Total Pageviews

60,701

Thursday, 8 September 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य याचा शोध भाग ३०


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य याचा शोध
भाग ३०

घाटगे मराठा घराणे -भाग २

सखाराम (सर्जेराव) घाटगे :-

१७९६ सालच्या सुमारास या घराण्यांतील ज्या दोघां पुरूषांचीं नांवें इतिहासांत विशेष प्रसिध्दीस आलीं, त्यांतील एक यशवंतराव व दुसरा सखाराम होय. यशवंतरावाची बहीण कोल्हापूरकरास दिली होती.यशवंतराव व सखाराम या दोघांत वतनासंबंधीं कांहीं भांडण होऊन त्यांच्यामध्यें एक चकमक झाली. तींत सखारामाचा पराजय होऊन तो पळून येऊन परशुराम भाऊच्या चाकरीस राहिला. कांहीं दिवसांनीं त्यानें भाऊचीं नौकरी सोडून नाना फडनविसाची धरली. नानानें त्याजकडे १०० स्वारांचें आधिपत्य दिलें होतें. सन १७९६ त नाना पुणें सोडून गेले तेव्हां सखाराम हा शिंद्यांच्या चाकरींत शिरला; येथेंहि त्यांस १०० स्वारांचेंच आधिपत्य देण्यांत आलें. त्यानें आपल्या चातुर्यानें शिद्यांचा कारभारी रायाजी पाटलाची मर्जी संपादिली. सखारामाची मुलगी सुस्वरूप म्हणून प्रसिध्द असल्यामुळें तिच्याशीं विवाह करण्याच्या उद्देशानें स्वत दौलतराव शिंदेहि त्याची खुशामत करी. शिंद्याशीं संबंध जोडण्यास सखारामहि उत्सुक होताच, परंतु जितकें आपण ओढून धरूं तितका आपला फायदा जास्त असें समजूंन आपण ओढून धरूं तितका आपला फायदा जास्त असें समजून तो शिंद्यास मुलगी देण्यास वर कांकू करी. रावबाजी याला उत्तरहिंदुस्थानांत नेण्याकरितां बाळोबा तात्यानें सखारामाचीच योजना केली. तेव्हां ह्यानें बाजीरावास सांगितलें कीं तुम्हाला पेशवाई मिळवून देण्यासाठीं मी शिंद्याचें मन वळवितों आणि शिवाय शिंद्यास आपली मुलगी देतों. मात्र आपण पेशवे झाल्यावर शिंद्यास दोन कोट रूपये द्यावें व मला शिंद्याची दिवाणगिरी व कागलची जहागिरी मिळवून द्यावी. तें रावबाजीनें कबूल केलें.

1 comment: