कोंडाजी फर्जंद
भौगोलिकदृष्टया अत्यंत महत्वाचा पन्हाळगड हा स्वराज्यात नव्हता आणि याची सल शिवाजी महाराजांना चांगलीच होत होती. ही सल शिवाजी महाराजांनी आपल्या शिलेदारांना बोलून दाखवली. कोंडाजी फर्जंद यांनी हा किल्ल्या घेण्याची जबाबदारी आपल्यावर घेतली आणि अवघ्या ३०० लोकांसह मोहिम फत्ते करू अशी ग्वाही दिली. याचवेळी पन्हाळगडावर बाबूखान नावाचा किल्लेदार १५०० गनिमासह किल्ल्यावर होता. कोंडाजी फर्जंद आपल्या सहकार्यासह गडाजवळ पोहचले आणि निवडक ६० मावळे घेऊन कड्यावरून मध्यरात्री गडावर पोहचले. मराठे गडावर आल्यावर त्यांनी कापाकापीला सुरूवात केली. गडाचा किल्लेदार बाबूखान व कोंडाजी यांच्यात महाभयंकर युध्द झाले. अखेर कोंडाजी फर्जंद यांच्या एकाच तलवारीच्या वारात बाबूखानाचे मस्तक धडावेगळे झाले. किल्लेदार पडल्यामुळे खानाच्या सैन्यात गोंधळ उडाला. ते पळून जाऊ लागले. पण गडावरील साठ मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवून गड ताब्यात घेतला..
कोंडाजी फर्जंद यांनी आपल्या अवघ्या ६० मावळयांसह पन्हाळा पुन्हा एकदा स्वराज्यात सामील केला याची इतिहासात नोंद असलेली तारीख आहे ६ मार्च १६७३..
No comments:
Post a Comment