हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १६४
अनूबाई घोरपडे-
भाग ५
पु त्रा चा अ व्य व स्थि त प णा व मृ त्यू :- १७६१च्या पावसाळयांत अनूबाई
आपल्या मामलतीच्या ठिकाणीं धारवाडास होती. १७६२च्या सुमारास अनूबाईचें
आपल्या मुलाशीं पुन्हां बिनसलें. नारायणराव आतांव्यसनाधीन होऊन कारभारांत व
खासगी वागणुकींत अव्यवस्थितपणा करूं लागला.त्यास व त्याच्या स्त्रियेस
यापुढें अनूबाईनें नजरकैदेंत ठेवल्या प्रमाणेंस्थिति होती. १७६४ सालीं
अनूबाईच्या शरीरीं समाधान नसल्यामुळें तीमाधवरावाबरोबर हैदरावरील स्वारीस
येऊं शकली नाहीं. पानिपतच्या युध्दानंतरहैदरानें तुंगभद्रेच्या उत्तरेस
स्वाऱ्या करून धारवाड काबीज केलें होतेंतें या स्वारींत पेशव्यांनी काबीज
करून धारवाडचा सुभा मोकळा केला. व त्याचीमामलत पुन्हां इचलकरंजीकरांना
सांगितली. अनूबाई इचलकरंजीस दुखणेकरी पडूनहोती, ही संधि साधून
नारायणरावानें दंगा आरंभला. पण अनूबाई लवकरच बरीझाल्यानें नारायणरावाचे बेत
विरघळून जाऊन त्यास पुन्हां प्रतिबंधांत रहावेंलागलें. नारायणरावाचें आतां
सरकारी कामगिरीकडे लक्ष राहिलें नसल्यामुळेंपेशव्याच्या मनांत त्याचें पथक
मोडावें व सरदारी काढून घ्यावी असें आलेंहोतें; पण १७६६ च्या जूनमध्यें
अनूबाईनें पुण्यास जाऊन व आपली भीड खर्चकरून व्यंकटरावाच्या नांवें सरदारी
करून घेतली. इ. स. १७६९ त मामलतीसंबंधींबरीच बाकी तुंबल्यामुळें पेशव्यांनी
धारवाडचा सुभा इचलकरंजीकरांकडून काढूनघऊन बाकी वसूल करण्याकरितां कारकून व
ढालाईत इचलकरंजीस पाठविले.
हा तगादाउठविण्याकरितां मुलगा आजारी होता तरी त्यास तसाच टाकून अनूबाई पुण्यासगेली व रदबदली करून पेशव्यांकडून बरीच सूट मिळवून राहिलेली बाकी चारमहिन्यांत फेडण्याचा तिनें करार केला. या सुटीसंबंधीं कित्येक रकमांवरपेशव्यांचा ' वडील मनुष्य सबब रयात ' असा शेरा होता. इ. स. १७७० मध्येंपेशव्यांची स्वारी कर्नाटकच्या मोहिमीस निघाली तेव्हां अनूबाई आपल्यानातवासह जेऊर मुक्कामीं त्यांच्या लष्करांत जाऊन पोहोंचली. पण इतक्यांतमुलगा वारल्याची बातमी आल्यामुळें ती पुन्हां इचलकरंजीस आली. अनूबाईचा आतांवृद्धापकाळ झाला असल्यामुळें तिच्यानें राज्यकारभाराची दगदग उरकेनाशी झालीहोती. त्यांतच पुन्हां हा पुत्रशोक प्राप्त झाला ! तथापि धैर्य धरून आपलानातू व्यंकटराव याच्या कल्याणकरितां तिनें पूर्वीप्रमाणे कारभार पुढेंचालविला.

No comments:
Post a Comment