Total Pageviews

Friday, 4 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३६८

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३६८
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (पूर्वार्ध)
भाग ९
याचवेळि दक्षीणेत एप्रिल १६७४ मध्ये मदुरेच्या नायकाने तंजावर वरती हल्ला करुन तिथला संस्थानिक विजयराघवाला ठार केले व तंजावर बळकावले. विजयराघवाच्या नातवाने या विरोधात विजापूरकरांकडे मदत मागितली. त्यावेळचा वजीर खवासखान होता त्याने शहाजीराजांचे पुत्र व शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजी उर्फ एकोजीराजे यांना विजयराघवाच्या नातवस तंजावरच्या गादिवरती पुन्हा बसवायाची कामगिरी सोपवली. विजापूरकरांचे सरदार म्हणून तब्बल वर्षभर व्यंकोजीराजे जिंजीला होते. १६७५ चे पूर्ण वर्ष त्यांनी संधी शोधण्यात घालवले. अखेर १६७६ मध्ये मदुरेचा नायक व त्याचा दूधभाऊ आपापसात झगडून दुर्बळ झालेत हे हेरुन व्यंकोजींनी तंजावर वरती हल्ला केला व ते जिंकले. विजापूर मध्ये याचवेळि दक्षीणी मुसलमान व पठाण यांचा संघर्ष टिपेला पोचल्याने व्यंकोजींकडे लक्ष द्यायला कुणालाच फुरसत नव्हती. संधीचा फायदा व्यंकोजींनी घेतला. खवासखानाला अटक झाल्याची बातमी मिळाल्यानंतर त्यांनी विजयराघवाच्या नातवास गादिवरती न बसवता त्यांनीच ती बळकावली व ५ मार्च १६७६ मध्ये स्वत:चा अभिषेक करवून महाराजा हे बिरुदहि लावून घेतले.
विजापूर दरबारातील दक्षीणी मुसलमान व पठाण यांचे वितुष्ट विकोपाला गेल्याचे वर नमूद केलेच आहे. वजीर खवासखान दक्षीणी लोकांचे नेतृत्व करत होता तर अब्दुल करीम बहलोलखान हा पठाणांचे. महाराजांनी कोकण जिंकल्याने विजापूरकरांची पिछेहाट झाली होतीच. शिवाय खवासखान नाकर्ता आहे ही बोंब बहलोलखानाचा पक्ष करु लागला होता. त्यावेळी खवासखानाचा विश्वासू दिनायत पंडीत याने सल्ला दिला की औरंगजेबा बरोबर हातमिळवणी करा व शिवाजीचा काटा काढा. मुलुखही मिळेल व पठाणांचे वर्चस्व नाहिसे करता येईल. खवासखानाला हा सल्ला पटला. त्याने बहादूरखानाशी हातमिळवणी केली. १९ ऑक्टोबर १६७५ रोजी पंढरपूरला दोघांची भेटही झाली. इतकेच नव्हे तर खवासखानाने आपली मुलगी बहादूरखानाचा मुलगा नुस्रखान याला देऊन एक नातेही जोडून घेतले. अर्थात खवासखानचे विजापूर दरबारातील वजन याने वाढले. बहलोलखान चरफडत बसला. त्याने खवासखानाशी जुळवून घेण्याचे नाटक केले. एकदा तर त्याला मेजवानीचे निमंत्रण दिले. सगळे आलबेल घडायला लागले की माणूस बेसावध होतो. खवासखान बेसावध झाला. १० नोव्हेंबर १६७५ या दिवशी मेजवानीचे निमंत्रण देऊन वाड्यात आलेल्या खवासखानाला बहादूरखानाच्या खिजरखान पन्नी या सरदाराने अटक केली व बहादूरखानाने त्याची रवानगी बंकापूरच्या किल्यात केली.
सांभार :सांभार:सांभार : http://sahajsuchalamhanun.blogspot.in/2012/12/blog-post.html

No comments:

Post a Comment