मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध
भाग ११ .
परंतु रियासतकारांच्या भाषेत सांगावे तर या विचाराच्या वीरश्रीला पुढारी मिळाला नाही आणि मराठी सैन्य जयनगरात काही काळ अडकून बसले. याला आणखी एक कारण आहे. यावेळी दादासाहेबांच्या सैन्यात फौज कमी होती व पैसा काहीच नव्हता. पेशव्यांचे आदेश मिळाले परंतु मोहिमेचा खर्च मात्र त्यांनी खंडणीमधून वसूल करावयास लावला होता. १४ फेब्रुवारी ५७ चे इंदूरहून राघोबांनी पेशव्यांना पाठविलेले हे पत्र पहा -
“आज इंदूरस पोचलो. होळकरांचे सैन्य मिळाले. दिल्लीच्या रोखे निघतो परंतु अब्दाली येवोन गेल्याने पैसा मिळणे सोय नाही. त्याचे पारपत्य करावे तर फौज नाही. तूर्त १५००० फौज आहे अधिक जमल्याविना जाणे अयोग्य. वार्ता मिळते की जाट झुंझू लागला आहे. शिपाई कजाख आहे. ईश्वरी दया व स्वामींचा प्रताप“
दादासाहेबांबरोबर असणारी या स्वरीतील तरुण मंडळी पुढे इतिहासात प्रसिद्धीस आली. यात सखारामबापू बोकील, बाबुराव हरी गुप्ते, बाबुराव फडणीस, हरिपंत भिडे, मानाजी पायगुडे, देवजी ताकपीर, कृष्णराव काळे,बापुजी बल्लाळ फडके ही काही नावे. पैसा मिळावा म्हणून दादासाहेब पुन्हा राजपुतान्याकडे वळले.थोडा पैसा मिळाला पण मुख्य कार्यभाग असा काही साधला गेला नाही. ह्या दर्म्यान राघोबाने पुन्हा एक पत्र पाठविले त्यातील काही ओळी पहा -
“अब्दाली दिल्लीहून माघारा फिरल्याची वार्ता मिळते. तेव्हाच आम्ही मल्हारबास म्हणत गेलो की दिल्ली व लाहोर पाठीवर जात एकदम जप्त करू पण यांनी लटकी लचांडे लावून ३ महिने खर्ची केलेत. मल्हारबाचा स्वभाव स्वामीस वाकीफ आहे. दोन महिने माधोसिंगाचे प्रकरण चालिले आहे. मल्हारबा न ऐकता तेव्हा आम्ही ही मसलत टाकून मामलती रगडू करतो. कष्टी जाले. दतबा आलियाने परस्पर वर्म निघते“
मल्हारराव कसे राजकारण बिघडवीत होते हे या पत्रात स्पष्ट दिसते. कदाचित नजीबखानाने त्यांची तोंडदाबी केली असावी का ?
सांभार ;http://raigad.wordpress.com/
No comments:
Post a Comment