हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २९०
शंभू महाराज्यांच्या मृत्यूचा बदला पूर्ण झाला
⋅ Prashant Shigwan
भाग २
कोल्हापूरच्या तीन कोसाच्या अंतरावर आपले सारे सैन्य ठेवून हजारभर सैन्य घेवून संताजी मोघली सैन्याच्या तळाकडे निघाले. ” कशाला हा वाढाचार दाजी सरळ चाल करून मोघलांचा फडशा पाडू ” सोबत असलेला रखमाजी शिन्तोले म्हणाला .
” नाही रखमा, लढाईत फक्त मारायचे किवा मारायचे नसते. लढाई डोक्याने खेळायची असते. आपली ताकद राखून गनिमाला गाडायचे असे शिवाजी राजांनी आपल्याला शिकवले.” संताजी.” मग तुम्ही राहा कि मागे डोके लढवत मी आणि विठोजी जाऊन डाव साधतो.” रखमा.”त्यामुळे डाव साधणार नाही. ” संताजी.” कसे काय ?” रखमा गोंधळून म्हणाला.
” बादशहाचे कळस आपण सार्यांनी कापून आणले पण नाव कुणाचे झाले?” संताजी.”तुमचे “”बरोबर कि नाही , संताजी म्हटले कि सारी मोघाल्शाही झोपेतून खडबडून जागी होते.कल्पना करा काही मोजक्या राऊत घेऊन संताजी आपल्यावर चाल करून येत आहे हे समजल्यावर शेख निजाम काय करील?” संताजी.
“चवताळून तुमच्यावर चालून येईल.”रखमा ” छे गड्या चवताळून नाही खुश होऊन येईल. ” संताजी “खुश का होईल?” रखमा “अरे शंभू राजांना धरल्याने नाव मोठे झाले आहे त्याचे. मग संताजीला पकडून देवून बादशहाची आणखी मर्जी साधण्याचा मोका तो कसा सोडेल ? मलाही हेच हवे आहे त्याला लढवत आपल्या तळआहे तिथे न्यायचे आणि फडशा पडायचा हि माझी सरळ रणनीती आहे.” संताजी
No comments:
Post a Comment