हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १६७
अनूबाई घोरपडे-
भाग ८
भाग १६७
अनूबाई घोरपडे-
भाग ८
स्व भा व व र्ण न :- पतीच्या निधनानंतर ३८ वर्षेसंस्थानचा सर्व कारभार
अनूबाई ही स्वत:च पहात होती. नानासाहेब पेशव्यांच्याअखेरीपर्यंत बहुतेक
स्वाऱ्यांत ती हजर असे. तिचा मुलगा किंवा त्याच्यामृत्यूनंतर तिचा नातू व व
त्यांचे कारभारी माहिमींवर जात इतकेंच, परंतुत्यांच्या फौजेची तयारी करणें
व त्यांस पैशाचा पुरवठा करणें ही जबाबदारीअनूबाईच सांभाळीत होती. दरबारचीं
कामेंहि सर्व तीच करून घेत असे. तिचीहिंमत, धोरण व महत्त्वाकांक्षा
जबरदस्त होतीं. तिचे भाचे नानासाहेब वभाऊसाहेब व दादासाहेब यांवर तिची
चांगली छाप होती. त्यांच्या लष्करांतप्रत्येक स्वारींत हजर राहून अनूबाईनें
आपले बेत सिद्धीस नेण्याची संधिकधीं गमावली नाहीं व त्या कामीं कधीं आळस
केला नाहीं ! तिचा पुत्रनारायणराव यास तिनें कधीं स्वतंत्रपणें वागूं दिलें
नाहीं. ' हें लहान पोरयाला काय समजतें ' अशाच भावनेनें तिनें त्यास जन्मभर
म्ह. ४६ वर्षाच्यावयापर्यंत वागविलें ! नारायणरावाच्या मागून संस्थानचा
अधिकार तिच्या नातवासमिळाला तें तर तिच्या दृष्टीनें अगदीं नेणतें बाळच,
तेव्हां त्याच तीस्वतंत्रपणें कशी वागूं देणार ? मोठमोठ्या सर्व मसलती
तिनेंच अंगावर घेऊनपार पाडल्या पुत्र व नातू हे नांवाला मात्र धनी होते.
तिचा व्याप मोठा होतात्यामुळें तीस कर्जहि झालें होतें. एके काळीं तर त्या
कर्जाचा अजमास १२लक्ष रुपये होता. बाईस कर्ज होतें त्याप्रमाणें तिनें
संस्थानची जमाबंदीहिवाढविली होती. तिची वागणूक नेमस्तपणाची असे व खर्चाच्या
बारीक सारीकबाबींवर सुद्धा तिचें लक्ष असे.
No comments:
Post a Comment