Total Pageviews

Thursday, 3 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३३३

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३३३
मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध
भाग १०
दिल्लीच्या खबरा वरचेवर दख्खनेत पोचत होत्याच परंतु दस्तुरखुद्द पेशवे हे यावेळी श्रीरंगपट्टणच्या स्वारीवर होते त्यामुळे बहुतांश सैन्य त्यांच्या सोबत होते. अंताजीची पत्रे मिळताच नोव्हेंबर ५६ मध्ये नानासाहेबांनी राघोबा आणि मल्हारराव यांना पुन्हा उत्तरेस जाण्यास सांगितले. दत्ताजी व जनकोजी शिंदे हे मार्वाद्ची मोहीम आटपून आले होते व त्यात जयाप्पा कामी आल्याने ते या सैन्या सोबत गेले नाही. अंताजी आता दादासाहेब व होळकरांची वाट पाहत फारीदाबादेस निष्क्रिय राहिले. १४ फेब्रुवारी दरम्यान दादासाहेब व फौज इंदुरापर्यंत पोचली. या दरम्यान अब्दाली दिल्ली लुटून पुढे मथुरेस निघाला होता. अंताजी माणकेश्वर आणि जाट सुरजमल यांनीच काय तो पुरुषार्थ दाखवीत अब्दालीच्या स्वारीत धिटाईने तोंड दिले. अंताजी यांनी दादासाहेब जयनगरास पोचताच त्यास निरोप धाडला होता की -
“सांप्रत जयनगरच्या गढ्यास न लागावे, पुढे शहास पारिपत्य करणे याकरिता धावून येणे. पंजाबातून आलासिंग जाट व व त्याचे शिख सैन्य उतरेतून व मराठे दक्षिणेतून अब्दालीस चेपतील तर त्याचे सैन्य दोहो कडून सापडून गारद होईल व अब्दालीची राळ उडेल”

No comments:

Post a Comment