Total Pageviews

Friday, 4 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३६२

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३६२
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (पूर्वार्ध)
भाग ३
शहाजीराजांनी १६३७ मध्ये जिजाऊसाहेब व शिवबाला पुण्यास पाठवले बरोबर व्यवस्था लावण्याची जबाबदारी दादुजी कोंडदेव - मलठणकरांकडे सोपवली. बाल शिवबांच्या नावे कर्यात मावळ्यातली मोकासदारी केली जेणेकरुन कुठलेही बदल करायचे अधिकार प्रत्यक्षपणे त्यांनी जिजाउसाहेब - शिवबांकडे दिले. १६४० मध्ये शिवरायांचे सईबाईंशी लग्न झाले तेव्हा शहाजीराजे कर्नाटकस्वारीत गुंतले होते. या व या आधीच्या कर्नाटक स्वारीमध्ये अफझलखानाने देखिल रणदुल्लाखानच्या हाताखाली बराच पराक्रम गाजवला. श्रीरंगपट्टण, कर्णपुरम्‌, मदुरा, कांची, बेदनुर येथील मांडलिकांवरती अफझलखानाने जरब बसवली होती. थोडक्यात एकाच भागात शहाजीराजे व अफझलखान आपली मर्दुमकि गाजवत होते. अफझलखानाची व इतरांची शहाजीराजांच्या विरोधात असलेली इर्ष्या अधिक वाढवायला शहाजीराजांचा कर्नाटकातील वाढता प्रभाव हा प्रत्यक्षपणे कारणीभूत होताच. पूर्वी "कर्नाटक" म्हणजे जवळपास संपूर्ण दक्षीण भारतच समजला जाई. १६४१ मध्ये शहाजीराजांनी जिजाऊसाहेब व शिवबाला बंगरुळा्स बोलावून घेतले. त्यानंतर साधारण सव्वावर्ष ते बंगरुळास होते. याच दरम्यान शहाजीराजांनी शिवबाचे दुसरे लग्न सोयराबाईंशी करुन दिले.
बंगरुळात शहाजीराजे एखाद्या सार्वभौम राजासारखे रहात. बाल शिवबा ते सगळं अनुभवत होता. त्यासगळ्याचा परीणाम नक्किच बाल शिवबावरती झाला असणार. शिवाय येताना जिजाऊसाहेब - शहाजीराजे - दादुजींची मंत्रणा झालीच असणार. एका स्वतंत्र्य राज्याची कल्पनाच शहाजीराजांनी कल्पून शिवरायांना इथे पाठवले. त्यांच्या बरोबर स्वतंत्र ध्वज, पेशवा, सरनौबत, डबीर, मुजुमदार असे अधिकारी नेमुन दिलेले होते. शिवराय इथे स्वराज्याचे प्रयत्न करत असतानाच शहाजीराजे आपल्या हाताखाली संभाजीराजांना घेऊन तिथे बंगरुळ व कर्नाटकात आपला जम बसवत होते. राक्षसतागडिच्या लढ्यात विजयनगर साम्राज्याचा शेवट झाला असला तरी काही हिंदु सरदार त्यातून वाचून तुंगभद्रेच्या दक्षीणेस आपापली छोटि राज्ये सांभाळत होते. त्यात पेनुकोंडा, म्हैसूर, बेदनूर, जिंजी, मदुरा, बसवापट्टण, चित्रदुर्ग वगैरेंचा समावेश होता. मात्र हे अंतर्गत यादवीत बुडले होते. शहाजीराजांनी कर्नाटकात आधी काही केले असेल तर यांचा पुंडावा मोडून काढला मात्र यांचे राज्य टिकवून ठेवले. विजापूरला यांचा घास घेऊ दिला नाही. या सगळ्यांना आपल्या प्रभावाखाली आणले. अर्थातच हे लहान लहान राजे शहाजीराजांच्या तंत्राने वागू लागले. ज्याला आपण पॉकेट्स तयार करणे म्हणून तशी ह्या हिंदू राजांची पॉकेट्स मोठ्या धोरणीपणाने शहाजीराजांनी तयार करुन ठेवली.
सांभार : सांभार : http://sahajsuchalamhanun.blogspot.in/2012/12/blog-post.html

No comments:

Post a Comment