मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध
भाग ७
इकडे अंताजी माणकेश्वर फरीदाबादेस आले. त्यांच्या सैन्यात मनुष्यहानी फार झाली. त्यांनी त्वरित सर्व खबर पेशव्यांना रवाना केली. थोरले बाजीराव आणि मस्तानी यांचा पुत्र समशेरबहाद्दर ह्यावेळी ग्वाल्हेरच्या जवळ होता. तो हाताला येईल तितकी फौज जमवू लागला. या दरम्यानचे अंताजी माणकेश्वर यांनी पुण्याला धाडलेली ही २ पत्र त्याकाळच्या परिस्थितीचे उत्तम दर्शन घडवतात. त्या २ पत्रातील काही सारांश -
“… अब्दाली अटक उतरोन जुलूस बहुतसा करीत जात आहे. जमिदारही रोज येवून भेटतात. आदिनाबेग, शादिलबेग, जमालुद्दीनखान हे त्रिवर्गही आता त्यास सामील.सरहिंदेस नायब लक्ष्मीनारायण होता तोही माघार फिरला. जंबूचा राजाने झुन्झाची तयारी केली असता त्यावरीहि १०००० फौज रवाना केली. जलालाबाद, आदिनानगर, जालंधर, नुरमहाल येथे नवीन नेमणुका झाल्या. व्यास व सतलज यातील प्रदेश खोजा अब्दुल्ला यास दिला. येथे कुणी मर्द माणूस नाही हे त्यास कळो चुकले. मनुष्य मात्र आपले स्थळी चिंताक्रांत. दिलीवाले अनेक सरदार त्यास मिळो आले….विना आपली स्वारी या प्रांती येत नाही तो काल पर्यंत हिंदुस्थानचा बंदोबस्त होत नाही. अबरू व सल्तनत राहत नाही. समशेरबहाद्दरास पाचारिले आहे. मातबर दक्षिणेची फौज येताच बाहेर निघणार….. “
No comments:
Post a Comment