हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४३५
काळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड.
ओक्टोबर १७३३ किल्ले बाणकोट, गोवेले, विन्हेरे, पाचड मारित सिद्दी अफ्वानी रायगडाच्या पायथ्यास पोचला. गडास त्याने वेढा घातला. ही बातमी समजताच बाजीराव पेशवे रायगड मोहिमेवर निघाले. जानेवारी १७३४ महिन्यात काळ नदीच्या खोर्यात पेशव्यांचे आणि सिद्दयाचे मोठे युद्ध झाले. गडावरच्या मराठ्यांनाही चेव चडला.
तटसरनौबत जावजी लाड याने महादरवाजा उतरून थेट सिद्दीच्या छावणीवरच हल्ला चडविला. मराठ्यांचा तो आवेश पाहून सिद्दयाचे सैन्य सैरावैरा पळू लागले. त्यांनी काळकाई खिंडी मार्गे पळण्याचे ठरविले पण जावजी लाड आणि त्यांच्या सैनिकाने सिद्द्यांचा पाठलाग केला. शत्रु सैन्यास जावजीने काळकाई खिंडित गाठले पण तेथे सिद्यांची चौकी होती. या चौकीतील सैन्याचे बळ मिळाल्या मुले सिद्द्याच्या पळणाऱ्या सैनिकांने उलटून मराठ्यांना तोंड दिले. आता मात्र जावजी लाड आणि त्यांचे वीर घेरले गेले. अखेर घनघोर युद्ध झाले आणि त्यात अनेक जखमा शरीरावर सोसत जावजी लाड धारातीर्थ पडले.
रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर एक वीर स्मारक दिसते ते जावजी लाड यांचे आहे असे आप्पा परब सांगतात. जावजी लाड यांचा उल्लेख पेशवा दफ्तरात सुद्धा मिळतो.
No comments:
Post a Comment