हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २८९
शंभू महाराज्यांच्या मृत्यूचा बदला पूर्ण झाला
⋅ Prashant Shigwan
भाग १
पन्हाळ्याहून राजाराम महाराज सुखरूप निसटले आणि शेख निजाम हादरला. आता आपण पातशहा ला काय जवाब देणारा काही झाले तरी राजाराम ला पकडयाचेच ‘जिंदा या मुर्दा.’ त्याने पाठलागाची जोरदार तयारी चालवली. हि बातमी संताजीला लागली.
याच शेख निजामाने शंभू महाराज्याना दगा करून पकडले. तसेच आपल्या पित्याच्या आणि शंभू राज्यांच्या मृत्यूचा बदला हि घ्यायचा बाकी आहे. संधी चांगली आहे. याला जिता सोडायचा नाही असे संताजीने मनोमन ठरवले.
निजामाला सामोरा समोर अंगावर घेणे कठीण !सैन्याबालाने तो आपल्यापेक्षा भारी. पण काही झाले तरी त्याचा कोथळा काढायचाच मग त्यासाठी वाट्टेल ते करायचे असे मनोमन ठरवून संताजीने आपली युद्धनीती ठरवली.
पन्हाळा ते कोल्हापूर या भागात तुरळक डोंगर पसरलेले झाडीही दाट संताजीने आपली फौज या झाडीत आणून ठेवली. विठोजी चव्हाण, मकाजी देवकाते , बाबुसाहेब पवार, रखमाजी मोहिते, शितोळे, महादजी नारायण या आपल्या प्रमुख सरदाराना त्यांनी कामगिरी वाटून दिल्या.पुत्र रानोजीला त्यांनी आपल्या सोबत ठेवले.
No comments:
Post a Comment