Total Pageviews

Thursday, 13 April 2023

!! #होळकरांचे सेनापती🤺 #राजेवाघ घराणे !!

 










!! #होळकरांचे सेनापती🤺 #राजेवाघ घराणे !!
मराठा 🚩साम्राज्य अखंड हिंदुस्थानभर फैलावण्यासाठी होळकर घराण्याचे फार मोठे योगदान. याच घराण्याचे मूळ पुरुष मराठा साम्राज्य विस्ताराक "#श्रीमंत_सुभेदार_मल्हारराव_होळकर" यांचा अखंड हिंदुस्थानभर प्रचंड दरारा. याच होळकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र्रातील अनेक घराण्यांची तलवार तळपली. मराठासाम्राज्य आणि होळकरशाही वाढवण्यासाठी ज्यांनी सुरवातीला मदत केली त्यांना होळकरांनी सरदारकी-जहागीरदारी सोबत उत्पन्नाचा काही प्रदेशही देऊन योग्य तो सन्मान केला. ती घराणी म्हणजे "बारगळ, बुळे, वाघमारे, राजेवाघ, लांभाते, पिसे, फणसे, धायगुडे, भागवत, ढमढेरे, खटके, कोकरे, बहाड, गावडे, बोराडे, पिंगळे, महाडिक, कांबळे-पळशीकर, नलागे, राजोळे, इंगळे, मतकर, म्हस्के, शितोळे, खेमनोर" (अजून काही नावे असू शकतात) इ. पण यासर्व घराण्यातील प्रसिद्ध घराणी म्हणजे धनगर कुळातील राजेवाघ आणि बुळे सरकार. होळकरशाहीतील जहागिरीचा सर्वाधिक भाग राजेवाघ घराण्याला देण्यात आला होता. राजेवाघ घरण्याच्या जहागिरीतून येणारे उत्पन्न हे होळकरशाहीतील सर्वाधिक उत्पन्न होय.
राजेवाघ हे घराणे मूळचे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे. राजेवाघ घराण्याचे मुळ पुरुष म्हणजे इतिहासातील प्रसिद्ध योद्धे, महाबालढ्या अश्या होळकरांच्या लष्कराचे सेनापती, होळकरांच्या चपळ घोडदळ आणि सर्वात कडवट अश्या सेनेचे नेतृत्व करणारे प्रसिद्ध नाव म्हणजे "#सेनापती_संताजीराजे_वाघ". संताजींचा पराक्रम आणि योगदान पाहून होळकरांनी त्यांना महितपुर, उतरण, बेटमा या प्रदेशाची जहागिरी दिली त्याचे एकूण वार्षिक उत्पन्न ३,००,००० रु. होते जे होळकरशाहीतील इतर घरण्यांन पेक्षा सर्वाधिक होते. महितपुर या जहागिरीच्या प्रदेशात संताजीराजे वाघ यांनी जगप्रसिद्ध अशी तालाकुंजी बारव बांधली. त्यांना होळकरांनी महितपुरचा किल्ल्या ही इनाम म्हणुन भेटला जो होळकरांनी बांधला होता. संताजींना प्रजा नेहमी राजे म्हणूनच ओळखत असे, पुढे वाघच राजेवाघ झालं. पुढे मराठा-अब्दाली यांच्यात पानिपतच युद्ध झालं. या युद्धात संताजीराजे वाघ ही होते. जे युध्दाच्यादिवशी सायंकाळी मल्हारबांच्या आदेशाने भाऊंच्या मदतीला गेले. भाऊंच्या मदतीला गेलेल्या शेवटच्या मराठी पथकाचे सरदार होते. मल्हारबांनी होळकरांची कडवट फौज संतांजींच्या नेतृत्वाखाली भाऊंना पानिपत मधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पाठवली होती. पण दुर्दैवाने त्याला यश आलं नाही आणि संताजीराजे ५५ पेक्षा अधिक जखमा घेऊन धारातीर्थी पडले. संताजींचे प्रेत भाऊंच्या जवळच अढळले. संताजींचे प्रेत पाहून स्वतःह अब्दालीही गहिवरला होता. पानिपतच जे सांकेतिक भाषेत पत्र लिहिलं होतं त्यात जे २ मोती, २८ मोहरा गळल्या त्यातील एक मोहर म्हणजे संताजीराजे वाघ. संताजीराजे यांच्या बलिदानानंतर मल्हारबांनी त्यांच्या मुलीचा प्रिताबाई वाघ यांचा विवाह आपले नातू मालेराव होळकर यांच्या सोबत लावून दिला आणि राजेवाघ आणि होळकर धनगकुळी घराण्याचे सोयरीक संबंध सुरू झाले.
पुढे वाघ घराण्याला होळकरांनी पेशव्यांकडून मौजे काठापुर बुद्रुक, अवसरे प्रांत जुन्नर ची जहागिरदारी मिळवून दिली सोबत पेशवे दरबारात रु. ४८० चे मंदिल, पोशाख देऊन योग्य सन्मान दिला. होळकरांनी पुढे वाघ घरण्यातील #सरदार_तुळसाजी_वाघ (२६६८६७ रु.) आणि #सरदार_मधवराव_वाघ (२९६१६ रु.) असा वार्षिक उत्पन्नाचा प्रदेश वाटून दिला. मल्हारबांनंतर तुकोजींच्या नेतृत्वाखाली टिपू सुलतानवर च्या स्वारीतही सरदार वाघ घराणे सामील झाले होते तेव्हा मोहीम यशस्वी झाली म्हणून पेशव्यांनी वाघ घरण्यातील सदस्यांचा सोन्याचे कडे किंमत ३४६-३-० रु. देऊ दरबारात सत्कार केला होता. खरड्याच्या प्रसिद्ध लढाईतही वाघ घराण्याची समशेर ताळपली होती. आजही मध्यप्रदेश मध्ये वाघ घराण्याला राजेवाघ म्हणूनच ओळखले जाते, त्यांचे सध्याचे वंशज बेटमा या जहागिरीच्या प्रदेशास वास्तव्यास आहेत.
महितपुरच्या भव्यदिव्य किल्ल्या सोबत महाराष्ट्रातील जिरे काठापुर येथे ही वाघ घरण्याचा भव्यदिव्य असा वाडा असून सोबत तिथे वाघ घरण्यातील सरदारांच्या समाध्या सुद्धा, छत्री स्मारक आहेत. सध्या वाडा आणि समाधी छत्र्या पूर्णपणे दुसर्लक्षीत आहेत. इतिहासप्रेमींनी या कडे लक्ष देणे जरुरी आहे अन्यथा हे वैभव कालौघात नष्ट होण्याच्या वाटेवर आहे.
ऐतिहासिक पाऊलखुणा हिंदुस्थानभर पसरलेल्या धनगरांच्या पराक्रमाच्या...🗡
पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा...!!
फोटो साभार :- रामभाऊ लांडे, राहुल वावरे
(महितपुरच १,२,३ & काठापुर चे ४,५,६,७,८)
शब्दांकन संकलन :- अवधूत लाळगे
संदर्भ 📚 :- होळकरशाही भाग १
रुबाबदार सरदार🤺
राजेवाघ 🐅 जहागीरदार
🇮🇩⚔होळकरशाही⚔🇮🇩

No comments:

Post a Comment