल्यावर याचें व पेशव्याचें सडकून वैर जुंपलें. यानें यमाजी शिवदेवाच्या वशिल्यानें मानाजीविरुद्ध शाहूकडे कारस्थान चालविलें. तेव्हां जो अंजनवेल घेईल त्यास सरखेलीचें पद देऊं अशी शाहूनें अट घातली, त्याप्रमाणें तुळाजीनें स. १७४२ त अंजनवेलचा किल्ला घेतला. त्यावर आंग्रे घराण्यांतील तंटा मिटविण्याकरितां शाहूनें मानाजीस वजारतमाब हा किताब देऊन त्यास कुलाब्याचा अधिकार दिला व तुळाजीस सरखले ही पदवी देऊन सुवर्णदुर्गापासून थेट दक्षिण कोंकणपर्यंतची हद्द वाटून दिली. ही तडजोड तुळाजीस पसंत पडली नाहीं. त्यानें मानाजीचे कबिले अडकवून ठेविल्यामुळें ब्रह्मेंद्रस्वामीनें ते सोडून देण्याविषयीं त्यास एक पत्र लिहिलें. शाहूच्या पश्चात् तर तुळाजीनें वर्तन अनावर झालें.रयतेस छाडाछेड केली. तो सरकारांत नेमणुकीप्रमाणें ऐवज न भरतां उद्दामपणें वागूं लागल व पेशव्यांस मुळींच जुमानीनासा झाला. ताराबाईचा व पेशव्यांचा तंटा जोरांत असतां तुळाजीनें उचल घेतली; आरमाराच्या जोरानें पेशव्याविरुद्ध वावरणार्‍या तुळाजीसक नुसत्या फौजेच्या बळावर जिंकणें पेशव्यांस शक्य नव्हतें. या कारणास्तव आरमारास प्रतिआरमार आणून तुळाजीशीं युद्ध करण्याचा व्यूह रचला. तुळाजीचा नाश करण्यास इंग्रज टपलेलेच होते. यामुळें पेशव्यांनीं इंगर्जांची मदत मागतांच त्यांनीं ती मोठ्या खुषीनें देऊं केली. यावेळीं रत्‍नागिरी किल्ला बावडेकर अमात्यांचा असून तो तुळाजीनें हस्तगत केला होता, तो व सुवर्णदुर्ग असे दोन किल्ले तुळाजीजवळ पेशव्यानें मागितले. तुळाजी म्हणाला कीं सुईच्या आग्राइतकी मृत्तिका देणार नाहीं. तेव्हां पेशव्यानें ''रामाजी महादेव यांस सांगून, इंग्रज अनुकूल करुन तुळाजीवर मसलतीचा योग मांडिला. सुवर्णदुर्गांत व विजयदुर्गांत वगैरे फितुरांची संधीनें रामाजी महादेव खेळूं लागले.'' तुळाजीविरुद्ध पेशव्यांनीं करवीरकरांशींहि कारस्थान आरंभिलें तेव्हां करवीरकर यांनीं तुळाजीकडून अंमल दूर करुन सरकारांत दिला (१८ फेब्रुवारी १७५५) . रामाजी महादेवामार्फत इंग्रज व पेशवे यांच्या दरम्यान करार होऊन (१९ मार्च १७५५) इंग्रजांचें आरमार मुंबई बंदर सोडून निघालें (२२ मार्च). दुसर्‍या दिवशीं कमांडर जेम्स यानें राजापुरी बंदराबाहेर आंगर्‍यांच्या १८ जहाजांचा पाठलाग करुन त्यांनां पळवून लाविलें. पुढें पेशव्यांचीं ७ तारवें, १ बातेला व ६० गलबतें इंग्रजांस मिळालीं (ता. २५), ता. २९ ला इंग्रजांचा व आंगर्‍यांचा सामना होऊन, इंग्रज आंगर्‍यांचा पाठलाग करीत जयगडपावेतों जाऊन दुसर्‍या दिवशीं सुवर्णदुर्गास परत आले. त्याच वेळीं रामाजीपंत हा किल्ल्यावर मारा करीत होता. त्यास इंग्रजांनीं मदत केली. किल्ल्यांतील लोकांचाहि मारा कांहीं कमी नव्हता. ता. ३ एप्रिल रोजीं किल्ल्यांतील दारुखाना आग लागून उडाला व यामुळे किल्ल्यांतील लोक सैरावैरा पळूं लागले. दुसर्‍या दिवशीं संध्याकाळीं तहाचें बोलणें लावण्यास किल्ल्यांतील लोक रामाजीपंताकडे आले. परंतु ते बोलाचालींत वेळ काढून बाहेरच्या मदतीची वाट पहात आहेत अशी शंका येऊन रामाजीपंतानें ता. १२ रोजीं तोफांचा मारा करुन किल्ला घेतला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७७

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७७
ठाणे-साष्टी मुक्तीचा इतिहास
लेखक : -पांडुरंग बलकवडे
२७ मार्च हा दिवस ठाणे शहराच्या दृष्टीने अतिशय पवित्र असतो. कारण २७९ पूर्वी म्हणजेच २७ मार्च १७३७ रोजी सव्वादोनशे वर्षांच्या पोर्तुगीजांच्या अन्यायकारी गुलामीतून ठाण्याची मुक्तता झाली होती. त्या संघर्षाचा इतिहास अतिशय प्रेरणादायी आहे. इसवी सन १५००च्या सुमारास व्यापाराचे निमित्त करून आलेल्या पोर्तुगीजांनी हळूहळू सत्ता प्राप्त करून प्रजेला गुलाम केले. संपत्ती आणि धर्मांतरासाठी अतोनात अत्याचार केले. छत्रपती शिवराय आणि त्यांच्यानंतर संभाजीराजांनी त्यांच्या दुष्कृत्यांना पायबंद घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला. संभाजी राजांच्या पश्‍चात औरंगजेबाच्या आक्रमणाचा फायदा उठवून पोर्तुगीजांनी पुन्हा थैमान घातले होते. त्यांच्या अत्याचाराला कंटाळलेली प्रजा शाहू छत्रपती आणि पेशव्यांकडे सतत गार्‍हाणी घालत होती. बाजीराव पेशव्यांनी आपले धाकटे बंधू चिमाजी आप्पा यांच्यावर पोर्तुगीजांच्या ताब्यातील ठाणे-वसई भागाला मुक्त करण्याची जबाबदारी सोपविली. गुढी पाडव्याचा सण साजरा करून मराठी फौज मोहिमेवर निघाली. चिमाजी आप्पांनी मराठी सैन्याचे दोन भाग केले होते. शंकररावजी केशव फडक्यांच्या नेतृत्वाखाली एक सैन्यदल वसई जिंकावयास तर सुभेदार बलकवडे आणि सुभेदार खंडोजी माणकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे-साष्टी जिंकावयास दुसरे सैन्य निघाले होते. पोर्तुगीजांच्या अत्याचाराला कंटाळलेला ठाणे-वसई परिसरातील सर्व समाज मराठ्यांच्या फौजेला सर्व प्रकारचे सहकार्य करावयास सिद्ध झाला होता. त्यांचे नेतृत्व मालाडचे अंताजी कावळे तसेच अणजूर गावचे गंगाजी, मुर्हारजी, बुबाजी, शिवाजी, नारायण नाईक, अंजूरकर बंधू करीत होते. पोर्तुगीजांचा ठाणे प्रांताचा सुभेदार होता लुई बहेलो. याच्याच मार्गदर्शनाखाली इंजिनीअर अँद्रो रिबेरो कुतिन्हु याने इ. स. १७३४ च्या सारास ठाणे शहराला भक्कम तटबंदीने बंदिस्त केले होते व त्यात सुसज्ज बालेकिल्ल्याची उभारणी केली होती. यामुळे मराठी सैन्यासमोर मोठे आव्हान होते. २६ मार्च १७३७ च्या रात्री खाडीच्या बाजूकडील पाणबुरूज आणि तटबंदीवर शिड्या लावून अचानक हल्ला केला. स्थानिक रहिवासी लक्ष्मण राऊत, हंसा कोळी, बुबाजी नाईक अणजुरकर यांच्या सहाय्याने खाडीच्या बाजूने किल्ल्यात प्रवेश मिळविला. होनाजी बलकवड्यांनी आपल्या सैन्यासह ठाण्याच्या जमिनीकडील बाजूने हल्ला केला. त्यांच्या बरोबर इतर अणजूरकरबंधू रामाजी महादेव, रामचंद्र हरी होते. तुकनाक, धोंडनाक, गणनाक, फकीर महंद ही स्थानिक मंडळी मोलाची मदत करीत होती. मराठ्यांच्या या अचानक झालेल्या हल्ल्याने माघार घेऊन लुई बहेलो याने सर्व फौजेसह कुटूंबकबिल्यासह पलायन केले. रणवाद्ये वाजवीत मराठ्यांनी ठाण्यात प्रवेश केला. अशा पद्धतीने आपल्या पराक्रमाची शर्थ करून सव्वा दोनशे वर्षांच्या पारतंत्र्यातून महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी ठाणे-साष्टीवर शिवरायांचा भगवा फडकला. या कामगिरीबद्दल चिमाजी आप्पा पेशव्यांनी सर्व पराक्रमी योद्ध्यांचा यथोचित सन्मान केला. कोणाला सोन्याची कडी, कोणाला सोन्याच्या मोहरा, तर विशेष कामगिरी करणार्‍यांना वतने जमिनी इनाम दिल्या. अशा पद्धतीने मराठ्यांनी एका पाश्‍चात्त्य आधुनिक पोर्तुगीज सत्तेच्या जोखडातून ठाणे-साष्टी मुक्त करून देदीप्यमान इतिहास घडविला. त्याचे स्मरणे करणे यथोचित आहे.
(लेखक इतिहास संशोधक आहेत.)

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७६

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७६
चिमणाजीआप्पा, (धाकटे) —
भाग
इकडे नाना फडणीस शिंद्यांच्या भयानें (ज्यावेळीं शिंदे पुण्यास आले तेव्हांच) सातार्‍याकडे निघून गेले होते. तेथून ते मेणवलीस गेल्यानंतर चिमाजीआप्पाचें दत्तविधान झालें (मे २६) व सातारकर महाराजांकडून त्यांनां पेशवाईची वस्त्रेंहि मिळालीं (२ जून); परंतु नानानीं निजाम, इंग्रज, होळकर, भोसले वगैरे मंडळींशीं राजकारण करून चिमाजीआप्पाचें उच्चाटन घडवून आणलें. त्यांनीं आपल्या मुत्सद्देगिरीनें खुद्द दौलतराव शिंद्यांसहि फोडले व त्याच्या तर्फे रावबाजीशीं सूत्र लावून त्यास गादीवर बसविण्याचें (बाजीराव रघुनाथ म्हणून) ठरविलें. या वेळीं रावबाजी जांबगावीं होते. या वर्षी दसर्‍याचा समारंभ फार थाटाचा झाला. चिमाजीआप्पाची स्वारी मोठ्या समारंभानें निघाली होती. पण हें आपलें वैभव १५-२० दिवसांतच नष्ट होणार हे श्रीमंतांच्या ध्यानांतहि आलें नाहीं. शेवटीं २६ ऑक्टोबरच्या रात्रीं या (चिमाजीस गादीवर बसविण्याच्या) सर्व कारस्थानाचा उत्पादक बाळोबातात्या पागनीस व त्याचे साथीदार यांनां दौलतरावांने कैद केलें. पहाटे होळकर व निजामाची फौज शनिवारवाड्यावर चालून आली. तत्पूर्वी रात्रींच एक चूकी झाल्यानें भाऊ व चिमाजीआप्पा निसटले. परशुरामभाऊस पकडण्याची चिठ्ठी परशुरामवैद्य यास जावयाची असतां, चुकून जासुदानें ती भाऊजवळच नेऊन दिली. तेव्हां भाऊ तात्काळ हजार पांचशें स्वार घेऊन व चिमाजीआप्पास आपल्या घोड्यावर घेऊन जुन्नरकडे पळालें. परंतु हजुरातीनें त्यांनां तेथें पकडून भाऊस मांडवगणच्या किल्ल्यांत व चिमाजीआप्पास शिवनेरीस कैदेंत ठेविलें. नंतर ठरल्याप्रमाणें नाना पुण्यास आले व रावबाजी गादीवर बसले (४ दिसेंबर). हें सर्व कारस्थान नानांचेच होतें. पुढें चिमाजी आप्पास शिवनेरीहून पुण्यास आणलें व ते शनीवारवाड्यांतच राहू लागले. तेव्हा रावबाजीनें पुण्यांतील पंडितांनां विचारून त्यांनी सांगितल्यावरून (अशास्त्रीय दत्तविधान झाल्यामुळें) चिमाजीआप्पास सक्षौर प्रायश्चित देवविलें (१७९७ नोव्हेंबर). शिंद्याच्या गृहकलहानें पुण्यास भानगडी चालू झाल्या, त्या सुमारास रावबाजीनें चिमाजीचें लग्न केले (८ जून १७९८). मुलगी आप्पाजीपंत दामले यांची नात होती; तिचें नांव सीताबाई होतें. दुसरी बायको सत्यभामाबाई नांवाची, मंगळवेढेकर मेहेंदळ्यांचीं मुलगी होती; हिचें लग्न १८१२ सालीं झालें. आप्पांचा राज्यकारभारांत फारसा प्रवेश झाल्याचें आढळून येत नाहीं. फक्त स. १७९७ च्या सुमारास गुजराथचा सुभा पेशव्यांनीं यांच्या नांवचा करून दिला होता व यांची मुतालिकी आवा शेलुकरास सांगितली होती. एवढाच उल्लेख आढळतो. पेशवाई नष्ट झाल्यानंतर यांनां इंग्रजानें पेन्शन देऊन काशीस ठेविलें व ते तेथें ९ जून १८३० रोजीं वारलें. यांची पुढील हकीकत आढळत नाहीं. [खरे-खंड, ७, ९, १०; डफ-पु.३; राजवाडे-खंड,४].

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७५

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७५
चिमणाजीआप्पा, (धाकटे) —
भाग
हे राघोबादादाचे व आनंदीबाईचे धाकटे औरस पुत्र. यांचा जन्म ता. ३० मार्च १७८४ रोजीं कोपरगांवीं झाला. राघोबादादा वारले तेव्हां चिमणाजीआप्पा यांच्या वेळीं आनंदीबाई चार महिन्यांची गरोदर होती. धाकटे बाजीराव व चिमाजीआप्पा दादासाहेबाच्या पश्चात् बरेच दिवस आनंदवल्लीस राहिले होतें. आप्पांची मुंज ८ मार्च १७८९ रोजीं झाली. खर्ड्याच्या स्वारीच्या वेळेस रावबाजी कांहीं खूळ उत्पन्न करतील म्हणून या दोघा भावांनां आनंदवल्लीहून काढून शिवनेरीस नजरकैदेंत ठेविलें होतें. सवाईमाधवराव वारल्यानंतर मुत्सद्यांच्या व मराठामंडळाच्या आग्रहावरून एखादा गोत्रज यशोदाबाईच्या मांडीवर दत्तक बसवावा असें नानांनीं ठरविलें, परंतु पुण्यांतील लोकांनां तें पसंत पडलें नाहीं. त्यांचें म्हणणें रावबाजी व धाकटा चिमणाजी जिवंत असतां परक्याला दत्तक कां घ्यावें? इकडे रावबाजीनींहि दौलतराव शिंद्यांस सव्वाकोट रु. देण्याचें अमीष दाखवून आपल्यास गादीवर बसविण्यासाठीं त्याची अनुमति मिळविली. तेव्हां नानांनीं पटवर्धन, रास्ते, वगैरे सरदारांच्या सल्ल्यानें चिमणाजीस दत्तक घेण्याचें ठरवून परशुरामभाऊस चिमराजीस आणण्यासाठीं जुन्नरास पाठविलें. चिमणाजी हा यशोदाबाईचा चुलत सासरा होता व धर्मशास्त्राप्रमाणें सुनेस सासरा दत्तक घेतां येत नसे. यात तोड अशी काढिली की, चिमणाजीनें फक्त सरकारकागदोपत्रीं चिमराजी माधवराव म्हणावें व खासगी व धार्मिक व्यवहारांत चिमणाजी रघुनाथ म्हणावें. पुण्याच्या लोकांच्याहि मनांत चिमणाजीसच दत्तक घ्यावें असें होतें. परंतु रावबाजीनें दौलतरावाच्या हिमायतीवर नानांचा हा बेतच मुळांत खोडून टाकला. आपणच बाजीराव रघुनाथ म्हणून पेशवे व्हावयाचें; आपण किंवा चिमाजी दत्तक जावयाचें नाहीं. असें त्यानीं ठरविलें व त्यास परशुरामभाऊहि अनुकूल झाले व नानांनींहि काळवेळ जाणून त्यास रुकार दिला. त्याप्रमाणें भाऊ या मंडळींस घेऊन पुण्यास आले (मार्च १७९६). यावेळीं चिमणाजीआप्पा घोडी भरधांव सोडून भाले फेकण्यांत तरबेज झाला होता. हा रंगानें फार गोरा, चपल व क्रोधिष्ट असे. रावबाजीनें पुण्यास आल्यावर दौलतराव शिंद्यास सव्वाकोट रु. देण्याचें लांबणीवर टाकलें व पुढें पुढें तर ते निव्वळ दौलतरावाच्या सल्ल्यानेंहि चालेनात. तेव्हां शिंद्यानें व परशुरामभाऊनें मसलत करून पेशवाईंचीं वस्त्रें घेण्याच्या निमित्तानें रावबाजींनां पुण्याच्या बाहेर काढून थेऊर येथें त्यांनां प्रथम कच्या प्रतिबंधांत ठेविलें (८ एप्रिल). पुढें देण्याघेण्याचे खटके मोडण्यासाठीं रावबाजी हे शिंद्याच्या गोटांत ता. ९ मे रोजीं रात्रीं गेले असतां शिंद्यानें त्यांनां कायमची नजरकैद केली व त्याच रात्रीं भाऊनें चिमाजीस बळजबरीनें (तो येत नसतांहि त्यास जबरदस्तीनें) पालखीत घालून पुण्याचा रस्ता पकडला; त्यानंतर मुहूर्त पाहून १२ मे रोजी शनिवारवाड्यांत प्रवेश केला (तोपर्यंत रास्त्यांच्या वाड्यांत राहिले होते)

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७४

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७४
चिमणाजीआप्पा —
भाग
बाजीरावाचें व आप्पाचें शेवटी शेवटीं बिनसलें असावें. ''श्रीमंत (मस्तानीमुळें) विषयलंपट झाले, यामुळें आप्पाशीं अंतर पडून नर्मदातीरीं गेले.'' आप्पानीं १७४० च्या जानेवारींत फिरंग्याचें रेवदंडा नांवाचें (गोवें व दमण या मधील) राहिलेलें एकच ठाणें काबीज केलें. येथून परत आल्यावर आप्पांची प्रकृति वाख्यानें ढासळली. आप्पांची पहिली बायको रखमाबाई, ही त्रिंबकरावमामा पेठेची बहीण होती. हिचाच पुत्र सदाशिवराव भाऊ. भाऊचा जन्म झाल्यानंतर २८ दिवसांनींच ही वारली (३१-८-१७३०) त्यानंतर आप्पानीं अन्नपूर्णाबाई नांवाची दुसरी स्त्री केली (डिसें. १७३१). हिला बयाबाई नांवाची एक मुलगी झाली (नोव्हें. १७४०). आप्पांची प्रकृति एकदां बिघडली ती न सुधारतां अखेर पुणें येथें त्यांचें देहावसान झालें (डिसें. १७४०) त्यावेळीं अन्नपूर्णाबाई ही सती गेली. या और्ध्वदेहिकास ११७५ रु. खर्च झाला. बयाबाई ही गंगाधर नाईक यास दिली (१४ एप्रिल १७४५); ती पुढें १७५९ त वारली. आप्पा हे थोरल्या बाजीरावापेक्षां कांहीं बाबतींत श्रेष्ठ होतें. त्यानीं बाजीरावास त्याच्या दोषांवर पांघरूण घालून शेवटपर्यंत पाठपुरावा केला. बाजीरावास पेशवाई मिळाली तेव्हांच आप्पांस त्यांची मुतालिकी मिळाली होती. आप्पा विचारी, धोरणी, मनमिळाऊ, शूर व नीतिमान होते. वसईच्या किल्ल्यांत सांपडलेल्या फिरंगी सरदाराच्या सुस्वरूप मुलीस त्यांनी सन्मानानें परत पाठविलें ही गोष्ट प्रख्यातच आहे. शाहू व इतर सरदार मंडळी बाजीरावाकडील काम आप्पांच्या मध्यस्तींनें उरकून घेत. बाजीरावाचीं मुलें बहुधा आप्पाजवळच असत. त्यांनां शिक्षणहि आप्पांनींच दिलें होतें. कौटुंबिक व्यवस्थाहि तेच पहात असत. बाजीरावानें उत्पन्न केलेल्या अनेक प्रकरणांचा निकाल आप्पाच लावीत. नानासाहेबांच्या अंगी जो अष्टपैलु मुत्सद्दीपणा आला होता त्यांचे श्रेय आप्पांसच होतें. आप्पानां गुजराथी लोक चिमणराजा म्हणत असत. डफ म्हणतो कीं पोर्तुगीजांवर मिळविलेल्या अनेक विजयांमुळें आप्पांची कीर्ति महाराष्ट्रांत अजरामर झाली. पाश्चात्य राष्ट्रांशीं लढण्याचे वारंवार प्रसंग आल्यानें त्यांचें असें ठाम मत झालें होतें की तोफखाना व कवायती पायदळाशिवाय पाश्चात्यांबरोबर टिकाऊ जय मिळणें नाहीं. [डप. पु.१, २; मराठी रिसायत, मध्यविभाग; नानासाहेब रोजनिशी; पत्रें यादी वगैरें; ब्रह्मेंद्र स्वामीचरित्र: राजवाडे खं. २, ३; शाहू म. ची बखर; पंतप्रधान शकावली, पृ.७].

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७३

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७३
चिमणाजीआप्पा —
भाग
फिरंग्यांच्या धार्मिक जुलुमानें कंटाळलेली अंताजी रघुनाथ व अणजूरकर नाईक वगैरे प्रांतस्थ प्रमुख मंडळी मराठ्यांस अनुकूल झाली होती. फिरंग्यांचें आरमार व सैन्य सुसज्जित असतांहि मराठ्यांनीं चिकाटीनें व शौयानें वसईसह त्यांचा वरील सर्व प्रदेश काबीज केला. पुढें (१७३८) फिरंग्यांनीं त्या प्रांतीं असलेल्या शंकराजी केशव, रामचंद्र हरि वगैरे सरदारांवर जय्यत तयारीनिशी मोहिम केली. परंतु या सुमारास मराठे भोपाळच्या मोहिमेंत गुंतल्यानें वसईभागांत त्यांनां फारशी हालचाल करतां आली नाहीं. त्यानंतर १७३८ च्या नोव्हेंबरांत आप्पा वसईच्या स्वारीवर निघाले. सहा महिने या स्वारीचा हंगाम चालू होता. दमण ते दीवपर्यंतचा सर्व किनारा त्यांनीं हस्तगत केला. या भागांत सर्वत्र चकमकी सुरू होत्या व आप्पा या सर्व किनार्‍यावर एकसारखे लढत होते. त्यांनीं प्रथम माहीम सर केले (डिसेंबर). येथें शंभर गलबतें भरून इंग्रज व हबशी यांची मदत फिरंग्यास झाली असतांहि मराठ्यांनीं माहीम काबीज केलें. नंतर केळवें, शिरगांव, डहाणू, अशेरी वगैरे ठाणीं घेतलीं. (जानेवारी १८३९). या सर्वांत तारापूरचें ठाणें मजबूत असल्यानें तेथें शिताफीचा रणसंग्राम झाला. पण अखेर तारापुरचा किल्ला मराठ्यांनीं घेतला. मात्र येथें बाजी भिवराव हा नामांकित सरदार ठार झाला (जाने.). नंतर आप्पानीं वसईवर हल्ला केला. हा वेढा तीन महिने चालू होता. मराठ्यांनी अत्यंत चिकाटीनें युद्ध चालवून हा किल्ला अखेर १३ मे रोजीं फिरंग्यांपासून काबीज केला (वसई पहा). दुसरीकडे वांदरा, वेसावे, धारावी वगैरे ठाणीं आप्पांच्या सरदारांनीं काबीज केलींच होतीं (फेब्रु). वसईच्या मोहिमेचीं खास अप्पानीं ब्रम्हेंद्रस्वामीस लिहिलेलीं पत्रें वाचण्यालायक आहेत. (राजवाडे खं. ३ ले. २७; काव्येतिहास सं. पत्रें यादी ले. ४३९). सारांश या मोहिमेंत फिरंग्यांचा सुमारें पाऊणशें मैल लांबीचा (३४० गावें असलेला) प्रदेश आप्पानीं काबीज केला. त्याशिवाय ८ शहरें, २० किल्ले, २५ लाख किंमतीचा दारूगोळा व जहाजें, तोफा इतकें सामान आप्पानीं हस्तगत केलें. यावेळीं आप्पानें अगर पेशव्यानें वसईस मराठी आरमाराचा एक सुभा स्थापून इंग्रजास पायबंद घालावयास पाहिजे होता, परंतु हें त्या दोघांच्याहि लक्ष्यांत आलें नाहीं. पुढें पेशव्यांचें निजामाशीं युद्ध झालें त्यांत आप्पाहि सामील होतें (१७४०). त्यावेळी मुंगीपैठणचा तह होऊन आप्पा परतले. इतक्यांत आंग्र्यांच्या घरांत कलह माजला व मानाजीनें मदतीस बोलाविल्यावरून आप्पा कोंकणांत गेले व त्यांनीं तेथें संभाजी आंग्र्यांचा पराभव करून त्याला सुवर्णदुर्गास परतविलें (१७४०). इतक्यांत थोरले बाजीराव वारल्यानें आप्पा बरोबर नानासाहेबांस घेऊन, पुण्यास व तेथून सातार्‍यास गेले व त्यांनीं नानासाहेबास पेशवाईचीं वस्त्रें मिळवून दिलीं. (आगष्ट १७४०).

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७२

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७२
चिमणाजीआप्पा —
भाग
हा बाळाची विश्वनाथ पेशवे यांचा दुसरा पुत्र. याच्या जन्माचे १६९० (राजवाडे), १६९७ (अ. कोशकार) व १७०८ (सरदेसाई) असे निरनिराळे सन आढळतात. दमाजी थोराताच्या कैदेंत बापाबरोबर चिमणाजी कांहीं दिवस होता (१७१३). पेशवाई मिळाल्यानंतर थोरल्या बाजीरावानें मोगलांच्या विरुद्ध जें चढाईचें धोरण स्वीकारलें, त्यांत माळवा प्रांतीं मुलुखगिरी करण्याच्या कामावर पेशव्यांनीं चिमणाजी आप्पास नेमिलें. तेव्हांपासून आप्पा स्वार्‍यांमोहिमांवर जातीनिशी जाऊं लागले. सारंगपूर येथें राजा गिरधर, माळव्याचा सुभेदार याच्यावर स्वारी करून आप्पानीं त्यास ठार मारिलें (१७२४). तसेंच आप्पांनीं त्याच्या नंतरच्या माळव्याचा सुभा दयाबहादुर याच्यावरहि १७३०/३१ त दोन स्वार्‍या करून त्याला तिरलच्या लढाईंत ठार केलें व माळवा हस्तगत केला (आक्टो. १७३१). परंतु शाहूच्या आज्त्रेनें आप्पा माळव्यांतून निघून शिद्दीवर कोंकणांत गेले. सरबुलंदखानापासून त्यांनीं १७३० त गुजराथेंत चौथाईचा अंमल बसविला. त्रिंबकरावदाभाडे यांच्या पारिपत्याच्या प्रकर्णी बाजीराव व आप्पा यांचें ऐकमत्य होतें (१७३१), पुढें (१७३३) शिद्दीवरील स्वारींत प्रतिनिधीच्या मदतीस आप्पा यास जाण्याबद्दल शाहूनें आज्त्रा केली; परंतु शिद्दीच्या तर्फे निजामानें कारस्थान चालविल्यामुळें, निजामावर दाब ठेवण्यासाठीं आप्पा शिद्दीवर गेल्यानें व सेखोजी आंग्रे मरण पावल्यानें आप्पा हे शिद्दीच्या विरुद्ध आक्टोबरांत कोंकणांत चढाई करून गेले (१७३३). मराठ्यांचें निजामाशीं युद्ध चालूं असतां तापी नदीच्या आसपास निजामाला पायबंद म्हणून आप्पा फौजबंद होऊन राहिले होते (१७३८). यापुढें वसईच्या मोठ्या मोहिमेंत आप्पा प्रमुख होते. ही मोहीम दोन वर्षे चालू होती. प्रथम ठाणें व साष्टी काबीज केली (१७३७ जून). यावेळीं आप्पानीं बेलापूर, मांडवी, टकमक, कामणदुर्ग, मनोर वगैरे पुष्कळ ठाणीं फिरंग्यांपासून घेतलीं.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७१

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७१
खंडोजी माणकर—
हा खरवलीचा राहणारा असून फिरंग्यांशीं १७३७ ते ४० पर्यंत मराठ्यांच्या ज्या लढाया झाल्या त्यांत एक प्रमुख लढवय्या होता. मानाजी व संभाजी आंग्रे यांच्या भांडणांत पेशव्यांनी शंकराजी फडक्याबरोबर यास मानाजीच्या मदतीस पाठविलें होतें. साष्टीबेट काबीज करण्याच्या कामी खंडोजीनें बरीच मेहनत केली. पटवर्धन, जोशी व खंडोजी यांनीं रात्रीचे चोरून छापे घालून ठाण्याचा किल्ला काबीज गेला. (२७।३।३७). त्या वेळीं तेथील किल्लेदारी खंडोजीकडेच सोंपविण्यांत आली. पुढें वसईच्या मोहिमेच्या वेळीं खंडोजीनें वांदरे, वेसावें व धारावी वगैरे ठिकाणें हस्तगत केलीं (फेब्रु. १७३९). वसई पाडाव करतांना खंडोजीनें वेष पालटून गुराखी म्हणून किल्ल्यांत नौकरी धरून भेद काढला होता. याचे वंशज कुलाबा जिल्ह्यांत माणगांव तालुक्यांत खरवलीस रहातात, त्यांनां खरवली वगैरे गांवें इनाम आहेत. [पेशव्यांची बखर; म. रियासत, मध्यविभाग].

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७०

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७०
कृष्णाजी नाईक जोशी— (चासकर घराणें)
हा शिवकालीन मुत्सद्दी पन्हाळ्यास सुरनीस होता. त्यास महाराजांनीं तंजावरास व्यंकाजी राजाकडे जें शिष्टमंडळ पाठविलें त्यांत धाडलें होतें. यास पुढें शाहुमहाराजांनीं सर्व राज्याची पोतदारी दिली. पूर्वीचे पोतदार श्रीगोंदेकर पुंडे हे ताराबाईच्या पक्षास चिकटून राहिल्यामुळें व कृष्णाजीनें "मोंगलाईतून येतेसमयी स्वामींच्या व राजाच्या कल्याणाविषयीं बहुत श्रम साहस केल्यावरून... पोतदारीचा धंदा हुजुराचा व सर कारकून व सरदार यांजकडील वंश परंपरेनें" इनाम दिला. यांचा पुत्र महादाजी. हा चासकर घराण्याचा मूळपुरुष. महादाजी यांचा गोविंदा म्हणून एक भाऊ होता. या दोघांनीहि बापाप्रमाणेंच शिवाजी राजे - संभाजी राजे -राजाराम यांच्या वेळीं स्वराज्याची सेवा उत्कृष्ट केली. "महादाजी कृष्ण हे संभाजी राजे व धनाजीसमवेत फौजा घेऊन गेले" त्यामुळें राजाराम यांनीं त्यांनां खवली गांव इनाम दिला. त्यानंतर वेड्या शिवाजीच्या (कोल्हापूर गादी ) वेळींहि यांनीं व यांचा मुलगा बाळाजी महादेव याने (भाऊ, रामचंद्र व कृष्ण यांसह) सरकार सेवा केलेली आहे असें खुद्द करवीरकर संभाजी महाराजांनीं म्हटलें आहे. महादाजीनी रांगणा येथें बाळाजी विश्वनाथास मदत केली. तसेंच कान्होजी आंग्रे व बाळाजीपंत यांचा स्नेहहि त्यानींच जमविला. महादाजीपंताची मुलगी ही थोरल्या बाजीरावसाहेबांस दिली होती. त्यांचें नांव काशीबाई. महादाजी हे सावकार असल्यानें बाळाजीपंतांना त्यांचा बराच उपयोग झाला होता. [भा. व; रा. खं. २०; म. रि.] सातार्‍यास व्यंकटपुर्‍यांत असलेलें कृष्णेश्वराचें देऊळ या महादाजी कृष्णरावांनीच बांधल्याचा उल्लेख करणारा शिलालेख (शके १६४५ चा) तेथें आहे. या देवळाच्या पुढील हल्लीचा व्यंकटपुरा त्यावेळीं नसून तेथें महादाजीपंतानें सदाशिवपुरी नांवाची पेठ वसविली होती. महादाजीकडे लोहगडचा कारभार होता. कृष्णराव महादेवास पेशव्यांनीं चास येथें सरंजाम दिल्यामुळें या घराण्यास चासकर म्हणूं लागले. महादाजींचा पुत्र कृष्णराव हा सन १७३३ मध्यें फिरंग्यांच्या स्वारीवर गेला होता. तत्पूर्व त्याला पेशव्यांनीं कल्याणची सुभेदारी दिली होती. त्यावेळीं (स. १७३०) त्यानें भिवंडीच्या खाडीपलीकडील कांबें हें फिरंग्याचें ठाणें काबीज केलें होतें.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १६९

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १६९
बेलसर ची लढाई -कावजी मल्हार राव
विजापूरचा आदिलशाही सरदार फत्तेखान हा मोठ्या फौजेनिशी कऱ्हेपठारात (पुरंदर तालुका) शिरला. त्याचा तळ जेजुरीजवळच्या बेलसर गावाजवळ पडला. त्याला खात्रीच होती की , शिवाजीराजांचं बंड आपण लौकरात लौकर साफ मोडून काढू. त्यांनी आपल्या सैन्याचा एक विभाग शिरवळवर पाठविला. नीरा नदीच्या काठी शिरवळला एक भुईकोट किल्ला नव्या स्वराज्यात राजांनी कब्जा केलेला होता. त्याचं नाव ' सुभानमंगळ '. शाही फौज मोठी होती. तिने सुभानमंगळ एका घावातच जिंकला. मराठ्याचा हा स्वराज्यातील पहिला पराभव. शहाजीराजे विजापुरात कैदेत पडलेले. कोणत्याही क्षणी बादशहा शहाजीराजांना ठार मारू शकतो अशी परिस्थिती. पूवीर् असे सगळ्याच बादशहांनी अनेक लोक मारून टाकल्याच्या आठवणी ताज्या होत्या. कोणाचाही पाठिंबा नाही.
अशा परिस्थितीत शिवाजीराजांची आणि जिजाऊसाहेबांची मन:स्थिती कशी झाली असेल ? लक्षात येते ती एकच गोष्ट की , इतक्या भयंकर आणि भीषण मृत्युचे तांडव दिसत असूनही ही मायलेकरं थोडीसुद्धा कचरली नाहीत. त्यांचा आत्मविश्वास जबर होता. राजे राजगडावर आपला डाव आखीत होते. त्यांनी
फार-फार तर हजारभर मावळी सैन्यानिशी पुरंदरचा किल्ला गाठला. तो दिवस होता ८ ऑगस्ट १६४८ . पावसाचे दिवस. नीरेला पाणी. पुरंदरपासून अवघ्या बारा कि. मी. वर इशान्येला बेलसर गावाजवळ फत्तेखानाची छावणी होती. याच पुरंदरच्या दक्षिणेला दहा कि. मी. वर सुभानमंगळ होता. हा किल्ला अगदी नुकताच , कालपरवा एवढ्यात फत्तेखानी सैन्याने जिंकून घेतला होता. त्यावर आदिलशाही निशाण
लागले होते.
शिवाजीराजांनी रात्रीच्या काळोखात बेलसरजवळच्या शाही छावणीवर अचानक छापा घालण्याचा आणि शिरवळच्या सुभानमंगळावरही हल्ला करून तो किल्ला जिंकून घेण्याचा डाव आखला. प्रथम हल्ला सुभानमंगळवर , कावजी मल्हार या सरदाराबरोबर थोडं सैन्य देऊन त्याला पुरंदारावरून थेट शिरवळवर राजांनी सोडलं. या पावसाळ्यात कावजी वाटेत आडवी येणारी नीरा नदी ओलांडून सुभानमंगळवर हल्ला चढविणार होता. नदीला पूल नव्हता. नावा नव्हत्या. पोहूनच दक्षिणतीरावर जायचे होते. गेले. सुसरीसारखे मराठे गेले . किल्ला बेसावध होता , नव्हे निर्धास्त होता. कावजीने या किल्यावर मावळ्यांनिशी हल्ला चढविला. ते तटावर चढले. घुसले. प्रतिकार होत होता , पण मराठ्यांचा जोश आणि उग्र निर्धार किल्ल्यावरच तुटून पडला होता. युद्ध पेटले. हलकल्लोळ उसळला. मराठ्यांचा मारा
भयानक होता. युद्धात शाही किल्लेदारच कावजी मल्हारने कापून काढला. आदिलशाही फौजेची अक्षरश: दाणादाण उडाली. मध्यरात्रीच्या अंधारात मराठ्यांनी प्रचंड विजय मिळविला. पुन्हा भगवा झेंडा सुभानमंगळवर फडकला. आधी झालेल्या पराभवानं खचून न जाता मावळ्यांनी शत्रूवर आग पाखडली. अचानक केलेल्या हल्ल्याचा हा परिणाम. किल्ला मिळाला.
कावजी मल्हार किल्याचा बंदोबस्त करून पुन्हा पुरंदरावर आला. सारं मराठी सैन्य या विजयानं अधिकच पेटून उठलं. शिवाजीराजांनी पुढच्याच मध्यरात्री बेलसरवर असाच थोड्याशा मावळ्यानिशी लपतछपत जाऊन एकदम हल्ला चढविला. यावेळी भगवा झेंडा एका मावळी तुकडीबरोबर होता. योजनेप्रमाणे राजांनी या मावळी तुकडीला हुकुम दिला होता की , तुम्ही ऐन लढाईत घुसू नका. आम्ही गनिमांवर हल्ला करतो. अजूनही फत्तेखानाचं सैन्य जे आहे ते आपल्यापेक्षा जास्तच आहे. जमेल तसा आम्ही त्यांचा फडशा पाडतो. पण छावणीत झोपलेले शाही हशम जर आमच्यावर मोठ्या बळांनं चालून आले तर आम्ही माघार घेऊ. तुमच्या झेंड्याच्या तुकडीच्या रोखाने येऊ. आपण सारेच पुन्हा पुरंदरवर पोहोचू.
हे छापेबाजीचं म्हणजेच गनिमी काव्याचं तंत्र कायम विजय मिळेपर्यंत चालूच राहणार होतं. राजांनी बेलसरच्या छावणीवर या योजनेप्रमाणे एकदम छापा घातला. कापाकापी एकच कार्यक्रम , अत्यंत वेगानं मावळ्यांनी सुरू केला. शाही छावणीत गोंधळ उडाला. फत्तेखान जातीनं उठून मराठ्यांवर तुटून पडला. मराठे ठरल्याप्रमाणे माघार घेऊ लागले. हा पराभव नव्हेच ही युद्धपद्धती होती. गनिमी काव्याचं युद्ध एकाच लढाईत संपत नसतं. ते विजय मिळेपर्यंत महिनोन महिने सुद्धा चालूच राहतं.मराठी फौजा माघार घेत दौडीत सुटली. काही मराठेही युद्धात पडले. मराठे परत फिरले पण दुसऱ्या बाजूनं भगव्या झेंड्याची मराठी तुकडी उत्साहाच्या भरात
शाही छावणीवर तुटून पडली. ही तुकडी नेमकी शाही सैनिकांच्या तडाख्यात सापडली.
खुद्द झेंडेवाल्यावरच घाव पडला. त्याच्या हातातील भगवा झेंडा कोसळण्याचा क्षण आला. झेंडा पडणार ? नाही , नाही! कारण तेवढ्यात याच तुकडीतल्या बाजी कान्होजी जेधे या तरुण पोरानं एकदम पुढे सरसावून तो पडत असलेला झेंडा स्वत:च पकडला. बाकीचे मावळे लढतच होते. बाजी जेध्यानं त्यांना माघार घेण्याचा इशारा देत देत लढाई चालूच ठेवली होती. या शथीर्च्या धुमाळीत काही मावळे पडले. पण झेंडा सावरीत बाजी यशस्वीपणे माघारी फिरला. अन् आपल्या साथीदारांच्यानिशी अंधारात गुडूप झाला. ही झेंड्याची तुकडी रक्ताळली होती. पण झेंडा हातचा न जाऊ देता पुरंदर किल्यावर दाखल झाली. अपेक्षेप्रमाणे हा हल्ला राजांना चांगला जमला होता. झेंडा जात होता , तोही परत आलेला पाहून राजे हर्षावले. फत्ते झाली. राजांनी बाजी जेध्याचं शाबासकी गर्जून कवतिक केले. त्यांनी तिथेच त्याचा उल्लेख ' सर्जाराव ' असा केला. हीच बाजी जेध्यांची पदवी ठरली. आता खासा फत्तेेखान तुडवून काढण्याचा राजांचा निर्धार दसपटीनं वाढला. आत्मविश्वास वाढला. पुरंदर किल्ला मराठी युद्धघोषणांनी दणाणत होता.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १६८

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १६८
बाजीरावपुत्र समशेर बहाद्दर
बाजीरावपुत्र समशेर बहाद्दर
'श्री बल्लाल चेरणी तत्पर | समशेर बहाद्दर निरंतर'
इ.स.1734 मधे बाजीराव-मस्तानी यांच्या पोटी समशेर चा जन्म झाला.जन्म झाल्याच्या काही काळानंतर बाजीरावांचा मृत्यु झाला आणि त्यामुळे मस्तानी ने आत्महत्या केली.लहान वयातच अजानतेपनी पोरकेपन आले.परंतु बाजीरावांच्या नंतर गादीवर आलेले नानासाहेब पेशवे यांनी समशेर ला संभाळले.त्याचे शिक्षण,लग्ने करुण दिले.समशेर वयात येताच एक ख़ासा सरदार आणि पेशवे घरन्याचा आप्त म्हणून ओळखला जाऊ लागला.त्याने अनेक मोहिमा मधे आपला सहभाग नोंदवलाच पण पराक्रमाची चुनुक दाखवली.मराठे आणि निजाम यांच्यात झालेल्या भालकी येथील लढाइमधे त्याने पराक्रम गाजवला.
नानासाहेब यांनी इंग्रजांशी संगनमत करुण तुळाजी आंग्रे यांच्या विरोधात मोहीम उघडली.याचे नेतृत्व खुद्द समशेर ने केले.पावसाळ्यात तब्बल 2 महीने वेढा देऊन त्याने रत्नागिरी चा किल्ला जिंकून घेतला आणि आंग्रेनचा पराभव केला.तसेच ग्वाल्हेर,कुम्भेरि या मोहिमे मधेसुद्धा त्याची उपस्थिती वर्णनीय होती.
त्याने स्वतः बुंदेलखंड येथे स्वतंत्र मोहीम काढली आणि पाउन कोटींचा मुलुख मराठा साम्राज्याला जोडला.
मारवाडचा राजा बिजेसिंग याने धोक्याने राणोजीपुत्र जयप्पा शिंदे यांचा खून केला.तेव्हा समशेर शिन्द्यांच्या मदतीला गेला.समशेर आणि शिंदे यांनी मिळून मारवाड,जयपुर चा सारा प्रदेश उध्वस्त केला आणि बिजेसिंग ला शरण आणले.
जेव्हा दिल्ली वर अहमदशाह अब्दालीचे आक्रमण झाले,तेव्हा मराठे उत्तरेत दिल्लीच्या संरक्षणासाठी गेले.परंतु,पानिपत येथे झालेल्या युद्धात अहमदशाह अब्दाली विजयी ठरला.पेशव्यांच्या हुजूरातीच्या फौजेमधे समावेश असणार्या समशेर बहाद्दर या पराभव आणि सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव यांच्या मृत्यूनंतर सूरजमल जाट कडे गेला.परंतु,आंगावर असणार्या प्रानांकित जखमांमुळे काही दिवसातच त्याचा भरतपुर येथे मृत्यु झाला.
रूपवान,पराक्रमी अशा समशेर बहाद्दर चे लग्न मेहराम बाई सोबत झाले होते.आणि बांदा चे ' पाहिले नवाब' होण्याचाही मान मिळवला होता..आपल्या पराक्रमाने....
अशा 'समशेर बहाद्दर' योद्धयाविषयी आपल्याला विसर पडने,ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १६७

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १६७
अनूबाई घोरपडे-
भाग
स्व भा व व र्ण न :- पतीच्या निधनानंतर ३८ वर्षेसंस्थानचा सर्व कारभार अनूबाई ही स्वत:च पहात होती. नानासाहेब पेशव्यांच्याअखेरीपर्यंत बहुतेक स्वाऱ्यांत ती हजर असे. तिचा मुलगा किंवा त्याच्यामृत्यूनंतर तिचा नातू व व त्यांचे कारभारी माहिमींवर जात इतकेंच, परंतुत्यांच्या फौजेची तयारी करणें व त्यांस पैशाचा पुरवठा करणें ही जबाबदारीअनूबाईच सांभाळीत होती. दरबारचीं कामेंहि सर्व तीच करून घेत असे. तिचीहिंमत, धोरण व महत्त्वाकांक्षा जबरदस्त होतीं. तिचे भाचे नानासाहेब वभाऊसाहेब व दादासाहेब यांवर तिची चांगली छाप होती. त्यांच्या लष्करांतप्रत्येक स्वारींत हजर राहून अनूबाईनें आपले बेत सिद्धीस नेण्याची संधिकधीं गमावली नाहीं व त्या कामीं कधीं आळस केला नाहीं ! तिचा पुत्रनारायणराव यास तिनें कधीं स्वतंत्रपणें वागूं दिलें नाहीं. ' हें लहान पोरयाला काय समजतें ' अशाच भावनेनें तिनें त्यास जन्मभर म्ह. ४६ वर्षाच्यावयापर्यंत वागविलें ! नारायणरावाच्या मागून संस्थानचा अधिकार तिच्या नातवासमिळाला तें तर तिच्या दृष्टीनें अगदीं नेणतें बाळच, तेव्हां त्याच तीस्वतंत्रपणें कशी वागूं देणार ? मोठमोठ्या सर्व मसलती तिनेंच अंगावर घेऊनपार पाडल्या पुत्र व नातू हे नांवाला मात्र धनी होते. तिचा व्याप मोठा होतात्यामुळें तीस कर्जहि झालें होतें. एके काळीं तर त्या कर्जाचा अजमास १२लक्ष रुपये होता. बाईस कर्ज होतें त्याप्रमाणें तिनें संस्थानची जमाबंदीहिवाढविली होती. तिची वागणूक नेमस्तपणाची असे व खर्चाच्या बारीक सारीकबाबींवर सुद्धा तिचें लक्ष असे.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १६६


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १६६
अनूबाई घोरपडे-
भाग
तो त या चें रा ज का र ण :- आपल्या आयुष्याच्या अखेरीअखेरीस अनूबाईनें एक अविचाराचें राजकारण करून आपला फार दुर्लौकिक व नुकसानकरून घेतलें. १७६६ सालीं पेशव्यांनीं भाऊसाहेबाच्या तोतयाची चौकशी कलीतेव्हां अनूबाई पुण्यास होती. तो तोतया नसून खरोखर भाऊसाहेबच आहे असेंअनूबाईचें मत होतें. तिची भ्रांति दूर करण्याकरितां पेशव्यांनी त्या तोतयासकांहीं दिवस अनूबाईच्या वाडयांत
ठेविलें होतें तरी तिचें तें मत तसेंचकायम राहिलें. यामुळें १७७६सालीं रत्नागिरीच्या मामलेदारानें तोतयासकैदेंतून सोडून त्याचें खूळ माजविलें तेव्हां अनूबाईनें तोतयाच्या मदतीसव्यंकटरावाची रवानगी केली. यामुळें पुणें दरबाराकडून तोतयाचें पुढेंपारिपत्य झालें तेव्हां इचलकरंजीकरांची देशमुखी, सरदेशमुखी, तैनाती गांव वइनामगांव या सर्वांवर जप्ती आली. पण पटवर्धनांनीं रदबदली केल्यामुळेंनाना-फडनवीस व सखाराम बापू यांनीं अनूबाईच्या वृद्धापकाळाकडे लक्ष देऊनइचलकरंजीकरांकडून सवा लक्ष रुपये गुन्हेगारी घेऊन ती जप्ती उठविली.
रा ज का र ण सं न्या स व मृ त्यु :- तोतयाच्यामसलतीचा असा परिणाम झाल्यावर अनूबाईनें संस्थानच्या कारभारांतून आपले अंगकाढून घेतलें. ती काशयात्रेस गेली होती इतकी माहिती मिळते पण कधीं गेलींतें साल कळत नाहीं. तिला इ. स. १७८३ सालीं तुळापूर येथें देवाज्ञा झाली

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १६५


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १६५
अनूबाई घोरपडे-
भाग
आ ण खी आ प त्ति :- इ. स. १७७३ सालीं त्रिंबकरावमामा पंढरपुराजवळ राघोबा दादाच्या पक्षाशीं झालेल्या लढाईत मारले जाऊनअनूबाईच्या मुलीवर वैधव्याचा दुर्धर प्रसंग ओढवला. तेव्हां अनूबाई आपल्यानातवासह मुलीच्या सांत्वनार्थ पुण्यास गेली. तो राज्यक्रान्तीचा काळअसल्यानें अनूबाईनें दूरदर्शीपणा करून आपल्या जवळचा जामदारखाना व जडजवाहीरआपल्याबरोबर पुण्यास घेऊन जाऊन पुरंदरास पेशव्यांच्या जामदारखान्यांत नेऊनठेवलें. इ. स. १७७४ च्या अखेरीस करवीरकरांनीं रघुनाथराव दादाच्याचिथावणीवरून
पेशव्याच्या मुलुखास उपद्रव देण्याचा उपक्रम करून त्यांनींइचलकरंजीवर स्वार्यां करण्यास सुरुवात केली. अनूबाईनें त्यांशीं सलोखाकरावा म्हणून पुष्कळ प्रयत्न केला पण उपयोग झाला नाहीं. तेव्हां अनूबाईनें नडगमगतां कोल्हापूरकरांच्या दोन स्वार्या् परतवून लावल्या; परंतु असेंनेहमी होऊं लागल्यास निभाग लागणार नाहीं हें जाणून पुन्हा या स्वार्याय नव्हाव्या म्हणून अनूबाईनें पुण्याच्या दरबारीं खटपट केली.
पण पुणें दरबार हैदर व इंग्रज यांशीं लढण्यांस गुंतले असल्यामुळें तिकडून अनूबाईस फारशी मदत होऊं शकली नाही.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १६४



हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १६४
अनूबाई घोरपडे-
भाग
पु त्रा चा अ व्य व स्थि त प णा व मृ त्यू :- १७६१च्या पावसाळयांत अनूबाई आपल्या मामलतीच्या ठिकाणीं धारवाडास होती. १७६२च्या सुमारास अनूबाईचें आपल्या मुलाशीं पुन्हां बिनसलें. नारायणराव आतांव्यसनाधीन होऊन कारभारांत व खासगी वागणुकींत अव्यवस्थितपणा करूं लागला.त्यास व त्याच्या स्त्रियेस यापुढें अनूबाईनें नजरकैदेंत ठेवल्या प्रमाणेंस्थिति होती. १७६४ सालीं अनूबाईच्या शरीरीं समाधान नसल्यामुळें तीमाधवरावाबरोबर हैदरावरील स्वारीस येऊं शकली नाहीं. पानिपतच्या युध्दानंतरहैदरानें तुंगभद्रेच्या उत्तरेस स्वाऱ्या करून धारवाड काबीज केलें होतेंतें या स्वारींत पेशव्यांनी काबीज करून धारवाडचा सुभा मोकळा केला. व त्याचीमामलत पुन्हां इचलकरंजीकरांना सांगितली. अनूबाई इचलकरंजीस दुखणेकरी पडूनहोती, ही संधि साधून नारायणरावानें दंगा आरंभला. पण अनूबाई लवकरच बरीझाल्यानें नारायणरावाचे बेत विरघळून जाऊन त्यास पुन्हां प्रतिबंधांत रहावेंलागलें. नारायणरावाचें आतां सरकारी कामगिरीकडे लक्ष राहिलें नसल्यामुळेंपेशव्याच्या मनांत त्याचें पथक मोडावें व सरदारी काढून घ्यावी असें आलेंहोतें; पण १७६६ च्या जूनमध्यें अनूबाईनें पुण्यास जाऊन व आपली भीड खर्चकरून व्यंकटरावाच्या नांवें सरदारी करून घेतली. इ. स. १७६९ त मामलतीसंबंधींबरीच बाकी तुंबल्यामुळें पेशव्यांनी धारवाडचा सुभा इचलकरंजीकरांकडून काढूनघऊन बाकी वसूल करण्याकरितां कारकून व ढालाईत इचलकरंजीस पाठविले.
हा तगादाउठविण्याकरितां मुलगा आजारी होता तरी त्यास तसाच टाकून अनूबाई पुण्यासगेली व रदबदली करून पेशव्यांकडून बरीच सूट मिळवून राहिलेली बाकी चारमहिन्यांत फेडण्याचा तिनें करार केला. या सुटीसंबंधीं कित्येक रकमांवरपेशव्यांचा ' वडील मनुष्य सबब रयात ' असा शेरा होता. इ. स. १७७० मध्येंपेशव्यांची स्वारी कर्नाटकच्या मोहिमीस निघाली तेव्हां अनूबाई आपल्यानातवासह जेऊर मुक्कामीं त्यांच्या लष्करांत जाऊन पोहोंचली. पण इतक्यांतमुलगा वारल्याची बातमी आल्यामुळें ती पुन्हां इचलकरंजीस आली. अनूबाईचा आतांवृद्धापकाळ झाला असल्यामुळें तिच्यानें राज्यकारभाराची दगदग उरकेनाशी झालीहोती. त्यांतच पुन्हां हा पुत्रशोक प्राप्त झाला ! तथापि धैर्य धरून आपलानातू व्यंकटराव याच्या कल्याणकरितां तिनें पूर्वीप्रमाणे कारभार पुढेंचालविला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १६३

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १६३
अनूबाई घोरपडे-
भाग
मा ता पु त्रां ती ल क ल हा स आ रं भ :- अनूबाईचामुलगा नारायणराव हा आतां वयांत आला असल्यामुळें त्याला आपल्या आईच्याओंजळीनें पाणी पिण्याचा कंटाळा येऊन मातापुत्रांत वितुष्ट आलें. हावितुष्टाचा प्रकार नारायणराव आपल्या आईच्या सांगण्याप्रमाणें १७५७ मध्येंपेशव्यांबरोबर श्रीरंग पट्टणाच्या स्वारीस न जातां दुसरीकडे गेला तेव्हांउघडकीस आला. तेव्हां अनूबाईनें आपल्या मुलाची कशीबशी समजूत काढून त्यास१७५९ सालीं इचलकरंजीस परत आणलें.
अ नू बा ई व जि जा बा ई यां चा सं बं ध :- १७५९ च्याअखेरीस मराठयांची व मोंगलाची लढाई सुरू झाली तेव्हां अनूबाई नगरास येऊनपेशव्यांजवळ राहिली. १७६१ सालीं मात्र अनूबाई पेशव्यांच्या स्वारीबरोबर नजातां इचलकरंजी सच राहिली. यांचे कारण शेजारीं करवीरच्या राज्यांत राज्यक्रांतीचा समय जवळ येऊन ठेपला होता हें होय. त्या सालच्या जानेवारींतसंभाजी महाराजांचें देहावसान झालें तेव्हां अनबाईनें तें वर्तमान टाकोटाकपेशव्यांस लिहून कळविलें. अशा रीतीनें संभाजीच्या मरणानंतर करवीर संस्थानखालसा करण्याची मसलत पेशव्यांनीं योजिली तींत अनूबाईचें प्रथम पासूनच अंगदिसून येतें. पेशव्यांनी करवीरच्या राज्याची जप्ती करण्याकरितांइचलकरंजीकरांकडील माणसें पाठविल्यामुळें जिजाबाईचा तर असा पक्का ग्रह झालाहोता कीं सर्व कारस्थानाच्या मुळाशीं अनूबाईच आहे. पुढें जिजाबाईनें आपलीसवत गरोदर असल्याची हूल उठविली तेव्हां त्या गोष्टीची परीक्षा करूनबाळंतपणाच्या वेळीं प्रत्यक्ष हजर राहण्याकरितां पेशव्यांच्या सांगण्यावरूनअनूबाई करवीरास जाणार होती. पण पानिपताचा पराभव व नानासाहेबाचा मृत्युयांमुळें तो बेत रहित झाला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १६२

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १६२
अनूबाई घोरपडे-
भाग
ज हा गि रीं ची व मा म ल तीं ची प्रा प्ति :
- अनूबाईही बाळाजी विश्वनाथाची कन्या असल्यामुळें शाहू महाराजहि स्वत: तीस बरेंचमानीत होते. व्यंकटराव वारल्यावर शाहूनें अनूबाईचा हा संबंध लक्षांत आणूनसबंध आजरें महाल तीस इनाम करून दिला. पुढें १७५३ सालीं पेशवे करवीरकर संभाजीची मर्जी सुप्रसन्न करून घेण्याकरितां कर्नाटकच्या मोहिमींतून करवीरास गेले तेव्हां अनूबाईनें ती संधि साधून त्यांच्याबरोबर राहून, आजरेंमहालापैकीं एक तर्फी ३१ खेडीं कापशीकरांस संभाजी महाराजांकडून मोकासा चालतआलीं असल्यामुळें त्यांची रीतसर नवी सनद तिनें शंभु छत्रपतीकडून करूनघेतली. या प्रसंगीं पेशव्यांस भीमगड, पारगड व वल्लभगड हे तीन किल्लेकरवीरकरांकडून जहागीर मिळाले. त्यांची मामलत पेशव्यांनीं अनूबाईसचसांगितली. याच वर्षी राणोजी घोरपडे यानें करवीर दरबाराशीं चाललेल्या कलहांतआपणांस अनूबाईकडून द्रव्याची व फौजेची कुमक होते हें लक्षात आणूननारायणरावास गवसें गांव इनाम दिला. १७५६ सालीं पेशव्यांची सावनुरावर मोहीमझाली तींत अनूबाई हजर होती. या मोहिमींत पेशव्यास सोंधें संस्थानिकाकडून पूर्वी इचलकरंजीकरांकडे असलेला मर्दनगडचा किल्ला मिळाला व तो त्यांनीं इचलकरंजीकरांच्या स्वाधीन करून त्यांत त्यांचे लोक ठेवले. याप्रसंगी, नवीनमिळालेला मुलुख व पूर्वीचा मुलूख मिळून धारवडच्या विस्तृत सुभ्यांची मामलतधारवाच्या किल्ल्यासुद्धा अनूबाईस पेशव्यांकडून मिळाली.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १६१

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १६१
अनूबाई घोरपडे-
भाग
रा ज का र णां त प्र वे श :- इ. स. १७४५ मध्येंअनूबाईच्या पतीस क्षयरोगानें मृत्यु येऊन तिला वैधव्यदशा प्राप्त झाली.तथापि अनूबाईची राजकारणांतील महत्त्वाची कामगिरी यानंतरच्या काळांतीलच आहे.नारायणराव व्यंकटेश याच्या कारकीर्दीत इचलकरंजी संस्थान वैभवाच्या शिखरासजाऊन पोंचलें तें अनूबाईच्या कर्तृत्वामुळेंच होय. नानासाहेब पेशवे वत्यांचे बंधू हे अनूबाईचे भाचे असल्यानें त्यांजपाशीं असलेल्या तिच्यावजनामुळें संस्थानचें बरेंच हित झालें. पेशव्यांनीं नारायणरावांकडे व्यंकटरावाची सरदारी पूर्ववत् चालू ठेवून प्रत्येक स्वारींत त्याजकडेकांहींना कांहीं तरी कामगिरी सोंपविली एवढेंच नव्हे तर इनामें, तैनातादेऊन, मोठमोठया मामलती सांगून व मुलूखगिरींत संस्थानिकांकडे खंडणी करारकरण्याच्या बाबींतील बोलाचाली त्याजवरच सोंपवून लाखो रुपये त्यास मिळवूनदिले.