Total Pageviews

Wednesday, 31 October 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १५०

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १५०
कराडचे सरदार डुबल घराणे भाग
कराड पेठेचे महाजनपद आणि देशचौगुले वतनकराड हे प्राचीन काळापासून व्यापारासाठी प्रसिध्द होते. सातवाहनकालापासून येथे मोठा व्यापार होता. त्यामुळे कराडची पेठ त्याकाळात संपूर्ण देशभरात प्रसिध्द होती. या प्रसिध्द पेठेचे महाजनपद डुबल घराण्याकडे होते. सन 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीतझालेल्या पालीच्या महजर (निवाडा) मध्ये साक्षीदारांच्या यादीत शिवाजी बिन बाळोजी डुबल यांचे नाव आढळते. त्यामुळे शिवपूर्वकालापासून कराडचे महाजनपद या घराण्याकडे होते, असे अनुमान बांधता येते. बाळोजी साळोखे हे या घराण्याचे मुळपुरूष होत. महाजनपदाबरोबरच कराड प्रांतातील देशचौगुलेपणाचे वतनही या घराण्याकडे होते. सध्याच्या कराड, पाटण आणि सांगली जिल्हय़ातील काही गावे या देशचौगुले वतनासाठी डुबल घराण्याकडे असल्याचे आढळते.छत्रपती शाहूंचे आप्तबाळोजी डुबल (दुसरे) यांच्या पत्नी राणूबाई आणि साताराचे छ. शाहूंच्या पत्नी सकवारबाई या बहिणी होत. या आप्तसंबंधामुळे बाळोजींचा सातारच्या दरबारात प्रवेश झाला. तेथे त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि कामाने छ. शाहूंचा विश्वास संपादन केला. सेना पंचसहस्त्री हा किताब मिळवला. तत्कालीन अनेक लढय़ात बाळोजींनी सहभाग घेतला.मिरजेचे किल्लेदारपदछ. शाहूंनी 1739 साली मिरजेच्या किल्ल्यावर स्वारी करून हा किल्ला मोगलांच्या ताब्यातून जिंकून घेतला. यानंतर त्यांनी हा किल्ला आणि मिरज प्रांताचा कारभार बाळोजींकडे सोपवला. सन 1745 पर्यंत बाळोजींनी मिरज प्रांतांचा कारभार नेटाने केला. बंडखोर सरदार उदाजी चव्हाण याच्या स्वाऱया परतवून लावल्या. मिरज प्रांताची घडी नीटबसवली. मिरज किल्ला ताब्यात घेण्यापूर्वी बाळोजींना छ. शाहूंकडून तासगांव गाव मोकासा इनाममिळाले होते. तर, मिरज तालुक्यातील गुंडेवाडी हे गावही पूर्ण इनाम मिळाले. बाळोजींनी आपले कुलदैवत असणाऱया म्हसवड येथील सिध्दनाथ मंदिराचा जीर्णोध्दार केला. बाळोजींचे बंधू शिदोजी हे उंबरच्या स्वारीत धारातीर्थी पडले. त्यांच्या या कामगिरीचे स्मरण म्हणून छ. शाहूंनीबाळोजींना चरेगाव इनाम दिले.सरदार शिवाजी साळोखेबाळोजींचा मृत्यू 1745-46 च्या सुमारास झाला. त्यानंतर त्यांचे सुपूत्र शिवाजी साळोखे (दुसरे) हे काम पाहू लागले

No comments:

Post a Comment