सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (पूर्वार्ध)
भाग ७
याच वेळी कुत्बशाहीत अब्दुल्ला कुत्बशाहानंतर अबुल हसन उर्फ तानाशाहा हा २१ एप्रिल १६७२ रोजी सत्तेवरती आला होता. कुत्बशाहीतही दिवाण मुझाफरखान व सरखेल आणि खान-इ-खानान मुसाखान यांच्यात १६७३पासून रस्सीखेच सुरु झाली. कुत्बशहाने सुरुवातीला ह्याकडे दुर्लक्ष केले. वास्तविक दोघेही त्याची डोकेदुखीच बनले होते. यापैकी एखाद्या बाजू घेऊन असलेली परीस्थिती अजून चिघळवण्याची त्याला हौस नव्हती. वरतुन मुघली आक्रमणांचा धोकाही दिसायला लागला होताच. मात्र मुझाफरखानाने कुत्बशहाला भरीस पाडून मुसाखानला कैद करवलेच. तो कैद होताच मुझाफरखान स्वैर झाला. अखेरीस कुत्बशहाने त्यालाही हाकलून लावले व सगळा कारभार मे १६७५ मध्ये मादण्णांकडे दिला वरुन मादण्णांना त्याने "सूर्यप्रकाशराव" असा किताब दिला. मादण्णा व त्यांचा भाऊ अक्कण्णा ह्यांनी कुत्बशाहीला सावरले. ह्यांची मुळ नावे - अकरस भानजी व माधो भानजी अशी होती. भानजी म्हणेजे भानुपंत हे वडील. आडनाव पिंगळी. घराणे देशस्थ, ऋग्वेदी, अश्वालायन शाखा, भारद्वाज गोत्री त्रिप्रवर होते. मुळ गाव वारंगळजवळील हनमकोंड. १६६० मध्ये नोकरीकरता गोवळकोंड्याला आले. १६७२ मश्ये मुझाफरखानाचे मुख्य पेशकार झाले. दोन्ही बंधू अत्यंत बुद्धिमान, कर्तव्यनिष्ठ, कर्तबगार व धार्मिक होते. संस्कृत, फारसी, कानडी, दख्खनी हिंदि व थोडि बहुत मराठीही अवगत होती.
याच सुमारास स्वराज्यात राज्याभिषेकाच्याही हालचाली महाराजांनी सूरु केल्या होत्या. आणि एक बातमी येऊन कोसळली - प्रतापराव गुजरांनी सारासार विचार न करता रागाच्या भरात सहा अंगरक्षकांसहीत बहलोलखान पठाणाच्या सैन्यावरती हल्ला केला त्यात ते कामी आले. महाराजांना अपार दु:ख झाले. त्यांनी आनंदरावांना आज्ञा केली प्रतापरावांच्या जागी तुम्ही कामगिरी पार पाडा. मराठी सैन्य चिडले होतेच आनंदरावांनी कानडी मुलुख झोडपायला सुरुवात केली. यावेळि दिलेरखान व बहलोलखान आनंदरावांवरती संयुक्तपणे चालून गेले. पण मराठ्यांनी रोज ४५ कोसांची दौड करुन यांच्या संयुक्त फौजांना फार मागे टाकले. ते बहलोलच्या जहागिरीत शिरले. बंकापूर, पेंच, संपगाव वगैरे लूटून ३००० बैलांवरती हि लुट लादून आनंदराव मागे फिरला. बंकापूर जवळ बहलोलच्या सैन्याने खिज्रखानच्या नेतृत्वाखाली मराठ्यांवरती हल्ला केला. प्रतापरावांच्या मृत्यूने चिडलेल्या मराठ्यांनी या सैन्याचा धुव्वा उडवला. वरुन ५०० घोडे व २ हत्ती जिंकून रायगडकडे गेले.
No comments:
Post a Comment