Total Pageviews

Sunday, 2 December 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २००

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २००
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग
सांभार :www.marathidesha.com

अफझलखानाच्या वधानंतर शिवरायांनी खानाच्या शवाचे इस्लामी पद्धतीने अंत्यसंस्कार करुन त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.तर अफझलखानाच्या वधानंतर खानाचा मुलगा व इतर सरदारांना पळून जाण्यास मदत करणार्‍या खंडोजी खोपडेला महाराजांनी डावा पाय आणि उजवा हात तोडण्याची प्रतापगडावर शिक्षा दिली.
पन्हाळगडची लढाई
इ.स.२ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते.मुसळधार पावसात सुध्दा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता.या कठीण प्रसंगी महाराजांनी सिध्दीस तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिध्दी गाफील राहिला.शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिध्दी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला.शिवा काशीद चे खरे रूप कळल्यावर सिध्दीने त्यांस ठार केले,तोवर छत्रपती विशाळगडाच्या वाटेवर होते.
छत्रपती शिवरायांनी पन्हाळ्यावरून,विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्या- नंतर,सिद्दीने,सिद्दी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला.मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले,अशावेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितले.घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली,शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू,फ़ुलाजी,संभाजी जाधव,बांदल यांनी मोठा पराक्रम गाजविला.
महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला.इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा आवाज ऎकल्यानंतरच समाधानाने आपला जीव सोडला.या युध्दात मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले तर मसूदचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले.बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाली.
पावनखिंडीतील विजयी स्मारक

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९९

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९९
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग
सांभार :www.marathidesha.com

अफझलखानांस घाबरून मसूरचे जगदाळे, उत्रोळीचे खोपडे आदि खानाला मिळाले तर कान्होजी जेधे (संदर्भ:जेधे शकावली)सारखे मावळातील बहूसंख्य इमानी वतनदार महाराजांना सामील झाले.आपल्या जीवाचे बरेवाईट होईल हे जाणून जिजाऊंच्या ताब्यात राज्यकारभार देऊन आपल्या सहकार्‍यांना भावी काळासाठी त्यांनी सूचना दिल्या.
खानाला आपण फार घाबरतो आणि आपल्याकडून खूप अपराध झाल्यामुळे आपण खानास भेटावयास जाण्याऐवजी खानानेच आपल्या भेटीस प्रतापगडाच्या पायथ्याशी यावे, असा आग्रह शिवरायांनी केला.शिवरायांच्या नम्रतेच्या निरोपामुळे व स्वत:च्या सामर्थ्याची घमेंडीमुळे अफझलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी यावयास तयार झाला.
भेटीच्या वेळी दोन्हीकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि यावेळी सर्वांनी निशस्त्र राहण्याचे ठरले.१० नोव्हेंबर १६५९ या दिवशी छत्रपती शिवराय भेटीसाठी खानाला सामोरे गेले असता धिप्पाड खानाने अलिंगन देण्याचा बहाणा करून शिवरायांचे मस्तक काखेत दाबून दुसर्‍या हाताने कट्यारीचा वार शिवरायांच्या शरीरावर केला.शिवरायांनी अंगरख्याच्या आत घातलेल्या चिलखतावर हा वार बसला.खानाचा दगा लक्षात येताच शिवरायांनी उजव्या हातातील वाघनख्यांनी वार करून खानाचे पोट फाडून आतडी बाहेर काढली.
खान'दगा दगा'असे ओरडत आतडी सावरीत बाहेर आला असता,खानाचा अंगरक्षक सय्यद बंडाने शिवरायांवर केलेला वार शिवरायांचा अंगरक्षक जिवा महालाने वरच्यावर अडवून सय्यद बंडाला ठार केले.पालखीत बसून पळून जाणार्‍या खानाचे मुंडके संभाजी कावजी याने उडविले.महाराज गडावर जाताच तोफेचा आवाज करण्यात आला आणि खानाच्या बेसावध सैन्यावर दाट जंगलात लपून बसलेल्या मावळयांनी तुटून पडून त्यांची दाणादाण उडविली.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९८


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९८
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग
सांभार :www.marathidesha.com

चंद्रराव मोरेचा बंदोबस्त
जावळीचा चंद्रराव मोरे हा आदिलशहाचा चाकर होता,त्याच्या त्रासाने जावळी खोर्‍यातील जनता त्रस्त झाली होती.मोरे याचा पाडाव करून शिवाजी महाराजांनी जावळी काबिज केली,शके १५७७ पौष वद्य चतुर्दशी मंगळवार १५ जाने १६५६ (संदर्भ:जेधे शकावली).यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला.महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला.कैदेतील मोरे आदिलशाहीशी गुप्तरुपाने पत्रव्यवहार करताना सापडल्यामुळे महाराजांनी त्याला ठार केले.रायरीवरील विजयाने महाबळेश्वर ते रायगडापर्यंतच्या कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.
प्रतापगडची लढाई
आदिलशाहच्या ताब्यातील चाळीस किल्ले इ.स.१६५९ पर्यंत छत्रपतींनी जिंकले होते,या कालावधीत त्यांनी मुघलांशी नरमाईचे धोरण ठेवले.शिवरायांना नेस्तनाबूत करण्यासाठी अफझलखान या सरदारास आदिलशहाने पाठविले. शिवरायांना कैद करून विजापूरात घेऊन येण्याची प्रतिज्ञा करून अफाट सैन्यासह खान स्वराज्यावर चालून आला.स्वराज्यात येताना खान तुळजापूर,पंढरपूर आणि वाटेतील इतर गावातील देवस्थानाची तोडफोड करत, वाईला तळ ठोकून राहिला.
खानाच्या प्रचंड अशा सैन्याशी समोरासमोर लढण्याची ताकद त्यावेळी शिवरायांकडे नव्हती.याच अफझलखानाने शहाजीराजांना कैद करून अपमानास्पदरितीने बेड्या ठोकून विजापुरात नेले होते तर कनकगिरीच्या वेढ्यात शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांचा खानामुळे मृत्यू झाला होता.
याच प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपतीं शिवरायांनी खानाचा वध केला होता

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९७

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९७
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग
सांभार :www.marathidesha.com

बेंगलोरहून परत आल्यानंतर शिवरायांनी बारा मावळ(राजमाची व चाकण येथून दक्षिणेस रायरेश्वराचा डोंगर,अंबेडखिंड,खंबाटकीचा घाट येथपर्यंत पुण्याजवळचा मुलूख) खोऱ्यात राहणार्‍या आपल्या सवंगड्याना सोबत घेऊन स्वत:ची फौज तयार केली.वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी इ.स.२७ एप्रिल १६४५ साली त्यांनी भोरजवळच्या,रायरेश्वराच्या पठारावर स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली.
छत्रपती शिवरायांनी सुरवातीच्या कालखंडामध्ये तोरणा,सिंहगड,चाकण आदी किल्ले आदिलशहाकडून जिंकून आपल्या वर्चस्वाखाली आणले.आदिलशहाने शिवाजीराजांना आळा घालण्यासाठी फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवरायांवर हल्ला करण्यास पाठविले शिवाय विश्वासघाताने शहाजीराजांना कैद केले.
पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला.यावेळी आपल्या मुसद्दीने मुघल बादशाह शाहजहान यास दख्खनच्या सुभेदार,शहजादा मुरादबक्ष याच्यामार्फत पत्र पाठवून शहाजीराजां सहित मुघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली.शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजांची सुटका झाली याबदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला.
स्वराज्य वाढण्यास हातभार लागावा म्हणून वेगवेगळ्या मराठी सरदारांशी नाते जोडण्यासाठी जिजाऊंनी,शिवरायांची एकूण आठ लग्ने केली.त्यापैकी सईबाई निंबाळकर घराण्यातील,सोयराबाई मोहिते घराण्यातील,पुतळाबाई पालकर घराण्यातील,गुणवंताबाई इंगळे घराण्यातील,सगुणाबाई शिर्के घराण्यातील, काशीबाई जाधव घराण्यातील,लक्ष्मीबाई विचारे घराण्यातील तर सकवारबाई गायकवाड घराण्यातील होत्या.
सईबाईना संभाजीराजे हा पुत्र तर सखूबाई,रानूबाई,अंबिकाबाई या मुली होत्या. सोयराबाईंना राजाराम हा पुत्र तर दीपाबाई ही मुलगी होती.सगुनाबाईना राजकुंवर ही मुलगी होती. तर सकवारबाईना कमलाबाई ही मुलगी होती.
छत्रपती शिवरायांनी याच शिवलिंगावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९६


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९६
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग
सांभार :www.marathidesha.com

तीनशे वर्ष महाराष्ट्र इस्लामी राज्यसत्तेच्या ताब्यात खितपत पडला होता,या लोकांनी महाराष्ट्रावर आपली राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक गुलामगिरी लादून रयतेचा प्रचंड छळ चालविला होता.या कालखंडातील दिल्लीचे मोगल राजे,स्वत:ला हिंदूस्थानाचा अधिपति मानत.मोघलांच्या सत्तेला हिंदूस्थानात सर्वप्रथम छत्रपती शिवरायांनी आव्हान दिले आणि आपले स्वतंत्र व सार्वभौम राज्य स्थापिले.हिंदूस्थानातील जे राजे पारतंत्र्यात जगत होते त्यांना छत्रपतींनी स्वतंत्र होण्याचा संदेश दिला.त्यामुळेच छत्रपतीं शिवरायांना युगकर्ते ,शककर्ते असेही म्हटले जाते.
छत्रपती शिवरायांचा जन्म इ.स.१९ फेब्रुवारी १६३०(फाल्गुन वद्य तृतीया,शके १५५१) रोजी पुण्यापासून जवळच असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला(संदर्भ:जेधे शकावली).सन १६३९ ते १६४२ या कालावधीत बालशिवाजी कर्नाटकात असताना शहाजीराजांनी त्यांना राज्यकारभार तसेच युद्धाभ्यासाचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती(संदर्भ:परमानंदकृत शिवभारत).त्यामुळे लहानपणीच बालशिवाजी लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी यात तरबेज झाले.रामायण, महाभारत या ग्रंथाचे जिजाऊंकडून संस्कार झाल्यामुळे,परकीयांविरूद्ध लढण्याचे बाळकडू त्यांना लहानपणापासून मिळाले.जन्मानंतर इ.स १६४२ पर्यत त्यांचे वास्तव्य शिवनेरी, सिंदखेडराजा, खेड शिवापूर, पुणे जहागीर तसेच बेंगलोर आदि ठिकाणी होते
छत्रपती शिवरायांचा जन्म किल्ले शिवनेरीवर याच ठिकाणी झाला

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९५

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९५
।। राजमाता जिजाबाई ।।
सांभार :http://www.marathidesha.com
महाराज शककर्ते छत्रपती झाले.जिजाऊ व शहाजीराजे यांच्या संकल्पनेतील स्वराज्य प्रत्यक्षात आले.राज्याभिषेकानंतर थोड्याच दिवसात इ.स.१७ जून १६७४ रोजी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी जिजाऊंचे निधन झाले.जिजाऊ थोर माता होत्या तसेच त्या सर्व श्रेष्ठ राजनितीतज्ञ,सर्वश्रेष्ठ योध्दा ,सर्वश्रेष्ठ भाषातज्ञ अशा सर्व कलानिपूण व्यक्ती होत्या.
थोर समाजसेवक महात्मा फुलेंनी आपल्या पोवाड्यातून जिजाऊंची थोरवी गायली आहे.
कन्या वीर जाधवांची जिने भारत लावले पुत्रा नीट ऎकविले ॥
या क्षेत्राचे धनी कोण कोणी बुडविले सांगत मुळी कसे झाले॥
क्षेत्रवासी म्हणौन नांव क्षत्रिय धरले क्षेत्री सुखी राहिले॥
अन्य देशिचे दंगेखोर हिमालयी आले होते लपून राहिले॥
पाठी शत्रू भौती झाडी किती उपाशी मेले गोमासा भाजून घाले॥
सर्वदेशी चाल त्यांचे पुंड माजले उरल्या क्षत्रिया पिडीले॥
शुद्रा म्हणती तुम्हा ह्रदयी बाण रोवले आज बोधाया फावले॥
गाणे गात ऎका बाळा तुझ्या आजोळी शिकले बोलो नाही मन धरले ॥
शिवराज्याभिषेकावेळी गागाभट्टानी जिजाऊ विषयी पुढीलप्रमाणे उद्गार काढले,
कादंबिनी जगजीवनदान हेतु:॥
सौदामिनीत्व सकलही विनाशेजाय ॥
आलंबिनी भवति राजगिरे दिदानी॥
जीजा भिदायजयती शहाबकुटूंबिनीसा ॥
राजमाता जिजाऊंची समाधी,पाचाड(रायगड)

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९४

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९४
।। राजमाता जिजाबाई ।।
सांभार :http://www.marathidesha.com
इ.स. १६६६ साली छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहाच्या अटीनुसार औरंगजेबला भेटण्यासाठी दिल्लीला गेले.तेथे औरंगजेबने छत्रपतींचा अपमान करून आग्र्याला नजरकैदेत ठेवले.अशा बिकट प्रसंगी खचून न जाता जिजाऊंनी महाराष्ट्रात स्वराज्याचा राज्यकारभार नीट केला.
आग्र्याहून सुटल्यानंतर शिवबांनी मोघलांच्या ताब्यातील किल्ले परत घेण्याचा सपाटा चालविला.शिवरायांचा दरारा संपुर्ण भारतात निर्माण झाला होता.पण त्यांची स्वतंत्र राजा म्हणून ओळख नव्हती.त्यामुळे जिजाऊंनी शिवरायांचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला.
इ.स. ६ जून इ.स.१६७४(शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ,शुद्ध त्रयोदशी,आनंदनाम संवत्सर) रोजी राज्याभिषेकाचा सोहळा रायगडावर संपन्न झाला.तर २४ सप्टेंबर १६७४,ललिता पंचमी अश्विन शु.५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने शिवरायांनी स्वत:ला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. सभासदाच्या बखरीत या सोहळ्याचे खूप सुंदर वर्णन आहे.सभासदाच्या लेखानुसार या सोहळ्यात एक करोड बेचाळीस लक्ष होन एवढा खर्च झाला.राज्याभिषेक समारोहाबद्दल सभासद म्हणतो,येणे प्रमाणे राजे सिंहासनारूढ जाले.'या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा मर्‍हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला.ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.'
श्री शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगडावर झाला.त्याचे पडसाद सातासमुद्रापार युरोपपर्यंत निनादले.हा राज्याभिषेक रोखायचे धाडस आलमगीर औरंगजेबालाही झाले नाही.राज्याभिषेक सोहळा सुरु असताना,स्वराज्याच्या सीमेकडे डोळा वर करुन पहायचे धाडसही चार पातशाह्यांना झाले नाही.इतका प्रचंड दरारा आणि दहशत शिवरायांची,त्यांच्या मराठी सेनेची होती. राज्याभिषेकावेळी शिवरायांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.राज्यव्यवहार कोश बनविला,नवी दंडनिती,नवे कानुजाबते तयार केले.