हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १३२
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - ५
संजय सोनावणे

पानिपतच्या युद्धाला आरंभ प्रथम कधी झाला असावा ? :- भाऊची कैफियत,
भाऊची बखर, काशिराजची बखर, नुरुद्दीनकृत नजीब चरित्र, महंमद जाफर शाम्लू, शिवप्रसादची बखर, अब्दालीचा पानिपत विजयाचा जाहीरनामा, पानिपतच्या युद्धानंतर अब्दालीने जयपूरच्या सवाई माधवसिंगास लिहिलेलं पत्र, नाना फडणीसचे आत्मवृत्त इ. मधील पानिपतच्या लढाईचा आलेला वृत्तांत पाहिला असता असे दिसून येते कि, पानिपतच्या युद्धाला नेमकी कोणत्या पक्षाकडून सुरवात झाली असावी याविषयी माहिती वरीलपैकी एकाही संदर्भ साधनांत आलेली नाही. त्यामुळे युद्धाला आरंभ नेमका गारदी - रोहिला या मोर्च्यावर झाला कि भाऊ - शहावली यांच्या मोर्च्यावर झाला हे निश्चित करणे अवघड होऊन बसले आहे. रोहिला सैन्य वेगाने पुढे सरकून गेल्यामुळे त्यांची व गारद्यांची लढाई जुंपली असे म्हणावे तर मग शहावलीखान जेव्हा हुजुरातीच्या दिशेने चालून आला त्यावेळी, तोफांची लढाई सुरु असताना हुजुरातीने गोलातून बाहेर पडून त्याच्यावर स्वारी का केली असावी ? गारदी - रोहिले यांच्यात संघर्ष सुरु झाल्यावर विंचूरकर, गायकवाड हे सरदार गोलातून बाहेर पडले कि तत्पूर्वीच त्यांनी रोहिल्यांवर चाल केली होती ? सारांश, पानिपतच्या लढाईचे शक्य तितके बिनचूक वर्णन करण्यासाठी या व अशा इतर अनेक प्रश्नंची उत्तरे मिळणे अत्यावश्यक आहे. अर्थात, या प्रकरणाविषयी मला जितकी संदर्भ साधने उपलब्ध झाली त्यांच्या आधारे आणि तर्काच्या आधारे या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यानुसार पानिपतच्या लढाईचे वर्णन खाली देत आहे.
युद्धाला प्रथम आरंभ गारदी - रोहिला यांच्या बाजूला झाला असावा असे भाऊची कैफियत, काशीराजची बखर व नुरुद्दीनकृत नजीब चरित्र यांवरून दिसून येते. अर्थात, या ठिकाणी हे लक्षात घेणे गरजेचे आहे कि, गारदी - रोहिला मोर्चा ज्या ठिकाणी होता, त्या ठिकाणी वरील तिन्ही ग्रंथांचे लेखक हजर नव्हते. कैफियतकार यावेळी हुजुरातीच्या आसपास, म्हणजे मुख्य सैन्याच्या मागे गोलाच्या आत असावा. याचा अर्थ असा होतो कि, युद्धाला आरंभ नेमका कुठे झाला याविषयी त्याच्याकडे नेमकी माहिती असण्याची शक्यता फार कमी आहे. पण, कैफियत नाना पुरंदरे याने लिहिलेली आहे असे जर धरून चालले तर प्रथम हे बघावे लागेल कि, गोलाच्या रचनेत तो नेमका कुठे होता ? माझ्या मते, तो हुजुरातीच्या उजव्या बाजूला असावा. कारण, नाना पुरंदरेच्या पत्रात, तो व होळकर एकाच सुमारास व बहुतेक सोबतीनेचं पानिपतहून निघाल्याचा उल्लेख आहे. हे लक्षात घेतले असता, युद्धाला प्रथम आरंभ गारद्यांच्या बाजूला झाला असल्यास त्याची बातमी नाना पुरंदरेला माहिती असणे शक्य आहे. परंतु, नाना पुरंदरे हाच भाऊच्या कैफियतीचा लेखक आहे, हे अजूनही निश्चित न झाल्याने कैफियतीवर पूर्णतः भरवसा ठेवता येत नाही !

No comments:
Post a Comment