Total Pageviews

Sunday, 9 April 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २७४

 



हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २७४
।।सिंहाचा छावा छत्रपती संभाजीराजे।।
सांभार :http://www.marathidesha.com
भाग
संभाजीराजेंचा राज्याभिषेक
पन्हाळा किल्ल्याहून रायगडाला रवाना होताना संभाजीराजेंनी स्वराज्यातील सर्व किल्ल्यावर दारूगोळा,धनधान्य पाठवियाची व्यवस्था केली.किल्ल्याच्या मजबूती- करणाकडे किल्लेदारांना लक्ष द्यावयास सांगून आवश्यक साधनसामग्री प्रत्येक किल्ल्यावर पाठविली.यानंतर संभाजीराजेंनी रायगडाला प्रस्थान केले.रायगडाची जनता आपल्या राजाचं स्वागत करावयास गडावर हजर होती.सन १६ जानेवारी १६८१ साली संभाजीराजेंचा राज्याभिषेक,किल्ले रायगडावर झाला.या प्रसंगी त्यांनी सर्व अष्टप्रधान मंडळीना माफ केले व परत सर्वांना अष्टप्रधानात स्थान दिले.पण काही महिन्याने या मंडळीनी परत बंडाळी केली,तेव्हा कायमची बंडाळी मोडून काढण्यासाठी अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना छत्रपती संभाजींनी सुधागड परिसरात असणार्या परली गावात हत्तीच्या पायी दिले.
बुर्हाणपुरची मोहिमशत्रू तोंडाला आल्यामुळे ती वेळ स्वस्थ बसण्याची नव्हती.संभाजीराजेंनी लगेच बुऱ्हाणपुरची मोहिम आखली.बुर्हाणपुर हे मोघल राजवटीतील सुरतेनंतर असणारे दुसरे सधन शहर होते.त्यामुळे हे शहर लुटून मोघलांचे आक्रमण उधळून लावण्यासाठी,हंबीरराव मोहिते यांनी बुऱ्हाणपुरवर चाल केली.मोघलांचा इतिहासकार खाफीखान यांने या लुटीचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे.
बुर्हाणपुर शहराच्या बाहेर बहादूरपुरा आणि इतर सात पुरे होते,मराठ्यांनी ते पुरे घेरले.मराठ्यांनी शहरावर इतक्या अनपेक्षितपणे हल्ला केला की,शहरातील लोकांना एक पैसा हलवता आला नाही.देशोदेशीचे जिन्नस,जडजवाहीर,सोने-नाणे,रत्ने यांनी भरलेली बाजारपेठ मराठ्यांनी लुटली.
याच सुधागड परिसरात असणार्या परली गावात,
अष्टप्रधान मंडळीना, संभाजीराजेंनी हत्तीच्या पायी दिले

No comments:

Post a Comment