हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १३९.३
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १५
संजय सोनावणे

शत्रू सैन्याचा एक विभाग, मुख्य फळी पासून अलग होऊन पुढे सरकत असल्याचे
गारद्यांच्या लक्षात आले. शत्रूचा बेत आपल्या डाव्या बगलेवर चालून यायचा
असल्याचे गारदी अंमलदारांनी हेरून, डाव्या बाजूने चालून येणाऱ्या शत्रू
सैन्याला रोखण्यासाठी त्यांनी, त्या बाजूला दोन पलटणी तैनात केल्या.
रोहिला फौज आक्रमणासाठी सिद्ध होताच सरदारांच्या आज्ञेने इशारतीची निशाणे फडकली, वाद्ये वाजू लागली व पाठोपाठ रोहिल्यांची फौज गारद्यांच्या दिशेने पुढे सरकू लागली. गारदी पलटणींवर प्रथम रोहिल्यांच्या घोडेस्वारांनी हल्ला केला असावा कि पायदळाने ? पानिपत लढाईची उपलब्ध वर्णने पाहता, आरंभी रोहिल्यांचे घोडदळ, गारदी पलटणींवर चालून गेले. याचा परिणाम म्हणजे, शेकडो स्वार जखमी मरण पावले तर कित्येक जखमी झाले.
शत्रूसैन्य एका विशिष्ट अंतरावर येताच गारद्यांनी गोळीबारास आरंभ केला. तत्कालीन बंदुकांची रेंज काय असावी ? माझ्या मते ती काही मीटर्स पर्यंत मर्यादित असावी, पण नेमकी किती हा प्रश्न शिल्लक राहतोच ! अमेरिकेच्या यादवी युद्धांत ज्या बंदुका वापरण्यात आल्या, त्यांची रेंज ३०० यार्ड, अर्थात सुमारे पावणे तीनशे मीटर्स इतकी असल्याचा उल्लेख इंटरनेटवर मिळतो. जर हि रेंज गृहीत धरली तर, स. १७५- ६० च्या काळातील बंदुकांची रेंज १०० - १५० मीटर्स इतकी तरी असावी असा अंदाज बांधता येतो. या ठिकाणी हे मान्य करतो कि, या आकडेवारीस याहून अधिक सबळ पुरावा, निदान या क्षणी माझ्याकडे नाही. तसेच याशिवाय इतरत्र कोठून माहिती मिळत नसल्याने, मला हीच आकडेवारी गृहीत धरून चालणे भाग आहे.
गारद्यांच्या गोळीबारामुळे रोहिला घोडेस्वार हतबल झाले. रोहिल्यांकडे किती प्रमाणात पायदळ होते याची निश्चित माहिती मिळत नाही. परंतु, घोडदळाच्या मानाने ते फारचं कमी असावे हे निश्चित ! या रोहिला सैनिकांची शस्त्रे सामान्यतः तलवार, भाले, जंबिये, कट्यारी, सुरे इ. होती. त्याशिवाय काही जणांकडे बंदुका देखील होत्या. परंतु, नजीब वगळता इतर कोणत्याही रोहिला सरदाराकडे बंदुकधारी पायदळ असल्याचा उल्लेख आढळत नाही ! रोहिला घोडेस्वार, गारद्यांची फळी फोडण्यास अपयशी ठरत आहेत हे पाहून बहुतेक, रोहिला सरदारांनी आपल्या घोडदळास मागे बोलावले असावे व पायदळ विभागाला गारद्यांवर चालून जाण्याचा आदेश दिला असावा. किंवा असेही असू शकते कि, रोहिल्यांचे घोडदळ जेव्हा गारद्यांवर चालून गेले, त्याचवेळी त्यांचे पायदळ देखील पाठोपाठ पुढे सरकले असावे. रोहिला स्वार, गारद्यांच्या गोळीबारामुळे अथवा सरदारांच्या आदेशाने बाजूला सटकले असावे किंवा मागे निघून गेले असावेत. घोडदळ बाजूला सरकताच / मागे हटताच रोहिला पायदळ गारदी पलटणींवर तुटून पडले असावे. गारदी सैन्यावर, रोहिल्यांनी कशा प्रकारे हल्ले केले असावेत याविषयी कसलाच अंदाज किंवा तर्क करता येत नाही अथवा केल्यास, अमुक एक प्रकारे हल्ला झाला असावा असेही ठासून सांगता येत नाही. पण एक गोष्ट मात्र खरी आहे व ती म्हणजे, गारद्यांची फळी फोडण्याचे कार्य रोहिला पायदळाने केले ! रोहिल्यांच्या पायदळाने, गारद्यांची फळी फोडून हातघाईची लढाई आरंभली. गारद्यांनी देखील शक्य तितक्या ताकदीने शत्रूचा मुकाबला करण्याचा प्रयत्न केला. अखेर, दुपारी एकच्या आसपास गारदी - रोहिला सैन्याची हि भयंकर झुंज संपुष्टात आली. प्रचंड प्रमाणात नुकसान सोसून रोहिले मागे हटले.

No comments:
Post a Comment