मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध
भाग ८
मराठी ताकदीचे हे शिखर होते. इराणच्या शाहचे पत्र मराठ्यांना यावे तसेच जम्मू काश्मीरच्या राज्यातील वकील मराठ्यांना भेटावयास येत आहेत, या गोष्टी मराठी ताकद किती वाढली होती त्याचे द्योतकच आहेत. राघोबादादाच्या पत्रात ज्याचा उल्लेख आला आहे, तो अब्दुल रेहमान हा अहमदशाह अब्दालीचा पुतण्या पुण्याला आला होता. त्याला हाताशी धरून काबुल कंदाहारचे राज्य करावे असा मराठी फौजेचा मनसुबा होता. सरहिंद पासून अटकेपर्यंतच्या पंजाब प्रांताचे या वेळी तीन सुभे लाहोर, मुलतान आणि काश्मीर असे होते. त्यांच्या रक्षणाची तजवीज रघुनाथरावांनी केली. अब्दालीचा जोर कमी झाला होता. शिखांचा जोर वाढला होता पण शिख मराठ्यांचे मित्र होते. अब्दुस्स्मदखान मराठ्यांना शरण आल्याने त्याच्यावर वायव्य नाक्याच्या जबाबदारीचे काम मराठ्यांनी सोपवले. अब्दुल रेहमान यास पेशावर येथे ठेऊन अब्दालीचा प्रतिकार करण्याची जबाबदारी त्याला देण्यात आली.
मराठी ताकदीचा हा पराक्रम पाहिल्यावर आणि त्याचा अभ्यास केल्यावर आजच्या महाराष्ट्रावर कीव येते. एकमेकाला परका झालेला मराठी माणूस ह्या एकत्रित पराक्रमाच्या खुणा विसरला का ? आजही हा पराक्रम वाचताना आपण यात आपल्या जातीचा माणूस शोधणार आहोत का ? या जातीयवादातून मराठी माणूस कधी बाहेर येणार ?
गुरुवर्य निनाद बेडेकरांच्या भाषणात कुसुमाग्रजांचे हे काव्य त्यांनी काही प्रमाणात बदल करून सादर केले होते. ते इथे प्रस्तुत करून आपली रजा घेतो.
No comments:
Post a Comment