Total Pageviews

Monday, 10 April 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २९८


 हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २९८
सरदार वाघोजी तुपे

समस्त तुपे परिवाराच्या इतिहासाचा मागोवा यादव कुळापर्यंत घेता येतो. सन १३०० मध्ये यादव कुळातील दुसरा राजा सिंघम याने दक्षिणेकडील दिग्विजयानंतर त्याचे सोबत असलेले योद्धे हे त्या त्या प्रदेशामध्ये स्थाईक झाले त्यातील अनेकजण हे तुपे परिवाराचे मूळ वंशज आहेत.

सोळाव्या शतकात म्हणजेच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडामध्ये हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत यातील अनेक लढवय्ये सामील होते. तुपे परिवारातील एक सरदार वाघोजी तुपे हे त्यापैकी एक होत. तसा स्पष्ट उल्लेख शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या "श्रीमानयोगी" या कादंबरीत आहे. शिवरायांनी अनेक सरदार व योद्धे यांना काही वतने, गावे इनामी बहाल केली त्यामध्ये सातारा जिल्ह्यामधील अतीत हे गाव तुपे परीवारीतल योद्धे यांना बहाल करण्यात आले अशाप्रकारे तुपे परिवारातील पूर्वज हे अतित व राज्यातील विवध भागामध्ये स्थाईक झाले.

स्वातंत्र्यापूर्वी बरेचसे तुपे परिवारातील सदस्य हे ब्रिटीश सरकार व ब्रिटीश साम्राज्य यांचे विरोधात महात्मा गांधी यांचे बरोबर स्वातंत्र्यासाठी स्वतंत्र्य सैनिक म्हणून लढले आणि स्वातंत्र्यासाठी आपले योगदान दिले. तसेच गोवा मुक्ती संग्रामात देखील या परिवाराचा मोलाचा सहभाग आहे.

तुपे परिवारातील अनेक सदस्यांनी हडपसर गाव व परिसरातील भागामध्ये अनेक सहकारी संस्था, शाळा, सहकारी बँका, गृहप्रकल्प इत्यादी स्थापन केलेले असून हडपसर गावचा व परिसराचा विकास होण्यामध्ये तुपे परिवाराचा मोलाचा वाटा आहे.

तुपे परीवारामधील सदस्य हे संशोधक, सनदी अधिकारी, अभियंता, खासदार, आमदार, नगरसेवक, चार्टड अकाउंटट, डॉक्टर, वकील विविध सरकारी व निमसरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. तसेच अनेक सदस्यांनी बांधकाम व्यवसाय, हॉटेल, पर्यटन, अत्याधुनिक शेती, व इतर अनेक क्षेत्रात भरगोस योगदान देत आहेत तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्येही तुपे परिवार अग्रस्थानी आहे आणि त्यामुळेच हा परिवार हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर सर्वत्र एक मोठा आणि बलवान परिवार म्हणून ओळखला जातो.

No comments:

Post a Comment