Total Pageviews

60,693

Wednesday, 31 October 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १५१

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १५१
कराडचे सरदार डुबल घराणे भाग
शिवाजी साळोखेही आपल्या पित्याप्रमाणे पराक्रमी होते. त्यांनी उदाजी चव्हाणासह, अन्य सरदारांचे हल्ले परतवून लावले. मिरज प्रांत आणि किल्ल्याचे संरक्षण केले. 1755 पर्यंत मिरजेचा किल्ला आणि प्रांत शिवाजी साळोखेंच्या ताब्यात होता. त्यानंतर पेशव्यांनी मिरज किल्ला माधवराव पेशव्यांचे सासरे शिवाजी बल्लाळ जोशी यांच्या ताब्यात दिला.शिवाजी साळोखे-डुबल यांनी त्यानंतर कर्नाटक प्रांतातील हैदरवरील स्वाऱयांत सहभाग घेतला. या स्वारीत असतानाच तुंगभद्रेनजीक त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे सुपूत्र नाथाजीराव हेही पराक्रमी होते. त्यांनी कर्नाटकातील मोहिमांमध्ये सहभाग घेतला.सरदार अग्नोजी साळोखेशिवाजी साळोखेंचे धाकटे बंधू अग्नोजी साळोखे हेही पित्याप्रमाणे शूर होते. त्यांना धुळगाव येथे सरंजाम नेमून देण्यात आला होता. अग्नोजी साळोखेंना धुळगांवजवळील काही गावे मोकासा दिली होती. सोनीचे ठाणे काही काळ अग्नोजींकडे होते. उदाजी चव्हाणावरील लढायात अग्नोजी अग्रभागी होते.

No comments:

Post a Comment