सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग २
दुसरा उल्लेख महाराजांनी मालोजी घोरपडेंना भागानगरहुनच लिहिलेल्या पत्राचा करावा लागेल. दोन पिढ्या जपलेलं वैर विसरून दक्षीणेतील लोकांना एकत्र आणण्यासाठी महाराज त्यात म्हणतात - ".... आपल्या जातीच्या मराठीया लोकांचे बरे करावे हे आपणास उचित आहे ऐसे मनावरी आणून तुमचा आमचा वडिलापासून दावा वाढत आला तो आम्ही मनातून काढून नि:कपट होऊन, तुम्ही मराठे लोक, कामाचे, तुमचे बरे करावे ऐसे मनी धरुन हजरत कुतुबशहासी बहुता रीती बोलून तुम्हास हजरत कुतुबशहाचा फर्मान घेऊन पाठवला आहे ... तुम्ही कदाचित ऐसा विचार कराल की, आदिलशहाचे आपण दो पिढीचे वजीर आणि आता विजापूरकडून कुतुबशाहित राजेयांचे बोले कैसे जावे? तरी जे समयी खवासखान धरीला, विजापुरचा कोट पठाणे घेतला ... तेच समयी पादशाही बुडाली.... ऐशिया्स दक्षिणचे पादशाहिस पठाण जाला. हे गोष्ट बरी नव्हे. पठाण बळावला म्हणजे एका उपरी एक कुली दक्षिणियांची घरे बुडविल, कोणास तगो देणार नाही. ऐसे आम्ही समजोन हजरत कुतुबशहा पातशहा यांसी पहिलेपासून रुजुवात राखली होती. त्यावरुन सांप्रत हजरत कुतुबशहाने मेहेरबानी करुन ’हुजुर भेटीस येणे’ म्हणून दस्तखत मुबारक व दस्त पंजीयानसी फर्मान सादर केला."
No comments:
Post a Comment