स्वराज्याचे पांडव भाग ४ शंकराजी नारायण सचिव
स्वराज्याचे पांडव
भाग ४
शंकराजी नारायण सचिव
शंकराजी नारायण सचिव हे एक जबरदस्त दूरद्रुष्टि आणि असीम
पराक्रम लाभलेलं व्यक्तिमत्व. लढाईचे डावपेच आखण्यात रामचंद्र पंतांना
मौल्यवान सल्ला व मदत मिळायची ती शंकराजींची. राजाराम महाराजांच्या
कारकिर्दीच्या सुरवातीला मोगलांनी हस्तगत केलेल्या बऱ्याच प्रदेश आणि
किल्ल्यांना पुन्हा जिंकून घ्यायचे डावपेच दोघांनी मिळून आखले होते. १६९०
मध्ये शंकराजींनी प्रतापगड, पुरंदर, तोरणा सारखे मोठे किल्ले मोगलांच्या
ताब्यातून परत स्वराज्यात आणले. त्यांच्या ह्या यशस्वी मोहिमेमुळे मोगलांची
बरीच पीछेहाट झाली आणि महाराष्ट्रात राजाराम राजेंची सत्ता टिकून राहिली.
१६९०च्या ऑक्टोबर महिन्याच्या आसपास कधीतरी राजाराम महाराजांनी शंकराजींना
सचिव हा किताब बहाल केला - ह्या पदवी बरोबर त्यांना कोकण प्रदेशचा अधिभार
सोपण्यात आला. वाईचा सुभा परत स्वराज्यात आल्यावर शंकराजींना त्याचाही
कार्यभार देण्यात आला. १६९२ मध्ये एका धाडसी मोहिमे मध्ये त्यांनी राजगड
किल्ला परत मोगलांकडून जिंकून स्वराज्यात आणला. कारकीर्दीची सुरुवात
कारभारी म्हणून करणाऱ्या शंकराजींची खरी ओळख बनवून दिली त्यांच्या
तलवारीच्या पात्यानी. त्यांनी जिंकलेल्या लढाया आणि किल्ल्यांवरून
त्यांच्या सैन्य संघटन आणि युद्धकौशल्य ह्या गुणांची प्रचिती येते. पुढे
शंकराजींनी भोर चे संस्थान स्थापन केले - भोर चा पंतसचिव वाडा
अजूनही त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतो. राजाराम महाराजांनंतर शंकराजींनी
महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणाचा लढा चालू ठेवला.
त्यानंतर महाराणी ताराबाई आणि शाहू महाराजांच्या झगड्यात सापडल्यामुळे
शंकराजींनी आत्महत्येचा दुर्दैवी मार्ग पत्करला(मृत्यू : भोर नजीक अंबवडे
येथे)
No comments:
Post a Comment