Total Pageviews

Thursday, 5 October 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४०८

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४०८

बुंदेलखंड इतिहास आणि मराठ्यांची महाराष्ट्राबाहेरची भरारी !
⋅ Prashant Shigwan
भाग ३

बाजीराव च्या मराठी फौजेचे बुंदेलखंडात आगमन -हे युद्ध १७२७ च्या जानेवारीपासून १७२८ पर्यंत सलग चालले. ८० वर्षाचा छत्रसाल स्वत तलवार घेवून लढत होता हे कोणाला सांगितले तरी खरे वाटणार नाही. आता बंगश ने जैतापुरला वेढा दिला. आता हताश छत्रसाल ला शिवाजी महाराज्यांनी मदत करायचे आश्वासन अचानक आठवले. त्याने पुण्याला एक पत्र पाठवून शिवाजी महाराज्यांनी आपल्याला ६० वर्ष्या पूर्वी दिलेले आश्वासन बाजीरावाला आठवण करून दिले. बाजीराव या वेळी जेवत होते. ते तसेच ताटावरून उठले. वाढप्याने कारण विचारातच बाजीराव म्हणाले “जर माझ्या जेवणाचा उशीर छत्रसाल च्या पराभवाचे कारण बनले तर शिवाजी महाराज मला कधीच माफ करणार नाहीत.”

छत्रसाल ने असे काय लिहिले होते पत्रात? ते पत्र दोह्याच्या स्वरुपात होते. त्याचा संदर्भ देण्याचा मोह मलाही आवरला नाही
जो गती ग्राह गाजेन्द्रकी सो गत भाई है आज, बाजी जात बुंदेल कि , रखो बाजी लाज |(मी गजेंद्र आज दुर्दैवाने बंगश च्या सापळ्यात सापडलो असून तू विष्णू प्रमाणे धावत येवून माझे रक्षण कर.)

बाजीराव अजिबात विलंब न करता ३० मार्च १७२९ ला जैतापूर ला पोचले. २४ महिने खडतर प्रदेश आणि जंगलात युद्ध करून बंगश ची फौज थकली होती. शिवाय छत्रसाल चा पाडाव झाला होता फक्त त्याकला ताब्यात घ्यायची होती अश्या भ्रमात बंगश होता त्याने छत्रसाल च्या नातवाना आणि मुलांना आपल्या कैदेत ठेवले होते पण एका रात्री अचानक त्यांनी शस्त्र मिळवून पहारेकर्यांना कापून बाजीरावाच्या सैन्याला येवून मिळाले. त्यांनी बाजीरावाला बंगश च्या सैन्याची पूर्ण माहिती दिली. इकडे बाजीत्रावाचे सैन्य २५ मैला पर्यंत येई पर्यंत बंगश ला समजले सुद्धा नाही.बाजीराव च्या गतीचा त्याला स्वप्नातही माग लागला नाही. बाजीरावांनी बंगश ला असा मार दिला कि तो जैतापूर च्या किल्ल्यात लपला.मग बाजीरावाने किल्ल्याला वेढा दिला. बाजीरावांचा हाताखाली असणारे मल्हार राव होळकर , पिलाजी जाधव. दावलजी सोमवंशी, वित्तल विन्चुकर यांनी बंगश ला कोणत्याही प्रकारची रसद मिळणार नाही याची खबरदारी घेतली. अन्नासाठी दही दशा झालेला बंगश याने तोफा ओढणारे बैल आणि घोडे कापून खाल्ले.

बंगश ची सोडवूणूक करण्यासाठी त्याचा मुलगा ३० हजार फौज घेऊन आला पण मराठ्यांच्या पुढ्यात त्याचा निभाव लागला नाही. पावसाळ्याची वेळ झाली मराठे परत जाण्याची वेळ झाली. छत्रसाल ने बंगश ला काही अटी घालून सोडून देण्यात शहाणपण समजले.

छत्रसाल मोठ्या थाटात परत राजधानीत आला.छत्रसाल ने आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा बाजीरावांना दिला. बाजीरावांनी तो रीतसर शाहू महाराज्याना दिला. छत्रसाल बाजीरावाच्या पराक्रमावर इतका भाळला कि त्याने आपली सुंदर मुलगी मस्तानी त्याला दिली .पण ती मुसलमान होती याचा कुठेही पुरावा नाही. मग तिच्याबद्दल पेशवे घराण्यात ‘यावनी ‘ का म्हणत हेच समाजात नाही.

No comments:

Post a Comment