हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९२
।। राजमाता जिजाबाई ।।
सांभार :http://www.marathidesha.com
शहाजीराजांनी राजमुद्रा,विश्वासू नोकर सोबत देऊन,स्वतंत्र मराठी राज्य
स्थापनेचा निर्धार करून बालशिवाजींना व जिजाऊंना पुण्याला इ.स. १६४२ मध्ये
आपल्या जहागीरीमध्ये पाठविले.थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजेंसोबत
कर्नाटकात राहिले. पुण्यास आल्यानंतर जिजाऊंनी प्रथम लोकांना त्रास
देणाऱ्या सावकारांचा,गुंड लोकांचा बंदोबस्त केला.हिंसक जंगली स्वापदांपासून
लोकांना मुक्त केले.लोकांमध्ये हळूहळु सुरक्षिततेची भावना निर्माण
झाली.पिण्याच्या पाण्यासाठी आंबवडी,पनवडीचा धरणे बांधली.शेतकऱ्यांना
बी-बियाणे उपलब्ध करून दिले.शेतसारा कमी केला.जिजाऊंची राहणी अत्यंत साधी
होती..
कातकरी,कोळी,भिल्ल,कुणबी,मुसलमान,हरिजन अशा विविध जातीधर्मातील मुलांसोबत शिवरांय युध्दाचे खेळ खेळत असत.जहागिरीची वस्त्रे बाजूला ठेवून शिवराय आपल्या संवंगड्यासोबत जेवत असत.त्यामुळे बारा मावळाच्या तरूणांना शिवराय आपल्यातीलच एक वाटू लागले.मावळातील पासलकर, जेधे, मालूसरे, निंबाळकर, मोहिते, महाडिक, शिर्के, कंक, शिळीमकर,महाले,जाधव,जगताप आदि अनेक लोकांना एकत्र आणून बाल शिवबांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला.याकामी त्यांना जिजाऊंचे मागदर्शन मिळाले.
शहाजीराजे दक्षिणेत मराठा राज्य वाढवत होते,तर महाराष्ट्रात जिजाऊंच्या मार्गदर्शनात शिवबा आपले राज्य वाढवत होते.बेंगलोरहून परत आल्यानंतर शिवरायांनी बारा मावळ(राजमाची व चाकण येथून दक्षिणेस रायरेश्वराचा डोंगर,अंबेडखिंड,खंबाटकीचा घाट येथपर्यंत पुण्याजवळचा मुलूख) खोर्यात राहणार्या आपल्या सवंगड्याना सोबत घेऊन स्वत:ची फौज तयार केली.वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी इ.स.२७ एप्रिल १६४५ साली त्यांनी भोरजवळच्या,रायरेश्वराच्या पठारावर स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली.
राजमाता जिजाऊंचे शिल्प,जन्मस्थानातील आतील बाजू

No comments:
Post a Comment