Total Pageviews

Friday, 4 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३५९

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३५९
नागपूर (नागपूरकर भोसले) :
भाग ६
दुसरा परसोजी भोसले
रघूजीनंतर त्याचा दुबळा मुलगा परसोजी भोसल्यांच्या गादीवर आला (१८१६). त्यामुळे रघूजीचा अनौरस मुलगा धर्माजी व व्यंकोजीचा मुलगा मुधोजी ऊ र्फ आप्पासाहेब या दोघांमध्ये अधिकारांबद्दल तंटा सुरू झाला. रघूजीची पत्नी बांकाबाईचा ओढा धर्माजीकडे होता. मुधोजीकडे सर्व सरदारमंडळी होती. यामुळे मुधोजीने कारस्थान रचून बांकाबाईला नजरकैदेत व धर्माजीस कैदेत टाकले आणि परसोजीस राज्याभिषेक करून सर्व कारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली. धर्माजीचा ५ मे १८१६ रोजी खून झाला. त्यामुळे आप्पासाहेबाच्या हातात सर्व सत्ता आली. आप्पासाहेब चांद्यास गेला असता परसोजी एकाएकी अंथरूणातच मृत अवस्थेत आढळला (१ फेब्रुवारी १८१७). आप्पासाहेबावर परसोजीच्या खुनाचा आरोप करण्यात आला; पण इंग्रजांनी तो दूर करून आप्पासाहेबास अखेर तैनाती फौज स्वीकारावयास लावली आणि भोसल्यांच्या गादीवर आप्पासाहेब आला (२१ एप्रिल १८१७).

No comments:

Post a Comment