हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २९१
शंभू महाराज्यांच्या मृत्यूचा बदला पूर्ण झाला
⋅ Prashant Shigwan
भाग ३
हल्ला -
मध्यरात्र उलटली . संताजी भल्या पहाटे मोघलांच्या छावणी जवळ आले बारीक पावसाच्या सारी कोसळत होत्या. आजू बाजूला उसाचे रान होते ढग दाटून आल्याने लक्ख काळोख होता. संताजीने तिन्ही दिशेने आपले सैन्य मोघलांच्या छावणीत घुसवले. एकाच कापा कापी सुरु झाली .झोपलेले मेंधारागत कापले गेले.
निजामाला हा हल्ला अपेक्षित नव्हता. त्याला फक्त राजाराम महाराज्यांची पाठलाग करायची हेच डोक्यात होते. त्यासाठी तो जय्याद तयारी करत होता. घोड्यावर बसून तो खानेआलामच्या तंबू जवळ आला. त्याने त्याला पुढे जा मी मागून येतो असे सांगितले. (खानेआलाम हा निजामाचा मुलगा याचे खरे नवा इखालास खान. यानेच शंभू राजांना खेचत आणून बादशहाच्या पुढ्यात टाकले होते म्हणून औरंगजेब ने याला खानेआलाम हा किताब दिला होता.)
खानेआलाम संताजीचा बंदोबस्त करायला निघाला. त्याला येताना पाहून संताजी तेथून आपल्या साथीदारांना घेवून निसटले. ते थोड्या लांब जाऊन थांबले. सारे मराठा काही अंतरावर एकत्र येताना खानेआलाम ने पहिले. ते संखेने जास्त नव्हते. तेम्भ्याचा उजेडात संताजीला सूचना देताना पाहून खानेआलाम हसला ” सालोंको लढाई का ताजुर्भा हि नाही है तोफोसे भून डालो सबको” पण पाठलागाच्या भरात आपण तोफा आणायचे विसरलो हे तो विसरला. एका सैनिकाने याची जाणीव करून दिली . पिच्छा करो उनका “
” सांभाळून खान साहेब , संताजी हाय तो संताजी घोरपडे! ” कान्होजी शिर्के आपला घोडा जवळ आणत म्हणाला.इतक्यात निजाम सार्या तयारीनिशी आला. ” मराठ्यांना फक्त पळवून लावा पिच्छा मत करणा|” निजाम .
” समोरच्या टेकडीवर संताजी उभा हाय हुजूर ” कान्होजी शिर्के म्हणाला.” काय? चांगली संधी आहे तुटून पडा मला संताजी घोरपडे हवा आहे जिंदा या मुर्दा!” निजाम खुशीत म्हणाला.
निजाम मराठ्यांचा पाठलाग करू लागला. आणि मराठे पळाले. मोक्याच्या जागी येताच मराठे थांबले आणि लढू लागले हळू हळू झाडीतून त्यांची संख्या वाढू लागली. काय होत आहे हे समजायच्या आत डोंगर कपारीतून बरकंदाज बंदुकीचा मारा करू लागले. निजाम गोंधळाला. झालेला प्रकार त्याच्या लक्षात आला पण आता त्याचा उपयोग नव्हता. छावणी तोफा मागे सुटल्या होत्या. मागून ,पुढून ,डावीकडून, उजवीकडून मराठ्यांनी त्याला घेरले होते. निजाम हादरला आपल्या सैन्याला मागे व्हा अश्या सूचना देवू लागला यामुळे लढणारे सैनिकाच्यात गोंधळ वाढला. लढणारे सैन्य पळू लागले मग सुरु झाली लांडगेतोड !तोवर मराठ्यांची राखीव तुकडी निजामाच्या छावणीवर तुटून पडली. बुनाग्याना पिटून मिळेल ते लुटले तंबू, राहुट्या जाळल्या.इतक्यात कानाचे पडदे फाटतील असे तीन मोठ्या स्पोटाचे आवाज झाले. आपला दारू गोळा मराठ्यांनी पेटवून दिला हे निजामाला समजून चुकले
No comments:
Post a Comment