हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७२
चिमणाजीआप्पा —
भाग १
भाग १७२
चिमणाजीआप्पा —
भाग १
हा बाळाची विश्वनाथ पेशवे यांचा दुसरा पुत्र. याच्या जन्माचे १६९०
(राजवाडे), १६९७ (अ. कोशकार) व १७०८ (सरदेसाई) असे निरनिराळे सन आढळतात.
दमाजी थोराताच्या कैदेंत बापाबरोबर चिमणाजी कांहीं दिवस होता (१७१३).
पेशवाई मिळाल्यानंतर थोरल्या बाजीरावानें मोगलांच्या विरुद्ध जें चढाईचें
धोरण स्वीकारलें, त्यांत माळवा प्रांतीं मुलुखगिरी करण्याच्या कामावर
पेशव्यांनीं चिमणाजी आप्पास नेमिलें. तेव्हांपासून आप्पा
स्वार्यांमोहिमांवर जातीनिशी जाऊं लागले. सारंगपूर येथें राजा गिरधर,
माळव्याचा सुभेदार याच्यावर स्वारी करून आप्पानीं त्यास ठार मारिलें
(१७२४). तसेंच आप्पांनीं त्याच्या नंतरच्या माळव्याचा सुभा दयाबहादुर
याच्यावरहि १७३०/३१ त दोन स्वार्या करून त्याला तिरलच्या लढाईंत ठार केलें
व माळवा हस्तगत केला (आक्टो. १७३१). परंतु शाहूच्या आज्त्रेनें आप्पा
माळव्यांतून निघून शिद्दीवर कोंकणांत गेले. सरबुलंदखानापासून त्यांनीं १७३०
त गुजराथेंत चौथाईचा अंमल बसविला. त्रिंबकरावदाभाडे यांच्या पारिपत्याच्या
प्रकर्णी बाजीराव व आप्पा यांचें ऐकमत्य होतें (१७३१), पुढें (१७३३)
शिद्दीवरील स्वारींत प्रतिनिधीच्या मदतीस आप्पा यास जाण्याबद्दल शाहूनें
आज्त्रा केली; परंतु शिद्दीच्या तर्फे निजामानें कारस्थान चालविल्यामुळें,
निजामावर दाब ठेवण्यासाठीं आप्पा शिद्दीवर गेल्यानें व सेखोजी आंग्रे मरण
पावल्यानें आप्पा हे शिद्दीच्या विरुद्ध आक्टोबरांत कोंकणांत चढाई करून
गेले (१७३३). मराठ्यांचें निजामाशीं युद्ध चालूं असतां तापी नदीच्या आसपास
निजामाला पायबंद म्हणून आप्पा फौजबंद होऊन राहिले होते (१७३८). यापुढें
वसईच्या मोठ्या मोहिमेंत आप्पा प्रमुख होते. ही मोहीम दोन वर्षे चालू होती.
प्रथम ठाणें व साष्टी काबीज केली (१७३७ जून). यावेळीं आप्पानीं बेलापूर,
मांडवी, टकमक, कामणदुर्ग, मनोर वगैरे पुष्कळ ठाणीं फिरंग्यांपासून घेतलीं.
No comments:
Post a Comment