हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १६०
अनूबाई घोरपडे-
बा ल प ण व सं सा र -
भाग १६०
अनूबाई घोरपडे-
बा ल प ण व सं सा र -
बाळाजी विश्वनाथ पेशव्याची सर्वांत धाकटी कन्या. हिचा इ. स. १७१३ सालीं
इचलकरंजी घराण्यांतील व्यंकटराव नारायण घोरपडे याशीं वयाच्या सहाव्या
सातव्या वर्षी सातारा मुक्कामीं विवाह झाला. व्यंकटराव व अनूबाईयांच्या
विवाहसंबंधानें अशी एक गंमतीची आख्यायिका प्रसिद्ध आहे कीं, यालग्नांत
वरपक्षाकडील सेनापतीच्या घरच्या बायकांनीं ' वधूपक्षा कडच्याबायकांनी बुरखा
घेतल्याशिवाय आमच्या मांडवांत पाऊलसुद्धा टाकूं नये ' असाहट्ट धरून तो
वधूपक्षाकडील बायकांच्या इच्छेविरुद्ध शेवटास नेला होता.अनूबाई व व्यंकटराव
या उभयतांना वर्षातून बरेच दिवस पुण्यांत आपल्याजवळ राहतां यावें म्हणून
पेशव्यांनीं इ. स. १७२२ सालीं व्यंकटरावास राहण्याकरितां पुण्यास वाडा
बांधून दिला व तेथील संसाराच्या सोईकरितां मौजेवडगांव तर्फ चाकण हा सबंध
गांव, पर्वतानजीकचा बाग व हडपसर येथील बाग त्यासइनाम करून दिला. अनूबाईस
तिचीं वेणूताई व नारायणराव (जन्म इ. स. १७२३-२४)हीं दोनहि अपत्यें पूर्व
वयांतच झालीं. ही वेणूताईच पुढें पेशवाईंतलेप्रसिद्ध सरदार त्रिंबकराव मामा
पेठे यास दिली.
No comments:
Post a Comment