हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १४२
सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )
भाग २
कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी एका संकपाळ कुटुंबात (सध्याचे भिलारे) झाला. त्यांचे मूळ आडनाव कडू होते. संकपाळ हे “वीर राणा संक” या संप्रदायाचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी आणि आईचे अंबाबाई होते. असे म्हणतात की, बराच काळ मूलबाळ न झाल्याने ’तुझ्या अंगार्याच्या आशीर्वादाने जर आम्हाला मूल झाले तर आम्ही त्याला तुझे नाव देऊ आणि आमचे आडनाव अंगारे (जे पुढे आंग्रे झाले) असे ठेऊ त्याप्रमाणे झाल्यामुळे ते कान्होजी आंग्रे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे बरेच बालपण सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेले. हा किल्लाच पुढे त्यांनी काबीज केला. त्यांचे वडीलही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार होते. कान्होजींना लहानपणापासूनच समु सफरींची आणि साहसी मोहिमांची आवड होती.

१६९८ मध्ये साताराच्या भोसल्यांनी त्यांना दर्यासारंग अशी पदवी देऊन,मुंबई
पासून विंगोरिया (आताचे वेंगुर्ला) पर्यंतच्या किनारपट्टीची जबाबदारी
सोपवली. सिद्दी जोहर च्या ताब्यातले जंजिरा मात्र मुघलांच्या अधिपत्याखाली
राहिले. कान्होजींनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया
कंपनींच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केली. अनेक प्रयत्नांनंतरही
कान्होजींच्या आरमाराचा पराभव करण्यात अपयश आल्याने ब्रिटिशांनी कोकण
किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व मान्य करत शांततेचा तह केला.
१७०७ मध्ये कोल्हापूरचे छत्रपती शाहू गादीवर येताच, त्याच्या आदेशान्वये त्यांचे सेनापती पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी कान्होजींबरोबर करार केला. या करारान्वये त्यांची मराठा आरमार प्रमुख म्हणून नेमणूक झाली. मराठेशाहीच्या गादीवर दावा करणार्या ताराबाईंशी कान्होजीचे सख्य होते. ते मोडून त्यांना आपल्याबाजूला खेचण्यासाठी शाहू महाराजांनी ही राजकीय खेळी केली होती असे म्हटले जाते.
कान्होजींनी औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेविरुद्ध लढण्यासाठी मराठ्यांना मोलाची मदत केली.

No comments:
Post a Comment