हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १६१
अनूबाई घोरपडे-
भाग २
भाग १६१
अनूबाई घोरपडे-
भाग २
रा ज का र णां त प्र वे श :- इ. स. १७४५ मध्येंअनूबाईच्या पतीस
क्षयरोगानें मृत्यु येऊन तिला वैधव्यदशा प्राप्त झाली.तथापि अनूबाईची
राजकारणांतील महत्त्वाची कामगिरी यानंतरच्या काळांतीलच आहे.नारायणराव
व्यंकटेश याच्या कारकीर्दीत इचलकरंजी संस्थान वैभवाच्या शिखरासजाऊन पोंचलें
तें अनूबाईच्या कर्तृत्वामुळेंच होय. नानासाहेब पेशवे वत्यांचे बंधू हे
अनूबाईचे भाचे असल्यानें त्यांजपाशीं असलेल्या तिच्यावजनामुळें संस्थानचें
बरेंच हित झालें. पेशव्यांनीं नारायणरावांकडे व्यंकटरावाची सरदारी पूर्ववत्
चालू ठेवून प्रत्येक स्वारींत त्याजकडेकांहींना कांहीं तरी कामगिरी
सोंपविली एवढेंच नव्हे तर इनामें, तैनातादेऊन, मोठमोठया मामलती सांगून व
मुलूखगिरींत संस्थानिकांकडे खंडणी करारकरण्याच्या बाबींतील बोलाचाली
त्याजवरच सोंपवून लाखो रुपये त्यास मिळवूनदिले.
No comments:
Post a Comment